scorecardresearch

सतत मोबाईलचा वापर केल्याने डोळे होतात कमजोर; काळजी घेण्याचे उपाय तज्ञांकडून जाणून घ्या

मोबाईल आणि टीव्हीच्या स्क्रीनच्या लाईटचा आपल्या डोळ्यांवर दुष्पपरिणाम होतो, हे माहिती असूनही अनेकांना त्याकडे पाहण्याचा मोह आवरता येत नाही

eye care tips
डोळे हा आपल्या शरीराचा एक मौल्यवान अवयव असून आपण त्याचा खूप वापर करतो. (Photo : Freepik)

डोळे हा आपल्या शरीराचा एक मौल्यवान अवयव असून आपण त्याचा खूप वापर करतो. मात्र, त्याची काळजी घेण्याकडे दुर्लक्ष करतो. कारण आपण तासनसात मोबाईल आणि टीव्हीच्या स्क्रीनकजे बघत असतो. ज्याचा थेट परिणाम आपल्या डोळ्यांवर होतो.

मोबाईल आणि टीव्हीच्या स्क्रीनच्या लाईटचा आपल्या डोळ्यांवर दुष्पपरिणाम होतो, हे आपणाला माहिती असूनही अनेकांना त्याकडे पाहण्याचा मोह आवरता येत नाही. अशाच आपल्या काही चुकीच्या सवयींमुळे आपली दृष्टी कमी होत असते. ज्यामध्ये सतत मोबाईलचा वापर करणे, डोळ्यांसाठी आवश्यक असलेले पदार्थ न खाणे, काम करण्याच्या नादात आपण पाणी पिणं टाळणे आणि धूम्रपान करणे अशा चुकीच्या आणि वाईट सवयींचा परिणाम आपल्या डोळ्यांवर स्पष्टपणे दिसून येतो.

हेही वाचा- तुम्हालाही वारंवार लघवी होते का? तर हाय सोडियम बनवतंय तुमच्या रक्तामध्ये पाणी, लगेच करा ‘या’ पदार्थांचे सेवन

दिल्लीच्या सफदरजंग हॉस्पिटलचे डॉ.अनिमेश यांच्या मते, डोळे निरोगी राहण्यासाठी आणि दृष्टी वाढवण्यासाठी आहाराची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. आपली दृष्टी वाढवण्यासाठी आहारात ए व्हिटॅमिनचा समावेश करणं गरजेचं आहे. कारण या व्हिटॅमिनची आपली दृष्टी वाढण्यास मदत होते. याशिवाय आणखी कोणकोणत्या गोष्टींमुळे डोळ्यांची दृष्टी वाढू शकते याबाबतच्या काही टिप्स तज्ज्ञांकडून जाणून घेऊया.

लाल भाज्या –

तज्ज्ञांच्या मते, आपले डोळे निरोगी ठेवण्यासह दृष्टी वाढवण्यासाठी आहारात लाल भाज्यांचे समावेश करणं गरजेचं आहे. या भाज्यांमध्ये गाजर, सिमला मिरची, पपई आणि दूध यांचे समावेश करावा.

डोळ्यांचा व्यायाम करा

हेही वाचा- रोज सकाळी ‘या’ वनस्पतींची पाने खाल्ल्याने रक्तातील साखर राहील नियंत्रणात? सेवनाची पद्धत जाणून घ्या

शरीरासोबत डोळ्यांनाही व्यायामाची आवश्यता असते. डोळ्यांचा व्यायाम करण्यासाठी तुम्ही एक पेन घ्या आणि त्याची टोक पाहात रहा, हळू हळू पेन नाकाजवळ आणा आणि त्यावर लक्ष केंद्रित करा. ते टोक पाहून पेन पुन्हा बाजूला घ्या. असा व्यायाम दिवसातून १० वेळा करा. हा व्यायाम केल्याने डोळ्यांचे स्नायू बळकट होऊन दृष्टी वाढते.

डोळे गोल फिरवा –

जर तुम्हाला तुमची दृष्टी वाढवायची असेल तर तुमचे डोळे गोलाकार गतीने फिरवा. डोळे गोल गोल फिरवत तुम्ही भिंतीकडे बघत राहा, यामुळेही तुमच्या डोळ्यांचे आरोग्य उत्तम राहील.

डोळ्यांची उघडझाप करा –

तुमचे डोळे अधिक कमकुवत होऊ नयेत आणि तुमच्या चष्म्याचा नंबर वाढू नये यासाठी तुमच्या डोळ्यांना ब्रेक देणं गरजेचं आहे. तुम्ही जर डेस्कवरचं काम करत असाल तर काही वेळाने डोळ्यांना ब्रेक द्या. त्यासाठी अधुनमधून डोळ्यांच्या पापण्याची उघडझाप करा.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे, डोळ्यांसंदर्भातील अधिकच्या माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या)

मराठीतील सर्व हेल्थ ( Health-tips ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-02-2023 at 20:15 IST