आजच्या काळात वजन वाढणे ही केवळ सौंदर्याची नव्हे तर गंभीर आरोग्याची समस्या बनली आहे. चुकीची जीवनशैली, व्यायामाचा अभाव, ताण तणाव आणि असंतुलित आहार यामुळे लठ्ठपणाचं प्रमाण झपाट्याने वाढत आहे. लठ्ठपणामुळे मधुमेह, हृदयविकार, थायरॉईड आणि झोपेचे विकार यांसारखे अनेक आजार उद्भवू शकतात. त्यामुळे अनेक तरुण-तरुणी पटकन वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती अवलंबताना दिसतात.

अशाच एका २५ वर्षीय तरुणीने वजन कमी करण्यासाठी ३६ तासांचं इंटरमिटंट फास्टिंग करण्याचा निर्णय घेतला. तिचं वजन ९५ किलो होतं आणि बॉडी मास इंडेक्स (BMI) ३४ होता. तिला वाटलं की,”वजन कमी करण्यासाठी हा मार्गच सर्वोत्तम आहे. एका महिन्यानंतर तिनं ५ किलो वजन कमी केलं, मात्र तिला प्रचंड थकवा जाणवत होता, एकाग्रता कमी झाली, पोट फुगण्याची आणि अ‍ॅसिडिटी जाणवत होते, शांत झोपे देखील लागत नव्हती, असं दिल्ली येथील इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटल, एडोक्रायनोलॉजिस्ट डॉ. ऋचा चतुर्वेदी यांनी दी इंडियन एक्सप्रेसला माहिती देताना सांगितले

अलीकडे बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारसह अनेक सेलिब्रिटी इंटरमिटंट फास्टिंग करत आहेत. मात्र, प्रत्येकासाठी हा उपाय सुरक्षित आहेच असं नाही; काही वेळा तो आरोग्यावर गंभीर परिणाम करणारा ठरू शकतो.

३६ तासांचा उपवास म्हणजे काय?(What is a 36-hour fasting routine?)

३६ तासांचं फास्टिंग हे “एक्स्टेंडेड फास्ट” (दिर्घकाळाचा उपवास) मानलं जातं. उदाहरणार्थ, रविवारी संध्याकाळी लवकर जेवण करून उपवास सुरू केला, तर पुढचं जेवण मंगळवारी सकाळी नाश्त्याला केलं जातं.

या काळात व्यक्ती पाणी, चहा किंवा कॅलरी-फ्री पेय घेऊ शकते, पण अन्न घेतलं जात नाही. त्यामुळे शरीराला जेवणातून ऊर्जा न मिळाल्याने ते साठवलेली फॅट्स जाळून ऊर्जा निर्माण करतं. त्यामुळे वजन कमी होण्याची प्रक्रिया सुरू होते.

या प्रकाराला “५:२ डाएट” असंही म्हटलं जातं. यात आठवड्यातील पाच दिवस नियमित आहार घेतला जातो आणि उरलेल्या दोन दिवसांमध्ये केवळ ३०० ते ५०० कॅलरी इतकाच आहार घेतला जातो.

३६ तासांच्या उपवासामुळे शरीरात कोणते बदल होतात? (What changes happen in the body?)

सुमारे १२ तास अन्न खाल्ल्यानंतर, तुमचे शरीर त्यातील बहुतेक साठवलेली साखर (ज्याला ग्लायकोजेन म्हणतात) वापरते. “जेव्हा असे होते तेव्हा तुमच्या इन्सुलिनची पातळी कमी होते. हे महत्वाचे आहे कारण जास्त इन्सुलिनमुळे चरबी साठवली जाऊ शकते. कमी इन्सुलिन तुमच्या शरीरात उर्जेसाठी चरबी वापरण्यास मदत करते,” असे गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. सुदीप खन्ना सांगतात.

ग्लायकोजेनचा साठा कमी झाल्यावर (सामान्यतः १८-२४ तासांनंतर), तुमचे शरीर साठवलेल्या चरबीचे फॅटी अॅसिड आणि केटोन्स नावाच्या रेणूंमध्ये विभाजन करण्यास सुरुवात करते. “आता अन्न उपलब्ध नसताना केटोन्स मेंदू आणि शरीराला इंधन देऊ शकतात. याला केटोसिस म्हणतात,” डॉ. खन्ना स्पष्ट करतात.

यामध्ये पुढचा टप्पा म्हणजे ऑटोफॅजी (autophagy) होते. या स्थितीमध्ये आपल्या शरीर जुने, खराब झालेल्या पेशी स्वच्छ करून त्यांचे उपयोगी भाग पुन्हा नवीन पेशी तयार करण्यासाठी वापरते. हा एक नैसर्गिक मार्ग आहे.

