Constant Burping: जांभई, शिंका, ढेकर, किंवा पोटातील गॅस बाहेर पडणे या सर्व नैसर्गिक गोष्टी वाटत असल्या तरी याची वारंवारता लक्षात घेऊन वडिकीय सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे. याचे कारण म्हणजे, अलीकडेच एका २४ वर्षीय तरुणीला कोलन कॅन्सरचे निदान झाले होते, विशेष म्हणजे तिला अन्य कोणतीही लक्षणे दिसत नव्हती मात्र मागील दोन वर्षे तिला सतत ढेकर येत होते.

बेली मॅकब्रेनला हिने ऑनलाइन पोर्टल NeedToKnow ला सांगितले की, २०२१ पासून तिला दिवसातून ५ ते १० वेळा तिला सतत ढेकर येत होते. तरीही, २०२२ च्या सुरुवातीपर्यंत तिने अॅसिड रिफ्लक्सचा त्रास असे समजून याकडे दुर्लक्ष केले. तिने डॉक्टरांना विचारले असता त्यांनीही हे तणाव किंवा चिंतेमुळे होत असेल असे अंदाज वर्तवले. परंतु जेव्हा तिला वेदना, भूक न लागणे आणि बद्धकोष्ठतेच्या इतर समस्या उद्भवू लागल्या तेव्हा मात्र तिला याकडे लक्ष देणे गरजेचे वाटले.

मुळात अशाप्रकारे ढेकर येणे हे कॅन्सरचे मुख्य लक्षण नाही परंतु तिच्या ऑन्कोलॉजिस्टने सांगितल्याप्रमाणे, हे कर्करोग किंवा गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लक्स रोग (GERD) लक्षणांपैकी एक असू शकते हे अमान्य केलेले नाही.

बर्पिंग म्हणजे काय?

बर्पिंग म्हणजेच आपल्या भाषेत ढेकर येणे. ही सामान्यतः शरीराच्या वरच्या पचनमार्गातून वायू बाहेर काढण्याची एक पद्धत आहे. अनेकदा जेवण जड झाल्यास किंवा खाता-पिताना शरीरात हवा गेल्यास हा अतिरिक्त वायू शरीरातून बाहेर फेकण्यासाठी शरीरानेच केलेली ही सोय आहे. मात्र ढेकर वारंवार येत असल्यास ते कोलन कॅन्सरचे किंवा एकंदरीतच पचनसंस्थेच्या बिघाडाचे लक्षण ठरू शकते.

डॉ. संदीप जैन, संचालक, जीआय आणि एचपीबी सर्जरी, फोर्टिस हॉस्पिटल, जयपूर, यांनी हेल्थ शॉट्सला दिलेल्या माहितीनुसार, केवळ ढेकर हे कॅन्सरचे लक्षण नाही पण त्याची वारंवारता व जोडून येणारे अन्य घटक (वेदना, बद्धकोष्ठ) हे धोका वाढवू शकतात.

कोलन कर्करोग म्हणजे काय?

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने कोलन कॅन्सर किंवा कोलोरेक्टल कॅन्सरला जगभरात तिसरा सर्वात सामान्य कॅन्सर म्हणून मान्यता दिली आहे. २०२० च्या नोंदीनुसार, जवळपास २ दशलक्ष प्रकरणांचे निदान झाले.

हे ही वाचा<< ओठावर किस केल्याने ‘हे’ आजार वेगाने वाढू शकतात; दात- ओठांवर नेमका कसा दिसतो प्रभाव?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गॅस्ट्रोइंटेस्टाइनल किंवा ओटीपोटाच्या कॅन्सरमध्ये अन्ननलिका, पोट स्वादुपिंड, यकृत, पित्ताशय, कोलनच्या कर्करोगाचा समावेश होतो. जर एखाद्या विशिष्ट प्रकारचा कर्करोग गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्टमध्ये व्यत्यय आणत असेल तो अवयव अधिक फुगू शकतो, यामुळे सुद्धा ढेकर येण्याचा धोका वाढू शकतो.