तुमचा घसा खवखवत असेल तर ते त्याला तुम्ही खाल्लेले मसालेदार पदार्थ, प्रदूषण किंवा घशाचा संसर्ग अशा अनेक गोष्टी कारणीभूत असू शकतात. घसा खवखवणे हे जरी कोणत्याही गंभीर समस्येचे लक्षण नसले तरीही त्यामुळे तुम्हाला अस्वस्थ वाटू शकते. अनेकदा या समस्येमुळे तुम्हाला बोलणं किंवा खाणे देखील कठीण होते.

या समस्येवर तुम्ही घरच्या घरी काही उपचार करु शकता. ते घरगुती उपाय कोणते ते जाणून घेऊया. हेल्थ शॉट्सने डॉ. पी. वेंकट कृष्णन, इंटरनल मेडिसिन, आर्टेमिस हॉस्पिटल गुरुग्राम यांनी तुमच्या घशाची खवखव कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय सांगितले आहेत. तर याआदी आपण घसा कोणकोणत्या कारणांमुळे खवखवतो ते जाणून घेऊया.

cried for coming late to school blamed mother
शाळेत उशीरा येण्याचं चिमुकल्यानं सांगितलं भन्नाट कारण; VIDEO पाहून पोट धरुन हसाल…
DD news anchor faints during live news reading
Heatwave : उष्माघाताची बातमी देताना दूरदर्शनची अँकर स्टुडिओतच कोसळली, VIDEO व्हायरल
health benefits of fenugreek seeds
तुम्ही १४ दिवस मेथीचे दाणे खाल्ले तर तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? डॉक्टरांकडून जाणून घ्या…
home remedies for sore throat or hoarse voice to get immediate relief
सतत खोकून घसा बसलाय, स्पष्ट आवाजही येत नाहीये? मग करा ‘हे’ सोपे उपाय, घसा होईल मोकळा

घसा खवखवण्याची कारणे –

हेही वाचा- जेवल्यानंतर लघवी केल्याने डायबिटीज होत नाही? यामागील सत्य काय ते तज्ञांकडून जाणून घ्या

  • प्रदूषण
  • खूप गरम अन्न
  • मसालेदार अन्नपदार्थ
  • पोटातील तीव्र अॅसिड रिफ्लक्स
  • घशाचा संसर्ग
  • लहान अल्सर
  • काही खाद्यपदार्थांची एलर्जी

घसा खवखवण्याच्या समस्येवरील काही घरगुती उपाय पुढीलप्रमाणे –

मध –

हेही वाचा- लहान मुलांसाठी किडनीची सूज बनू शकते मोठी समस्या, ‘ही’ लक्षणे दिसताच करा उपचार

मध घशाच्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी उत्तम घरगुती औषध मानले जाते. मधातील दाहक-विरोधी आणि बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा गुणधर्म आपल्या घशात खवखव निर्माण करणारे बॅक्टेरिया आणि विषाणुंना नष्ट करतो. तुम्ही २ चमचे मध खाऊ शकता किंवा उबदार हर्बल चहामध्ये मिक्स करून तो चहा पिऊ शकता.

कोमट पाण्याच्या गुळण्या करा –

एक कप कोमट पाणी आणि त्यामध्ये काही प्रमाणात मीठ टाकून गुळण्या करा. जेव्हा तुमचा घसा दुखत असेल किंवा खवखवत असेल तेव्हा तुम्ही हे करू शकता. मीठ वापरल्याने तुमच्या घशातील ऊतींमधून द्रव बाहेर पडतो, ज्यामुळे विषाणू बाहेर पडण्यास मदत होते. या व्यतिरिक्त, स्वतःला हायड्रेटेड ठेवण्यासाठी आणि घशात खवखव होऊ नये म्हणून दिवसभरात जास्तीत जास्त पाणी प्या.

थंड दूध –

पोट आणि घशातील खवखव बंद करण्यासाठी तुम्ही एक ग्लास थंड दूध पिऊ शकता. त्याच्या शांत आणि थंड प्रभावामुळे त्रास कमी होऊ शकतो. शिवाय दूध हे भरपूर इलेक्ट्रोलाइट्स आणि कॅल्शियम युक्त असते, जे निर्जलीकरण आणि पाचन समस्यांशी लढा देऊ शकते. त्यामुळे थंड दूध घसा खवखवणे कमी करण्यासह घशाची सूज कमी करण्यासही मदत करू शकते.

हेही वाचा- सतत मोबाईलचा वापर केल्याने डोळे होतात कमजोर; काळजी घेण्याचे उपाय तज्ञांकडून जाणून घ्या

पुदीना –

औषधी वनस्पती पुदीनामध्ये अँटीव्हायरल, अँटीमाइक्रोबियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. या गुणधर्मांमुळे ते बॅक्टेरिया, बुरशी आणि व्हायरस नष्ट करू शकतात जे घशाच्या समस्येचे मूळ आहेत. आम्लपित्त आणि छातीत खवखव यामुळेही घशात खवखव होऊ शकते. पुदीना पोटातील ऍसिडचे प्रमाण कमी करण्यास तसेच जळजळ कमी करण्यास मदत करते.

हलका आहार –

हलक्या आहारामुळे तुमच्या घशातील जळजळ दूर करण्यास मदत करू शकतात. अंड्याचा पांढरा भाग, दही, आले, ओट्स यासारखे पदार्थ खा. तुम्ही हर्बल मटनाचा रस्सा, सूप, भाजीपाला स्मूदी आणि नॉन-कॅफिनयुक्त पेये पिऊ शकता. मधासह गरम चहा मदत करू शकतो. तरीही घसा जास्त खवखवत असेल तर तुम्ही आहाराच्या सूचनांसाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. शिवाय सतत जर घशांसबंधी तक्रार जाणवत असेल तरीही डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे, अधिकच्या माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या)