scorecardresearch

Premium

पोट फुगण्याचा, ब्लोटिंगचा सतत त्रास होतोय? दुर्लक्ष करू नका, असू शकते ‘या’ आजाराचे लक्षण; पाहा

सध्या प्रत्येकजण पोट सपाट हवे आहे यावर लक्ष केंद्रित करत असताना, पोट नक्की कोणत्या कारणांमुळे फुगत आहे याकडे लक्ष देणे फार गरजेचे आहे. यावर डॉक्टरांचे काय म्हणणे आहे पाहा.

do not ignore stomach bloating
पोट फुगण्याकडे, ब्लोटिंगकडे दुर्लक्ष करू नका. डॉक्टर काय म्हणतात पाहा. [photo credit – Freepik]

कधीकधी आपण सकाळी झोपेतून उठतो आणि आपल्याला आपले पोट असे जड आणि फुगल्यासारखे वाटते. अशा जड पोटामुळे दिवसाची सुरुवात अगदी विचित्र आणि अस्वस्थ भावनेने होते. पण, खरंच पोट असे जड होणे, टम्म फुगलेले वाटणे वाईट आहे का? की यामधून आपल्याला नैसर्गिक पद्धतीने शरीराबद्दल कोणते संकेत मिळत असतात?

“पोट फुगणे किंवा ब्लॉटिंग हे खरंतर वाईट म्हणता येत नाही. कदाचित तुमच्या शरीरात खोलवर दडून बसलेल्या विशेषतः कर्करोगांसारख्या आरोग्याच्या समस्यांबद्दल हे संकेत देत असण्याची शक्यता असते.” असे बंगळुरू येथील एचसीजी कॅन्सर हॉस्पिटलमधील वैद्यकीय ऑन्कोलॉजिस्ट आणि गॅस्ट्रोइंटेस्टाइनल कॅन्सर स्पेशलिस्ट [ medical oncologist and gastrointestinal cancer specialist, HCG Cancer Hospital, Bangalore,] डॉक्टर श्रीनिवास बी. जे. यांचे म्हणणे आहे.

Stomach Gas
पोटात गॅस वाढवतात ‘हे’ ४ पदार्थ; पण ‘हा’ उपाय केल्यास मिळू शकतो झटक्यात आराम
If You Skip Sugar Jaggery All Sweets What happens to your body on a no-sugar diet for a year like Kartik Aaryan ft Chandu Champion
वर्षभर साखर न खाल्ल्याने शरीराचं काय बदल होतात? कार्तिक आर्यनचा प्रयोग तुमच्या कामी येणार का?
How To Stop Constant Burping Acid Reflex Doctor Suggested Remedies for Quick Relief in Acidity That Lead to Intestinal Disease sign
वारंवार ढेकर येत असल्यास डॉक्टरांचे ‘हे’ ७ उपाय देऊ शकतात आराम; आतड्यांच्या विकाराचे लक्षण कसे ओळखाल?
liver failure sign
लिव्हर खराब झाल्यास पायात दिसतात ‘ही’ ५ लक्षणे; वेळीच धोका ओळखा

सध्या सर्वजण पोट सपाट करण्यामागे धावत आहेत. त्यामुळे कदाचित पोट फुगण्यासारख्या गोष्टींची चिंता वाढलेली असू शकते. परंतु, आपले पोट साधारण गोष्टींमुळे फुगले आहे की शरीरात दडलेल्या कोणत्या विविष्ट वीषाणूंमुळे असे झाले आहे, यामधला फरक ओळखणे महत्त्वाचे असते. “ठराविक अन्नपदार्थांमुळे, खाण्या-पिण्याच्या सवयींमुळे किंवा अजून अशा काही किरकोळ कारणांमुळे कधीतरी पोट फुगू शकते”, असे बंगळुरू येथील चिन्मय मिशन हॉस्पिटलमधील गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट सल्लागार [consultant gastroenterologist, Chinmaya Mission Hospital, Bangalore,], डॉक्टर एम. एस संदीप यांनी द इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या माहितीत सांगितले.

हेही वाचा : तुम्हीही चहामध्ये साखरेऐवजी गूळ घालून पित आहात? मग पाहा, हे गुळाच्या चहाचे पाच आरोग्यदायी फायदे…

ब्लोटिंग किंवा पोट फुगण्यासारख्या समस्येला तुमचा आहार कारणीभूत असू शकतो. ज्या पदार्थांमधून गरजेपेक्षा जास्त प्रमाणात फायबर मिळते, असे पदार्थ खाण्याने, कार्बोनेटेड पेयांच्या सेवनाने किंवा अतिप्रमाणात जेवण्याने ब्लोटिंगची समस्या उद्भवू शकते. यासोबतच भराभर खाणे किंवा व्यवस्थित चावून न खाल्ल्यासदेखील हा त्रास होऊ शकतो, असे डॉक्टर संदीप सांगतात.

आहाराबद्दल बोलत असताना, “शरीरात पाण्याची योग्य पातळी राखल्याने म्हणजेच हायड्रेशनकडे लक्ष दिल्याने, व्यायाम केल्याने ब्लोटिंगपासून आराम मिळू शकतो. त्यासोबतच पोटाच्या आरोग्यासाठी, प्रोबायोटिक्स [शरीराला आवश्यक असणारे सूक्ष्मजीव] देखील फायदेशीर ठरतात”, असेदेखील ते म्हणतात.

पोट फुगणे किंवा ब्लोटिंग हे शरीरासाठी हानिकारक आहे हे कसे समजते?

पोट वारंवार फुगणे, त्याची तीव्रता [intensity] आणि त्यासोबतची कारणे यावर लक्ष ठेवा. काही पदार्थ खाल्ल्यानंतर पोट फुगणे ही सामान्य बाब आहे. परंतु, जर पोट वरचेवर फुगत असेल आणि त्यासोबत पोटदुखी, पोट नियमित किंवा व्यवस्थित साफ न होणे, वजन घटणे यांसारख्या गोष्टीसुद्धा होत असतील, तर मात्र हा चिंतेचा विषय आहे. “दीर्घकाळ ब्लोटिंग/ पोट फुगणे म्हणजे, आयबीएस [IBS-इरिटेबल बॉवेल सिंड्रोम] किंवा विशिष्ट पदार्थ शरीराला चालत नसल्याची लक्षणे असून, यासाठी वैद्यकीय चाचण्यांची किंवा वैद्यकीय तपासणीची आवश्यकता असल्याचे समजते”, असे डॉक्टर संदीप म्हणतात.

हेही वाचा : कितीही झोपलात तरी ती पाच मिनिटांची झोप सोडवत नाही ना? मग संशोधन काय सांगतेय ते एकदा पाहा

त्यासोबतच काही केसेसमध्ये ही गॅस्ट्रोइंटेस्टाइनल कर्करोगाची [gastrointestinal cancers] लक्षणेदेखील असू शकतात, अशी अधिक माहिती डॉक्टर श्रीनिवास देतात. “ट्युमरमुळे पचनमार्ग दबल्यासारखा होणे किंवा ओटीपोटामध्ये पाणी साठून राहिल्याची ही लक्षणे असू शकतात. कर्करोगामुळे उद्भवणाऱ्या ब्लोटिंगवर हेल्थकेअर व्यावसायिकांनी सांगितलेल्या कर्करोग थेरपीद्वारे अशा घटक लक्षणांवर उपचार करणे योग्य असते, असा सल्ला डॉक्टर श्रीनिवास यांनी दिला आहे.

अशा गोष्टींसाठी डॉक्टरांची भेट केव्हा घ्यावी?

ब्लोटिंग/ पोट फुगण्याची समस्या वरचेवर होऊ लागणे, त्यासोबत पोट दुखणे, अचानक वजन कमी होणे, सतत थकवा येणे, पोट साफ होण्याचे तंत्र वारंवार बिघडणे यांसारखी लक्षणे दिसू लागल्यास त्वरित डॉक्टरांची भेट घ्यावी. यामध्ये जर कर्करोगाची लक्षणे असतील तर ती जितकी लवकर ओळखता येतील तितका त्यावर प्रभावीपणे उपचार करणे सोपे होते. त्यामुळे वरचेवर होणाऱ्या ब्लोटिंग, पोट फुगण्याकडे दुर्लक्ष करू नका आणि वेळोवेळी डॉक्टरांकडून आपली तपासणी करत राहा.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Do not ignore the bloated stomach it might be showing you the symptoms of underlying health issues dha

First published on: 10-12-2023 at 19:23 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×