Exercise Before Sleeping: चांगल्या आरोग्यासाठी चांगली झोप खूप महत्त्वाची आहे. चांगल्या झोपेसाठी सात ते आठ तासांची झोप आवश्यक आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात थकवा असला तरी झोप येत नाही. बदलत्या जीवनशैलीमुळे लोक रात्री उशिरापर्यंत जागे राहतात. फोनच्या व्यसनामुळे आणि सोशल मीडिया आणि टीव्ही पाहण्याच्या सवयीमुळे आजकाल बहुतेक लोक रात्री उशिरापर्यंत जागे राहतात, त्यामुळे त्यांना चांगली झोप लागत नाही आणि आरोग्यावर वाईट परिणाम होतो.अंथरुणावर पडलं तरी बराच वेळ या कुशीवरून त्या कुशीवर होण्यातच त्यांची मध्यरात्र उलटून जाते. त्यानंतर कधीतरी डोळा लागतो, पण मध्येच वारंवार जाग येते. असं तुमच्याही बाबतीत होत असेल तर अशा परिस्थितीत झोपण्यापूर्वी काही सोपे व्यायाम केल्याने तुम्हाला चांगली झोप येऊ शकते. यामुळे स्नायूंना आराम देण्यासोबतच शरीर लवचिक होण्यासही मदत होते. मीरा रोड येथील वोक्हार्ट हॉस्पिटलचे ऑटोरहिनोलॅरिन्गोलॉजी आणि डोके व मान ऑन्कोसर्जरीच्या सल्लागार डॉ. शीतल राडिया यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे. शीतल राडिया यांनी सांगितले की, झोप येत नसल्याची कारणं समजून घेणे आवश्यक आहे. आर्म स्विंग्स व्यायाम मसाज थेरपिस्ट जेम्स मूर यांच्या मते, आर्म स्विंग्स नावाचा व्यायाम झोपण्यापूर्वी १० मिनिटे केल्यानं अंथरुणावर पडताच चांगली झोप येते. "आर्म स्विंग्स शरीराला रिलॅक्स करण्यासाठी आणि आराम करण्यास मदत करण्यासाठी खूप प्रभावी आहेत. तसेच रक्तदाब कमी करण्यास आणि झोपेची गुणवत्ता सुधारण्यास मदत करते. हा व्यायाम करण्यासाठी सरळ उभे राहणे आवश्यक आहे, त्यानंतर शरीर शिथिल केले पाहिजे आणि त्यांचे हात उजव्या बाजूपासून डाव्या बाजूला हलवावे. मूर यांनी पुढे नमूद केले की, हा व्यायाम मज्जासंस्थेला "उत्तेजित" करण्यास मदत करतो, ज्यामुळे एखाद्याला चांगली झोप येते." गुरुग्राम येथील नारायण हॉस्पिटलमधील पल्मोनोलॉजी आणि स्लीप मेडिसिन वरिष्ठ सल्लागार, डॉ. श्वेता बन्सल सांगतात, आर्म स्विंग व्यायाम खरोखर चांगली झोप येण्यास मदत करू शकतो. या लयबद्ध हालचाली रक्ताभिसरण सुधारण्यास, तणाव कमी करण्यास आणि विश्रांतीस प्रोत्साहन देण्यास मदत करतात. हेही वाचा >> Heart Attack: पोटावर झोपल्यानं हृदयविकाराचा झटका येऊ शकतो का? वाचा तज्ज्ञांनी सांगितलेला धोका मीरा रोड येथील वोक्हार्ट हॉस्पिटलचे ऑटोरहिनोलॅरिन्गोलॉजी आणि डोके व मान ऑन्कोसर्जरीच्या सल्लागार, डॉ. शीतल राडिया यांनी सांगितले की, फक्त हा व्यायाम करून परिणाम दिसत नाही तर तुमचा आहारही योग्य असणे गरजेचे आहे. तसेच तुम्ही जर मानसिक तणावात असाल किंवा वारंवार कोल्डड्रिंकचे सेवन करत असाल तर तु्म्हाला झोप न येणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.