Vegetables to control blood sugar: मधुमेह हा एक चयापचय रोग आहे, त्यामध्ये शरीरात ग्लुकोज किंवा साखरेची पातळी असामान्यपणे वाढते. जेव्हा शरीर पुरेशा प्रमाणात इन्सुलिन हार्मोन तयार करू शकत नाही किंवा उन्सुलिनचा योग्य वापर करू शकत नाही. त्यावेळी रकतातील साखर वाढू लागते. चुकीच्या खाण्याच्या सवयी, ताणतणाव, लठ्ठपणा, शारीरिक निष्क्रियता आणि अनुवांशिक कारणे या आजाराला आणखी वाढवतात. जर रक्तातील साखर नियंत्रित केली नाही, तर हृदयरोग, किडनी निकामी होणे, दृष्टी कमी होणे आणि मज्जातंतूंचे नुकसान असे गंभीर परिणाम होऊ शकतात. मात्र चांगली बातमी अशी आहे की, संतुलित आहार घेतल्याने आणि काही विशिष्ट भाज्या खाल्ल्याने उपवासापासून ते जेवणानंतर साखरेची पातळी सामान्य राहते.
डायबिटीज तज्ज्ञ आणि फिटनेस तज्ज्ञ डॉ. अनुपम घोष यांनी याबाबत बोलताना सांगितले की, डायबिटीज नियंत्रित करण्यासाठी सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे फायबरयुक्त, कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेल्या भाज्या खाणे. पालक, ब्रोकोली, शिमला मिरची, सोयाबीन आणि फ्लॉवर यासारख्या काबी भाज्या केवळ रक्तातील साखर नियंत्रित करत नाहीत, तर इन्सुलिन उत्पादन देखील सुधारतात. त्यामुळे शरीर आतून निरोगी राहते. डायबिटीज नियंत्रित करण्यासाठी कोणत्या भाज्या खाल्ल्या पाहिजेत हे जाणून घेऊ…
पालक
पालक डायबिटीज रूग्णांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. त्यात कार्बोहायड्रेट्स कमी असतात आणि फायबर, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. हे तीन पोषक तत्व रक्तातील साखरेचे प्रमाण सामान्य ठेवण्यासाठी खूप महत्त्वाचे ठरते. पालकमधील अल्फा-लिपोइक अॅसिड इन्सुलिन संवेदनशीलता सुधारते. फॅथम जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, पालकमध्ये आढळणारे नायट्रेट कंपाउंड इन्सुलिनची कार्यक्षमता वाढवण्यास मदत करते. पालकाचा समावेश सॅलड, स्मूदी किंवा फ्राईजच्या माध्यमातून करू शकता.
ब्रोकोली
ब्रोकोली ही साखर नियंत्रणासाठी एक उत्तम भाजी आहे. त्यात सल्फोराफेन नावाचे संयुग असते, ते जळजळ कमी करण्यास आणि इन्सुलिनची क्रिया सुधारण्यास मदत करते. सायन्स डायरेक्टमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, ब्रोकोलीचे सेवन हायपरग्लाइसेमिया, इन्सुलिन प्रतिरोध आणि ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करू शकते. त्यात फायबर, व्हिटॅमिन सी आणि के भरपूर प्रमाणात असते, ते रक्तातील साखर आणि रोगप्रतिकारक शक्ती दोन्हीला फायदेशीर ठरते.
शिमला मिरची
रंगीबेरंगी आणि कुरकुरीत शिमला मिरची केवळ चविष्टच नाही, तर आरोग्यासाठीसुद्धा फायदेशीर आहे. त्यामध्ये कॅलरीज आणि कार्बोहायड्रेट्स कमी असतात आणि व्हिटॅमिन सी, बीटा-कॅरोटीन आणि फ्लेव्होनॉइड्स सारख्या अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असतात. राष्ट्रीय आरोग्य संस्थेने केलेल्या अभ्यासात असे दिसून आले की, लाल शिमला मिरचीच्या अर्कामध्ये डायबिटीजविरोधी गुणधर्म असतात, जे शरीरातील रक्तातील साखरेची पातळी संतुलित करण्यास मदत करतात. ते सॅलड, सूप किंवा ग्रील्ड भाज्यांच्या स्वरूपात खाता येईल.
सोयाबीन
डायबिटीजसाठी सोयाबीन हे पचण्यास हलके आणि प्रभावी आहे. यामध्ये कॅलरीज आणि कार्बोहायड्रेट्स कमी असतात आणि फायबर तसंच व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असते. रिसर्च गेटमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, सोयाबीनमधीन फायबर आणि एन्झाइम्स टाइप-२ डायबिटीज नियंत्रित करण्यास मदत करू शकतात. ते उकडून सॅलड किंवा सूपमध्ये घालता येतात.
फ्लॉवर
फ्लॉवरमधील व्हिटॅमिन सी, फोलेट आणि अंटीऑक्सिडंट्स शरीरातील जळजळ आणि ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करतात. हे दोन्ही घटक रक्तातील साखरेची पातळी सामान्य करतात. फ्लॉवरसारख्या क्रूसिफेरस भाज्या नैसर्गिक डायबिटीजविरोधी प्रभाव दाखवतात. फ्राईज, सूप किंवा सॅलड स्वरूपात नियमितपणे याचा आहारात समावेश करू शकता.
