Diy Barley Water Summer Benefits : सध्या कडक उन्हाळा सुरू झाला असून, या काळात लोकांनी स्वत:ला निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यसाठी आरोग्यदायी पेयांचे सेवन करणे गरजेचे आहे. यंदा उन्हाळ्यात तुम्हाला डिहायड्रेशन आणि विविध आजारांपासून दूर राहायचे असेल, तर कोल्ड ड्रिंक्स पिणे टाळून रोज एक ग्लास बार्लीचे पाणी पिऊ शकता.

बार्लीच्या पाण्याच्या सेवनाने शरीर हायड्रेटच राहत नाही, तर त्याचे अनेक आरोग्यदायी फायदेदेखील मिळतात. बार्लीच्या सेवनाने नेमके कोणते फायदे मिळतात, याविषयी दी इंडियन एक्स्प्रेसने काही आहारतज्ज्ञांनी दिलेल्या माहितीच्या आधारे जाणून घेऊ…

आहारतज्ज्ञ लीमा महाजन यांच्या मते, अनेक वर्षांपासून मूत्रमार्गाचा संसर्ग (UTI), केस अकाली पांढरे होणे, किडनी स्टोन हे त्रास होत असतील तर आणि स्तनदा मातांना दुधाचा पुरवठा वाढविण्यासाठी बार्लीच्या पाण्याचे सेवन केले जाते.

महाजन यांच्या मते, बार्लीच्या बिया पाण्याचे उकळून, ते पाणी प्यायल्यास तुम्हाला त्वचेसंबंधित आजार, मुरमे आणि चेहऱ्यावरील छिद्रे कमी करण्यासाठी मदत मिळते.

उन्हाळ्यात अशा प्रकारे प्या बार्लीचे पाणी

१) बार्ली
२) पाणी
३) मीठ
४) लिंबू

बनविण्याची पद्धत

१) बार्ली काही वेळ धुऊन, त्यातील पाणी काढून टाका. त्यानंतर स्वच्छ झालेल्या बार्लीच्या बिया ४.५ कप पाण्यात टाकून सुमारे सहा ते आठ तास भिजत ठेवा.
२) त्यानंतर हे पाणी १० मिनिटे उकळवा.
३) मग बार्ली त्यातील पोषक घटक पाण्यात सोडेल. त्यामुळे पाणी मलाईदार पांढरे दिसेल. आता गॅस बंद करा.
४) अशा प्रकारे तुम्ही बार्लीच्या बिया बाजूला करून, त्याचे पाणी गाळून घ्या.
५) बार्लीचे पाणी थंड होऊ द्या. त्यानंतर तुम्ही ते पाणी थेट पिऊ शकता किंवा त्यात लिंबाचा रस आणि चवीनुसार मीठ घालू शकता.

बार्लीचे पाणी पिण्याचे खरचं काही फायदे आहेत का?

डॉ. अग्रवाल यांच्या मते, उन्हाळ्यात रोज तुम्ही बार्लीचे पाणी पिऊ शकता. कारण- त्यात असंख्य आरोग्यदायी फायदे आहेत.

उन्हाळ्यात बार्लीचे पाणी पिणे आरोग्यासाठी का चांगले आहे?

१) हायड्रेशन : उन्हाळ्याच्या दिवसांत हायड्रेटेड राहणे महत्त्वाचे आहे आणि बार्लीचे पाणी तुमची तहान शमविण्यास प्रभावीपणे मदत करू शकते. हे असे पेय आहे, जे तुम्हाला हायड्रेटेड ठेवते आणि इलेक्ट्रोलाइट्सचा पुरवठा करते.

२) शरीरात थंडाव्याची निर्मिती : बार्लीच्या पाण्यात शरीरात नैसर्गिकरीत्या थंडावा निर्माण करण्याचे गुणधर्म असतात; ज्यामुळे तुम्हाला उष्णतेवर मात करता येते. डॉ अग्रवाल म्हणाले की, शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करू शकते. विशेषत: उन्हाळ्याच्या दिवसांत बार्लीचे पाणी प्यायल्यास सुखदायक आणि ताजेतवाने वाटते.

