सध्या द्राक्षाचा सीझन सुरु आहे, त्यामुळे तुम्हाला बाजारात द्राक्ष दिसत असतील आणि तुम्ही ती खरेदीही केली असतील. उन्हाळ्यात द्राक्ष खायला अनेकांना आवडतं. हीच तुमच्या आवडीची द्राक्ष शरीरासाठीही खूप फायदेशीर असतात, कारण द्राक्षात पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने ते उन्हाळ्यात डिहायड्रेशन रोखण्यास उपयुक्त ठरतात.

बाजारात हिरवी, काळी आणि लाल रंगाची द्राक्ष उपलब्ध आहेत. पण त्यातही लाल रंगाची द्राक्ष सर्वात फायदेशीर, पोषक तत्वांनी परिपूर्ण असतात. शिवाय लाल द्राक्षे दिसायला जितकी सुंदर तितकीच ती आरोग्यासाठीही फायदेशीर असतात. दिवसभरात फक्त एक वाटी लाल द्राक्ष खाणे तुमच्या त्वचेसाठी, हृदयासाठी, मेंदू, डोळे आणि रोगप्रतिकारक शक्तीसाठी फायदेशीर ठरतात. एवढेच नाही तर लाल द्राक्षे तुमचा कर्करोग, उच्च रक्तदाब, वाईट कोलेस्ट्रॉलपासूनही बचाव करू शकतात. त्यामुळे या द्राक्षांमध्ये असं काय खास आहे ते जाणून घेऊया.

switching your exercise routine have several benefits
काही ठराविक महिन्यानंतर व्यायामामध्ये बदल करणे आवश्यक आहे? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
balmaifal article, story for kids, water literacy, Water importance, do not waste water lesson, story cum lesson for water, save water, kids and water, marathi article, loksatta article,
बालमैफल : जलसाक्षरता
Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
How Suryanamaskar and pranayama help to fight allergies
तुम्हाला वारंवार ॲलर्जी होते? सूर्यनमस्कार आणि प्राणायाम ठरतील फायदेशीर

हेही वाचा- सतत AC वापरल्याने होतो जीवघेणा त्रास ; वेळेवरच सवय बदला नाहीतर होतील गंभीर समस्या

लाल द्राक्षांमध्ये कॅलरी, चरबी आणि कोलेस्टेरॉल खूप कमी असते. द्राक्ष ही अँटी-ऑक्सिडंट्सचा खजिना आहेत. म्हणूनच आहारतज्ञ त्वचेचा ग्लो वाढवण्यासाठी लाल द्राक्षे खाण्याचा सल्ला देतात. यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन के, फोलेट, झिंक, कॉपर, पोटॅशियम, मॅंगनीज आणि कॅल्शियम देखील चांगल्या प्रमाणात आढळतात. या द्राक्षांमध्ये आढळणारा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे रेझवेराट्रोल. हे पॉलीफेनॉल अँटिऑक्सिडंट आहे, ज्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आहेत. हे अँटीऑक्सिडंट लाल द्राक्षांच्या त्वचेमध्ये आढळते. रेझवेराट्रोलला कॅन्सर, हृदयविकारांसह अनेक समस्या कमी करण्यासाठी उपयुक्त असे मानले जाते.

लाल द्राक्षे खाण्याचे फायदे –

न्यूट्रिशनिस्ट आणि वेलनेस एक्स्पर्ट करिश्मा शाह यांनी लाल द्राक्षाचे अनेक फायदे सांगितले आहेत. ते पुढीलप्रमाणे –

रोग प्रतिकारशक्ती –

हेही वाचा- Hormonal imbalance मुळे होऊ शकतात गंभीर आजार, हार्मोन्स संतुलित राहण्यासाठी आहारामध्ये करा ‘या’ पदार्थांचा समावेश

आहारतज्ञ करिश्मा शाह सांगतात, लाल द्राक्षांचे नियमित सेवन केल्यामुळे तुम्ही कमी आजारी पडतात. याचे कारण म्हणजे रोगप्रतिकारक शक्तीला मिळणारा फायदा. लाल द्राक्षांमध्ये असे अनेक पोषक घटक असतात, जे तुमच्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढवतात.

त्वचेचा कर्करोग –

रोग प्रतिकारशक्तीसह त्यांच्यामध्ये आढळणारे अँटीऑक्सिडंट रेसवेराट्रोल आहे, जे कॅन्सरवर नियंत्रण ठेवण्यासाठी खूप उपयुक्त ठरले आहे. हे अँटीऑक्सिडंट सूर्याच्या हानिकारक किरणांपासून संरक्षण करते आणि त्वचेच्या कर्करोगापासून तुमचे रक्षण करण्यास मदत करते.

रक्तदाब –

लाल द्राक्षे पोटॅशियमचा चांगला स्रोत आहे आणि पोटॅशियम शरीरातील सोडियमचा नकारात्मक प्रभाव कमी करून उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करतात.

मानसिक आरोग्य –

लाल द्राक्षांमध्ये असलेले रेसवेराट्रोल रक्तवाहिन्यांमधील रक्तप्रवाह नियंत्रित करते. त्यामुळे मेंदूतील रक्तप्रवाह सुरळीत होतो. ज्यामुळे तुम्ही फ्रेश आणि उत्साही राहता. त्यामुळे लाल द्राक्षांचे सेवन तुमच्या मानसिक आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे.

डायबिटीज –

हेही वाचा- डायबिटीजच्या रुग्णांनी रक्तातील साखरेचे प्रमाण वाढवणाऱ्या ‘या’ फळांचे आणि पदार्थांचे सेवन करणे टाळावे

अनेक डायबिटीज रुग्णांना फळे खाल्ल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण वाढेल असे वाटते, पण ते पुर्णसत्य नाहीये. कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेली फळे डायबिटीज असलेल्या लोकांसाठी खूप फायदेशीर मानली जातात. कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेल्या फळांमुळे शरीरातील रक्तातील साखर लगेच वाढत नाही. तर लाल द्राक्षांचा ग्लायसेमिक इंडेक्स ५३ आहे, ज्यामुळे ते डायबिटीजसाठी एक उत्तम फळ आहे.

हृदयासाठी फायदेशीर –

लाल द्राक्षे आणि त्यापासून बनवलेल्या वाईनमध्ये अँटिऑक्सिडेंट असतात, जे हृदयाचे कार्य योग्यरित्या करण्यास मदत करतात. लाल द्राक्षांमध्ये फ्लेव्होनॉइड्स आणि पॉलिफेनॉल नावाचे दोन अँटिऑक्सिडंट असतात. जे जळजळ कमी करून रक्तवाहिन्यांचे कार्य सुरळीत करण्यास मदत करतात.

वजन कमी करण्यासाठी उपयुक्त –

या द्राक्षांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आणि पाणी असते, जे खाल्ल्यानंतर तुमचे पोट भरते. बरेच लोक वजन कमी करण्यासाठी लाल द्राक्षे वापरतात.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे, अधिकच्या माहितीसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा)