आपले व्यक्तिमत्त्व कितीही सुंदर असले, कितीही चांगले कपडे घातले तरी अंगाला दुर्गंधी आली, तर लोक आपल्या जवळ येण्याचे टाळतात. पावसाळ्यात आर्द्रतेमुळे खूप घाम येतो आणि घामाला वास येऊ लागतो. घाम येणे हा शरीराला थंड ठेवण्याचा नैसर्गिक मार्ग आहे; पण घाम आल्यानंतर सहा तासांनी अंगाला दुर्गंधी येऊ लागते. घामाची दुर्गंधी टाळण्यासाठी घरगुती उपाय करून पाहता येतात. अंघोळ आणि स्क्रबिंगमुळे जंतू, घाण व दुर्गंधी दूर होण्यास मदत होते. दरम्यान, इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटल्समधील त्वचाविज्ञानातील वरिष्ठ सल्लागार डॉ. डी. एम. महाजन यांनी दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे.
परफ्यूम तुमच्या त्वचेवर घासण्याऐवजी नैसर्गिकरीत्या सुकू द्या. कारण – यामुळे सुगंध अखंड टिकून राहतो
स्वच्छतेला प्राधान्य द्या – चांगला बेस असणे आवश्यक आहे. घाम, घाण व दुर्गंधी निर्माण करणारे जीवाणू नष्ट करण्यासाठी दररोज सुगंधित बॉडी वॉश किंवा साबणाने आंघोळ करण्याचा सल्ला डॉ. महाजन देतात. काख, मांड्या व पाय यांना घाम येण्याची शक्यता असलेल्या भागांकडे जास्त लक्ष द्या.
योग्य डिओडोरंट निवडा – ताजेपणा टिकवून ठेवण्यात डिओडोरंट महत्त्वाची भूमिका बजावते. तुमच्या घामाच्या ग्रंथींना अडथळा न आणता, प्रभावीपणे दुर्गंधी दूर करणारा असा डिओडोरंट निवडा, असे डॉ. महाजन म्हणाले. संवेदनशील त्वचेसाठी, नैसर्गिक किंवा हायपोअलर्जेनिक पर्याय निवडा. सर्वोत्तम परिणामांसाठी आंघोळ केल्यानंतर लगेच स्वच्छ, कोरड्या त्वचेवर डिओडोरंट लावा.
तुमचे कपडे स्वच्छ ठेवा

नियमितपणे सुगंधित डिटर्जंटने धुवा आणि स्वच्छ ठेवा. त्यांना सुगंधी ठेवण्यासाठी ड्रायर शीट घाला. निलगिरीचे तेल पाण्यात मिसळून या पाण्याने आंघोळ केल्याने घामाचा वास दूर होतो. त्याशिवाय हे तेल जीवाणूंच्या वाढीस प्रतिबंध करते आणि बुरशीनाशकदेखील आहे, जे कोणत्याही प्रकारच्या त्वचेच्या संसर्गापासून आपले संरक्षण करू शकते. त्यामुळे अंघोळ करताना पाण्यात निलगिरीचे तेल टाकून, या पाण्याने अंघोळ करावी. असे करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

​रॉक सॉल्ट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रॉक सॉल्टच्या पाण्याने अंघोळ केल्याने जीवाणूंचे संक्रमण कमी होण्यास मदत होते. रॉक सॉल्टमुळे सक्रिय जीवाणू नष्ट होतात आणि घामाचा वासही कमी होतो. त्याशिवाय रॉक सॉल्टची खास गोष्ट म्हणजे ते शरीरावरील मुरमे कमी करण्यासाठीदेखील उपयुक्त आहे. त्यामुळे अंघोळीच्या पाण्यात रॉक मीठ टाका आणि त्या पाण्याने अंघोळ करा.