३) पचनक्रिया सुधारते : बार्लीचे पाणी त्याच्या उत्कृष्ट पाचक गुणधर्मांसाठी ओळखले जाते. त्यात विरघळणारे फायबर असते, जे निरोगी पाचन तंत्र राखण्यास मदत करते. डॉ. अग्रवाल म्हणाले की, आहारातील बदलांमुळे उन्हाळ्यात जाणवणाऱ्या बद्धकोष्ठता, सूज येणे व अपचन यांसारख्या समस्यांपासून मुक्त होण्यास मदत करू शकते,

४) पौष्टिक मूल्य : बार्ली हे पौष्टिक धान्य आहे. तुम्ही बार्लीच्या बिया पाण्यात उकळल्यावर, त्यातून विविध आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे बाहेर पडतात. डॉ. अग्रवाल यांनी सांगितले की, बार्लीच्या बिया फायबर, जीवनसत्त्व बी, लोह, मॅग्नेशियम व सेलेनियमचा चांगला स्रोत आहे. हे पोषक घटक एकंदर आरोग्य आणि ऊर्जा पातळी वाढविण्यासाठी फायदेशीर आहेत.

५) वजन व्यवस्थापन : जर तुम्ही उन्हाळ्यात तुमचे वजन नियंत्रणात ठेवू इच्छित असाल किंवा त्याचे व्यवस्थापन करू इच्छित असाल, तर बार्लीचे पाणी तुमच्या आहारासाठी उपयुक्त ठरू शकते. डॉ. अग्रवाल यांनी स्पष्ट केले की, बार्लीच्या पाण्यात फाय फायबर असते. त्यामुळे परिपूर्णतेची भावना वाढते, खाण्याची अनावश्यक लालसा कमी होते आणि स्नॅकिंग करते. हे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यासही मदत करू शकते.

६) डिटॉक्सिफिकेशन : बार्लीचे पाणी शरीरासाठी नैसर्गिक डिटॉक्सिफायर म्हणून काम करते. हे शरीरातील विषारी पदार्थ आणि टाकाऊ पदार्थ बाहेर काढण्यासह किडनीच्या निरोगी कार्यास प्रोत्साहन देते आणि मूत्रमार्गाच्या संसर्गाचा धोका कमी करण्यास मदत करते.

७) त्वचेचे आरोग्य : बार्लीच्या पाण्यात अँटिऑक्सिडंट्स असतात; जे ऑक्सिडेटिव्ह तणावाचा सामना करण्यास मदत करतात आणि त्वचेचे मुक्त रॅडिकल्सपासून होणारे नुकसान होण्यापासून संरक्षण करतात. डॉ. अग्रवाल म्हणाले की, बार्लीच्या पाण्याचे नियमित सेवन केल्याने त्वचा निरोगी राहण्यासह चमकदार होते. मुरमे आणि डाग यांसारख्या त्वचेच्या समस्या कमी होतात.

कोणी टाळावे बार्लीच्या पाण्याचे सेवन

ग्लुटेन सेन्सिटिव्हीटी, ऑटोइम्युन विकार व सेलिअॅक असे आजार असलेल्या लोकांनी बार्लीचे पाणी पिणे टाळले पाहिजे.

ग्लुटेन हे एक प्रोटीन आहे; जे बार्ली, गहू व राई यांसह काही धान्यांमध्ये आढळते. ग्लुटेन सेन्सिटिव्ह असलेल्या व्यक्तींनी ग्लुटेनचे सेवन केल्याने सूज येणे, ओटीपोटात दुखणे, अतिसार व थकवा यांसारखी लक्षणे दिसू शकतात, असे मुंबईतील परेल येथील ग्लेनेगल हॉस्पिटल्सचे इंटरनल मेडिसिनचे वरिष्ठ सल्लागार डॉ. मंजुषा अग्रवाल म्हणाल्या.

सेलिअॅक रोग असलेल्या व्यक्तींमध्ये ग्लुटेनचे सेवन केल्याने लहान आतड्यांच्या अस्तरांना नुकसान होऊ शकते; ज्यामुळे पोषक घटकांचे शोषण आणि इतर गुंतागुंत होऊ शकते, असे डॉ. अग्रवाल यांनी सांगितले. सेलिअॅक रोग असलेल्या लोकांनी त्यांची स्थिती व्यवस्थापित करण्यासाठी आणि त्यांच्या आरोग्यास होणारे आणखी नुकसान टाळण्यासाठी ग्लुटेनमुक्त आहाराचे सेवन करणे फार गरजेचे असते.

हाशिमोटोच्या थायरॉईडायटिस किंवा संधिवात यांसारख्या आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांनी ग्लुटेनचे सेवन केल्यास परिस्थिती बिघडू शकते. त्यामुळे शरीरात दाहक प्रतिक्रिया निर्माण होऊ शकते. “सूप, सॉस आणि विशिष्ट प्रकारचे अल्कोहोल यांसारख्या विविध प्रक्रिया केलेल्या पदार्थांमध्ये बार्लीचा वापर केला जातो. त्यामुळे कोणताही पदार्थ खरेदी करताना तो ग्लुटेन-फ्री आहे की नाही हे तपासून मगच खरेदी करा.