संशोधनानुसार उपवास २४ ते ३६ तास चालू राहिल्यावर ही प्रक्रिया वाढू लागते, पण ती व्यक्तीनुसार त्याचे परिणाम बदलू शकतात. ऑटोफॅजीमुळे कर्करोग, अल्झायमर यांसारख्या आजारांपासून संरक्षण होऊ शकतं, असं मानलं जातं. मात्र, याबाबत अजून अधिक अभ्यास होणं आवश्यक आहे, असं डॉ. खन्ना सांगतात.

काही लोक सांगतात की उपवासादरम्यान त्यांना जास्त एकाग्रता आणि लक्ष केंद्रित करणं सोपं वाटतं. यामागचं कारण म्हणजे रक्तातील साखर स्थिर राहणं, पचनावर कमी ताण येणे आणि मेंदूसाठी ‘केटोन’ नावाचं स्थिर ऊर्जा(steady energy) पुरवते.

मात्र, काही लोकांना विशेषतः सुरुवातीच्या टप्प्यात थकवा, चिडचिड किंवा अशक्तपणा जाणवू शकतो. “सामान्य वेळी जेव्हा तुम्ही जेवता त्या वेळेला भूक लागते, पण साधारण १८–२४ तासांनंतर ती भूक कमी होत जाते. कारण भूक निर्माण करणाराघ्रेलिन हा हार्मोन लाटांप्रमाणे वाढतो-घटतो,” असं डॉ. खन्ना सांगतात.

३६ तासांचा उपवास प्रकार सुरक्षित आहे का? (Is this fasting format safe?)

डॉ. खन्ना यांच्या मते, हा उपवास प्रकार बहुतेक निरोगी प्रौढांसाठी सुरक्षित ठरू शकतो, पण यासाठी पुरेसं पाणी पिणं आणि जास्त शारीरिक कष्ट टाळणे गरजेचं आहे.

मात्र, मधुमेह असलेले रुग्ण, अन्नासंबधीत आजार असलेल्यांनी, गर्भवती महिला आणि काही विशिष्ट औषधं घेणारे रुग्णांनी डॉक्टरांच्या मार्गदर्शनाशिवाय हा उपवास अजिबात करू नये.

३६ तासांच्या उपवासाचे दुष्परिणाम कोणते? (What are the side effects of fasting?)

डॉ. ऋचा चतुर्वेदी यांच्या मते, जास्त वेळ उपवास करणं धोकादायक ठरू शकते.

दीर्घकाळ उपवास केल्यावर शरीर उर्जेसाठी चरबी वापरू लागतं. त्यामुळे केटोन बॉडीज नावाचे घटक तयार होतात. हे यकृत (लिव्हर) बनवतं आणि ते अ‍ॅसिडिक स्वभावाचे असतात. पुरेसं पाणी न घेतल्यास शरीरात इलेक्ट्रोलाइट आणि खनिजांचं संतुलन बिघडू शकते. म्हणूनच उपवासाच्या सुरुवातीच्या काळात अनेकांना चक्कर येणे आणि डोकेदुखी जाणवते. याशिवाय, थकवा, झोप न लागणं, आळस, शरीर सुस्त होणे असे त्रास वारंवार दिसतात.

पण डॉ. चतुर्वेदी यांना सर्वात जास्त चिंताजनक गोष्टी वाटतात त्या म्हणजे स्नायूंचं वजन कमी होणं, पचनाशी संबंधित त्रास होणे, मूडवर होणारे परिणाम आणि शरीरात सूज येणं.

३६ तासांचा करताना कोणती काळजी घ्यावी?(What are checks and balances?)

डॉ. ऋचा चतुर्वेदी यांच्या मते, उपवासानंतर लगेच अति खाणं (बिंज ईटिंग) अजिबात करू नये. यामुळे उपवासाचा फायदा कमी होतो आणि पचनाच्या समस्या वाढतात.

डॉ. खन्ना सांगतात की, दीर्घकाळ काहीही न खाल्ल्याने शरीर स्वतःचं रक्षण करण्यासाठी चरबी साठवण्याची प्रक्रिया सुरू करू शकते. म्हणजेच उपवासामुळे वजन कमी करण्याऐवजी उलट चरबी वाढवू शकतो.

“खरं तर, ज्या प्रकारच्या उपवासात खाण्यासाठी अधिक वेळेचा कालावधी (जसं की १६:८ फास्टिंग – १६ तास उपवास, ८ तास खाणं) उपलब्ध असतो, तो पद्धतशीरपणे पाळणं जास्त सोपं ठरतं.”