रोजच्या धावपळीच्या, जीवनात अनेकदा सकाळच्या वेळी रोज नाश्ता करणे शक्य होत नाही. अशा वेळी आपण पटकन एखादे फळ खातो आणि दिवसाला सुरुवात करतो. फळे ही आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. पण, कोणतेही फळ खाण्याची एक योग्य वेळ असते. अनेक जण सकाळी केळे खातात. पोषक घटकांनी समृद्ध असलेली केळी हा बहुतांशी परिपूर्ण नाश्ता मानला जातो. पण, तुम्ही केळे रिकाम्या पोटी खावे का? चला, याबाबत तज्ज्ञांकडून जाणून घेऊया. “केळी नैसर्गिक साखर, पोटॅशियम व फायबर यांनी समृद्ध असतात, ज्यामुळे ते एक उत्तम ऊर्जावर्धक फळ ठरते. पण, रिकाम्या पोटी ते खाणे आदर्श असू शकत नाही,” असे क्लिनिकल आहारतज्ज्ञ गरिमा गोयल यांनी सांगितले.
केळ्यामध्ये विशेषतः पिकलेल्या केळ्यामध्ये त्यांच्या नैसर्गिक साखरेमुळे (ग्लुकोज, फ्रुक्टोज व सुक्रोज) उच्च ग्लायसेमिक इंडेक्स असतो. “रिकाम्या पोटी केळे खाल्ल्यामुळे रक्तातील साखरेमध्ये जलद वाढ होऊ शकते. त्यानंतर अचानक रक्तशर्करेच्या या पातळीत घट होऊ शकते, ज्यामुळे तुम्हाला लवकरच आळस येऊन, भूक लागते,”अस गोयल यांनी सांगितले.
पोषक तत्वांचे शोषण बिघडते (Disrupts nutrient absorption)

केळ्यामध्ये मॅग्नेशियम व पोटॅशियम यांचे प्रमाण जास्त असते, स्नायू आणि मज्जातंतूंच्या कार्यासाठी ही आवश्यक खनिजे आहेत. पण, सकाळी फक्त त्यांचे सेवन केल्याने रक्तप्रवाहात या खनिजांची अचानक वाढ होऊ शकते. त्यामुळे असंतुलन निर्माण होण्याची शक्यता असते, विशेषतः मूत्रपिंडाच्या समस्या असलेल्या रुग्णांमध्ये हा त्रास जास्त होतो.

पचनास त्रास होऊ शकतो (May cause digestive problems)

रिकाम्या पोटी केळी खाल्ल्याने काही लोकांना पोटात सूज येणे, मळमळ होणे किंवा फायबरच्या प्रमाणामुळे पोटात हलका त्रास होऊ शकतो. “हे विशेषतः कच्ची केळी खाल्ल्यास त्याचा परिणाम अधिक असतो. केळ्यामध्ये जास्त प्रतिरोधक स्टार्च असतो, जो पचण्यास जास्त वेळ घेतो,” गोयल म्हणाले.

काय मदत करू शकते? (What can help?)

जर तुम्हाला सकाळी केळी खायला आवडत असतील, तर प्रथिने किंवा आरोग्यदायी फॅट्स जसे की नट्स (सुका मेवा) बिया, दही किंवा ओट्ससह एकत्र सेवन करा. “त्यामुळे साखरेचे प्रमाण संतुलित होते. त्यामुळे तुमचे पोट जास्त काळ भरलेले राहते आणि उर्जेचा क्षय टळतो,” गोयल म्हणाले.

कोणता केळे सर्वोत्तम आहे? (Which type of banana is best?)

  • पिकलेले केळे (तपकिरी डागांसह पिवळे) : हे केळे पचण्यास सोपे व गोड असते. त्यामध्ये अँटिऑक्सिडंट्सही जास्त असतात; परंतु त्यामुळे साखरेचे प्रमाण जलद वाढू शकते.
  • कच्चे केळे (हिरवे-पिवळे) : या केळ्यामध्ये प्रतिरोधक स्टार्चचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे पचन मंदावून आणि दीर्घकाळ टिकणारी ऊर्जा प्रदान होते. मधुमेहींसाठी चांगले; परंतु काही लोकांसाठी ते पचण्यास कठीण असू शकते.
  • लाल केळे : जास्त अँटिऑक्सिडंट्स, कमी ग्लायसेमिक इंडेक्स आणि आतड्याच्या आरोग्यासाठी एक चांगला पर्याय.
  • लहान केळे (इलायची / केरळी केळी) : त्यामध्ये साखरेचे प्रमाण संतुलित असते आणि पचन चांगले होण्यासाठी आयुर्वेदात त्यांची शिफारस केली जाते.

जर तुम्हाला मधुमेह किंवा इन्सुलिन प्रतिरोधकता असेल, तर कच्चे किंवा अर्धे पिकलेले केळे निवडा, कारण- ते साखर अधिक हळूहळू सोडतात.

एका वेळी एकापेक्षा जास्त केळी का खाऊ नयेत?(Why shouldn’t you eat more than one banana at a time?)

एकाच वेळी दोन किंवा अधिक केळी खाण्याचा मोह होऊ शकतो; परंतु संयम महत्त्वाचा आहे, असे गोयल यांनी ठामपणे सांगितले.

कारण असे आहे:

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
  • जास्त साखरेचे सेवन – एका मध्यम केळ्यामध्ये सुमारे १४ ग्रॅम साखर असते. एकापेक्षा जास्त केळी खाल्ल्याने जास्त साखरेचे सेवन केले जाऊ शकते, जे आदर्श नाही, विशेषतः इन्सुलिन संवेदनशीलता असलेल्या लोकांसाठी.
  • उच्च पोटॅशियम पातळी (हायपरकेलेमियाचा धोका) -जास्त केळी खाल्ल्याने रक्तातील पोटॅशियमची पातळी जास्त प्रमाणात वाढू शकते, ज्यामुळे हृदय आणि मूत्रपिंडाच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो. असे घडण्याची शक्यता दुर्मिळ असते.
  • पोट फुगणे आणि पचन समस्या – केळ्यामध्ये फायबर आणि प्री-बायोटिक्स भरपूर असतात. “आतड्याच्या आरोग्यासाठी उत्तम असले तरी एकाच वेळी जास्त खाल्ल्याने पोटफुगी किंवा गॅस होऊ शकतो,” असे गोयल म्हणाले.
  • बहुतेक लोकांनी एका वेळी फक्त एकच केळे खावे. कारण ते सहसा त्यांच्या शरीराच्या गरजांसाठी पुरेसे असते. पण, जर तुम्ही शारीरिक हालचाल जास्त होत असेल किंवा तुम्ही खेळाडू असाल तर तुम्ही एकावेळी एकापेक्षा जास्त केळी खाऊ शकता. अशा लोकांना जास्त केळी खाल्याने त्रास होत नाही कारण त्यांचे शरीर जास्त ऊर्जा आणि पोषक तत्वांचा वापर करते.

तरीही आरोग्यदायी आहार सुनिश्चित करण्यासाठी इतर प्रकारच्या अन्नासह केळीचे संतुलन राखणे महत्त्वाचे आहे.

केळी योग्य प्रकारे कशी खावी (How to eat bananas properly)

  • केळी रिकाम्या पोटी खाऊ नका- त्यांचे प्रथिने किंवा फॅट्सचे सेवन करा
  • योग्य प्रकार निवडा- मंद स्वरूपातील ऊर्जा मिळवण्यासाठी कच्चे केळे; तर जलद ऊर्जा मिळविण्यासाठी पिकलेले केळे खा.
  • साखर जास्त प्रमाणात आणि पोटफुगी टाळण्यासाठी एका वेळी एकच केळे खा.
  • केळे दूध किंवा आइस्क्रीममध्ये मिसळणे टाळा. ते पचन किंवा रक्तातील साखरेच्या पातळीसाठी आदर्श नाही.
  • संतुलित, पौष्टिक आहारासाठी केळी सुका मेवा, बिया किंवा दह्यासह खा.