बदलत्या ऋतूत किरकोळ आजार होणे सामान्य बाब आहे. कारण, ऋतू बदलल्याने आजूबाजूचे वातावरण आणि तापमानात बरेच बदल होत असतात. बदलत्या हंगामात आपल्या आरोग्याची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. आता पावसाळ्याचा हंगाम सुरु आहे. अशा परिस्थितीत पाऊस सोबत अनेक आजारही घेऊन येतो. या ऋतूत संसर्गाचा धोका देखील सर्वाधिक असतो. पावसाळ्यात मलेरिया, डेंग्यू, चिकन गुनिया यांसारखे हंगामी आजार आणि डासांपासून पसरणारे आजारही झपाट्याने वाढतात. या हंगामाच्या काळात तुम्हाला आजारांपासून दूर राहायचे असेल आणि निरोगी राहायचे असेल तर, काही गोष्टींची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

बदलत्या हंगामात आपल्या आरोग्याबद्दल काळजी न घेतल्यास बऱ्याच आजारांना बळी पडू शकता. हवामानातील बदलांचा सर्वात दृश्य परिणाम शरीरावर होतो. यामुळे हवामानानुसार शरीराची काळजी घेणे आवश्यक आहे. आरोग्याकडे थोडेसे दुर्लक्ष केले ते शरीरासाठी घातक ठरते. सर्दी आणि फ्लू हे आजार यामध्ये सामान्य आहेत. जर आपल्याला आपल्या शरीरास या आजारांपासून वाचवायचे असेल तर आपल्या आहाराची विशेष काळजी घ्यावी लागेल. चांगल्या आरोग्यासाठी आयुर्वेदिक आहार आपली मदत करु शकतात, असे डॉ सुभाष एस. मार्कंडे, सल्लागार आयुर्वेद फिजिशियन यांनी सांगितले असल्याचे वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.

वसंत ऋतूत आरोग्य कसं जपायचं?

जसजसा सूर्य उत्तरायण (उत्तरे) दिशेला जातो तसतशी तिची तीव्रता झपाट्याने वाढते. शिशिरा ऋतूमध्ये जमा झालेला कफ सूर्यकिरणांच्या उष्णतेने द्रव बनतो. यामुळे पचनशक्ती कमी होते आणि खोकला, सर्दी, अपचन, पचनसंस्थेचे विकार आणि इतर एलर्जीसारख्या आजारांचा धोका वाढतो. आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे आहार, जीवनशैली आणि व्यायामाचे पालन करणे उपयुक्त ठरते, असे तज्ज्ञ सांगतात.

(हे ही वाचा : चालता-बोलता धाप लागते, थकवा येतो? हृदयाचं रक्षण करण्यासाठी तज्ज्ञांनी सांगितलेल्या क्लुप्त्या वाचा! )

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
  • गहू, तांदूळ, बाजरी आणि जुनी बार्ली यांसारखी तृणधान्यांचा आहारात समावेश करावा.
  • आले, लसूण, कांदा, जिरे, धणे आणि हळद यांचा आहारात माफक प्रमाणात वापर करावा. कारण, ते कफ कमी करण्यास मदत करतात. आपण ताक जिरे पावडरचाही वापर करु शकतो.
  • मधाचा वापर करु शकतो. यामुळे खोकला कमी होण्यास मदत होते.
  • एक ते दोन आठवडे एक चिमूटभर आले आणि खडे मीठ खाऊ शकतो.
  • हलके कपडे घाला.
  • जड अन्न खाण्यापेक्षा पचायला हलके असलेले पदार्थ खा. तुम्ही मूगडाळ, खिचडी, दलिया असे पदार्थ खाऊ शकता.
  • आयुर्वेदानुसार जेवण केल्यानंतर थोडावेळ चालणे आवश्यक आहे. जेवण केल्यानंतर लगेच झोपल्यास अन्न नीट पचत नाही. 
  • दही आणि दुधाचे पदार्थ, चहा आणि कॉफी जास्त प्रमाणात टाळा.
  • दिवसाची झोप किंवा जास्त झोप घेणे टाळा.
  • अन्न नेहमी ताजे आणि गरम असावे. ते पचनासाठी चांगले असते.

आयुर्वेदात प्रत्येक गोष्टीच्या खाण्यापिण्याची वेळ ऋतुमानानुसार आणि माणसांच्या शारीरिक स्वरूपानुसार ठरलेली आहे. आयुर्वेदानुसार जे लोक योग्य आहार घेतात ते दीर्घकाळ फिट राहतात आणि आजारांपासून दूर राहतात.