Uric Acid Reduce Naturally In Human Body: अनेक लोकांच्या शरीरात उच्च प्रमाणात असणाऱ्या यूरिक अॅसिडची समस्या असते. काही लोक या गंभीर समस्येच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे दिवसेंदिवस ही समस्या वाढत जाऊन आरोग्यासाठी धोकादायक ठरते. शरीरात असलेल्या युरिक अॅसिडचं प्रमाण प्यूरीनच्या प्रमाणावर अवलंबून असतं. मांस, राजमा, मटर, गोभी आणि दारुमध्ये सर्वात जास्त प्रमाणात प्यूरीन असतं. शरीरात असलेली किडनी यूरिक अॅसिडला शुद्धीकरण करून लघवीद्वारे बाहेर सोडते. पण डाएटमध्ये जास्त प्रमाणात प्यूरीनचं सेवन केल्यामुळं यूरिक अॅसिडचं प्रमाण वाढतं आणि ते रक्तात मिसळलं जातं. यामुळे माणसाला शारीरीक वेदनांना सामोरं जावं लागतं. तर जाणून घेऊयात यूरिक अॅसिडबद्दल सविस्तर माहिती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शरीरात यूरिक अॅसिड वाढण्याची कारणे

१) काही प्रकारच्या आहारातून शरीरात यूरिक अॅसिड निर्माण होऊ शकतो.
काही गोष्टींमध्ये हे अनुवंशिक असतं. म्हणजेच, कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला हा आजार असल्यास तुम्हालाही या आजाराचा धोका निर्माण होऊ शकतो.
२) लठ्ठपणा किंवा पोटाच्याजवळ वाढलेली चरबीही या समस्येचं कारण बनू शकते.
३) तुम्ही खूप जास्त तणावात राहत असाल, तर तुमच्या शरीरात यूरिक अॅसिड निर्माण होऊ शकतो.
४) किडनीचा आजार यूरिक अॅसिड वाढवू शकतं.
५) मधुमेह सुद्धा यूरिक अॅसिडला वाढवतं.
६) हायपोथायरायडिजमही उच्च यूरिक अॅसिडचं कारण बनू शकतं.
७) काही प्रकारचे कर्करोग आणि किमोथेरेपीही यूरिक अॅसिड वाढवण्याचं कारण ठरू शकतं.
८) सोरायसिससारखा त्वचारोगही शरीरातील यूरिक अॅसिड वाढवू शकतं.

नक्की वाचा – रात्री शांत व सुखाची झोप लागत नाही? सकाळी उठल्यानंतर या गोष्टी न चुकता करा

यूरिक अॅसिड कमी करण्यासाठी नारळाचं पाणी उपयुक्त

GoutPatients.com नुसार, नारळाचं पाणी अॅंटी-इंफ्लेमेटरी आणि अॅंटी-ऑक्सीडेशन गुणांनी परीपूर्ण आहे. यूरिक अॅसिडमुळं शरीरात खूप वेदना आणि सूज येते. पण तुम्ही नारियल पाणी पित असाल तर तुमच्या आरोग्यासाठी ते खूप चांगलं आहे. नारळ पाणी पिल्यामुळं तुमच्या शरीरात सूज येत नाही. नारळ पाणी शरीरात प्यूरीनचं प्रमाण कमी करण्यास मदत करतं. आरोग्य तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, नारळ पाणी यूरिक अॅसिडच्या समस्येला दूर करतं. तसंच शरीरातील सूजही कमी करण्यास मदत करतं. त्यामुळे तुम्हाला शारिरीक वेदना होत नाहीत.

याशिवाय नारळ पाण्याच्या सेवनामुळं शरीरातील यूरिक अॅसिड बाहेर फेकलं जातं. शरीरात पाण्याचं प्रमाण कमी असल्यास यूरिक अॅसिडचं प्रमाण वाढतं. याचदरम्यान तुम्ही नारळ पाण्याचं सेवन केलं, तर हायड्रेशन होतं आणि डिहायड्रेशनपासून सुटका होते. तुम्ही नियमित नारळ पाणी पित असल्यास तुम्हाला आरोग्याचे फायदे तर होतातच पण त्वचाही सुंदर होते. याचसोबत उच्च रक्तदाब, रक्ताचं प्रमाण आणि किडनीच्या क्रोनिक आजारांचा धोका संभवत नाही.

नारळाच्या पाण्याच्या सेवनाचा आरोग्यासाठी असाही होतो फायदा

हेल्थ लाईनच्यानुसार, नारळ पाणी कब्जला दूर करण्यात खूप मदत करतं. ज्या लोकांना कब्जची समस्या नेहमी जाणवते आणि सकाळी पोट साफ होत नाही, अशा लोकांनी रात्री झोपेच्या आधी नारळ पाण्याचं सेवन केलं पाहिजे. नारळ पाण्यात मोठ्या प्रमाणात फायबर कब्ज असल्याने कब्जपासून धोका निर्माण होत नाही. तसंच काही दिवस असं केल्यानं पोटोसह, किडनी, लिव्हर आणि आतड्यांची सुद्धा शुद्धीकरण होतं. ज्यामुळं तुम्हाला अल्सरसारखी समस्या उद्धवत नाही.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coconut water health benefits drinking coconut water reduces uric acid in human body uric know the experts advice about uric acid level nss
First published on: 29-01-2023 at 12:56 IST