Cricketer Sarfaraz Khan Weight Loss Transformation Secret : भारतीय क्रिकेटपटू सरफराज खानने अवघ्या दीड महिन्यात तब्बल १७ दिले वजन कमी करून सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. त्यातही विशेष गोष्ट म्हणजे त्याने हेवी जिम ट्रेंनिंगवर अवलंबून न राहता, खाण्या-पिण्याच्या सवयींमध्ये बदल केला. गेल्या वर्षी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत सरफराज खानने पदार्पण केले. त्याने भारतासाठी आतापर्यंत सहा कसोटी सामन्यांमध्ये ३७.१० च्या सरासरीने ३७१ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर एक शतक आणि तीन अर्धशतके आहेत. मात्र, बराच काळ तो भारतीय क्रिकेट टीममधून बाहेर आहे; पण आता तो पुन्हा चर्चेत आला आहे. परंतु, यावेळी चर्चेत येण्यामागचे कारण क्रिकेट नाही, तर त्याचा नवा फिट लूक आहे.

सरफराजचा फिटनेस पाहून आता अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. त्यात इंग्लंडचा दिग्गज खेळाडू केविन पीटरसनदेखील सरफराजमधील बदल पाहून आश्चर्यचकित झाला. वृत्तानुसार, सरफराज खानने ४५ दिवसांत त्याचे जवळपास १७ किलो वजन कमी केले आहे.

वजन कमी करण्यासाठी सरफराज खानने त्याच्या आहारात बदल केला आहे. सरफराजने पोळी, भात, साखर, मैदा व बेक्ड फूड खाणे बंद केले. त्याऐवजी त्याने काकडी व ब्रोकोली यांसारखी तंतुमय फळे आणि भाज्या खाण्यास सुरुवात केली. त्याशिवाय प्रोटीनयुक्त ग्रील्ड फिश, चिकन व उकडलेली अंडी तसेच अ‍ॅव्होकॅडोसारख्या निरोगी फॅट असलेल्या पदार्थांचाही आहारात समावेश केला. त्याशिवाय त्याने ग्रीन टी आणि ग्रीन कॉफी पिण्यास सुरुवात केली, तसेच कोल्ड ड्रिंक्स आणि गोड ज्यूस वगैरे पिणे पूर्णपणे बंद केले.

तज्ज्ञ काय सांगतात?

आरोग्य तज्ज्ञ डॉ. मिकी मेहता यांनी दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले की, तुम्ही जिममध्ये कितीही वर्कआउट केलं तरी वजन कमी करण्यात आहाराचा वाटा सुमारे ८० टक्के असतो; तर वर्कआउटचा वाटा फक्त २० टक्के असतो. तुम्ही दिवसभर जे खाता, त्याचा तुमच्या शरीराच्या आकारावर सर्वांत जास्त परिणाम होतो.

कार्बोहायड्रेट्सपासून दूर रहा

कार्बोहायड्रेट्स, विशेषतः पांढरा तांदूळ, साखर व रिफाइंड पीठ यांसारखे रिफाइंड कार्बोहायड्रेट्स हे शरीरासाठी सर्वांत जलद ऊर्जा वाढण्याचे स्रोत आहेत; परंतु त्यांचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास शरीरात इन्सुलिनची पातळी वाढते. त्यामुळे लठ्ठपणा, चयापचय क्रिया मंदावणे व इन्सुलिन रेझिस्टन्स होऊ शकतो. म्हणूनच कमी कार्बोहायड्रेट्सयुक्त पदार्थ अनेकदा तुम्हाला वेगाने फॅट बर्न करण्यास आणि रक्तातील साखर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात.

त्यामुळे डॉ. मेहता यांनी कार्बोहायड्रेट्सयुक्त पदार्थांचे सेवन पूर्णपणे बंद न करण्याची शिफारस करतात. तुमच्या दैनंदिन कॅलरीजमध्ये ४५ ते ६५ टक्के कार्बोहायड्रेट्स असले पाहिजेत, वजन कमी करण्यासाठी घेत असलेल्या आहारात दररोज सुमारे १००-१५० ग्रॅम कार्बोहायड्रेट्सची आवश्यकता असते. बाजरी, मूग डाळ खिचडी, सूप व फायबरयुक्त भाज्या यांसारखे कार्बोहायड्रेट्स पचण्यास जास्त वेळ घेतात, भूक नियंत्रित करण्यास मदत करतात. लवकर जेवणे, अधूनमधून उपवास आणि गरम हर्बल टी यांसारख्या सवयींसह फूड फॅट्सचा चयापचय क्रियेवर परिणाम होतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वजन कमी करण्यासाठी डेली रुटीन (Sarfaraz Khan’s Weight Loss Secret)

हलक्याफुलक्या वर्कआउटने सुरुवात करा आणि हळूहळू वेग वाढवा. अधिक वेळच्या व्यायामाऐवजी दिवसातून दोन लहान सत्रांमध्ये व्यायाम करण्याचा प्रयत्न करा. कठीण, दमवणारे वर्कआउट रुटीन फॉलो करण्याऐवजी लयबद्ध, सोप्या शारीरिक हालचालींवर लक्ष केंद्रित करा. तुम्ही कमी कार्बोहायड्रेट्सयुक्त आहारासह अशा प्रकारे वर्कआउट केल्यास बरेच फायदे मिळतील. त्यामुळे तुम्हाला एक सेट रुटीन तयार करण्यास मदत होते. तसेच शरीरात ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी निरोगी, प्रथिनयुक्त पदार्थ खाण्यावर लक्ष केंद्रित करा. त्यामुळे तुम्हाला जास्त भूकही लागणार नाही