Spicy Food Heart Health: अनेक भारतीयांना झणझणीत तिखट पदार्थ खायला खूप आवडतात; पण सतत तिखट पदार्थ खाणं आरोग्यासाठी योग्य आहे का? हृदयाच्या आरोग्यावर तिखट अन्नाच्या होणाऱ्या परिणामांबद्दल जुनी चर्चा सुरूच आहे. काहींना ते हृदयासाठी फायदेशीर असल्याचे वाटते; तर काहींना त्याच्या संभाव्य तोट्यांबद्दल चिंता वाटते.

हैदराबाद येथील हायटेक सिटीमधील केअर हॉस्पिटल्सचे कन्सल्टंट कार्डिओलॉजिस्ट डॉ. विनोद यांच्या मते, मसालेदार अन्नाचे नियमित सेवन आणि हृदयविकाराचा झटका यांच्यात थेट संबंध नाही . खरे तर,तिखट पदार्थांचे मध्यम सेवन अनेक आरोग्यदायी फायदे देऊ शकते.

तिखट अन्नाचे फायदे

दाहकविरोधी आणि अँटिऑक्सिडंट्स गुणधर्म : मिरच्यांमध्ये उष्णतेसाठी जबाबदार असलेले संयुग कॅप्सेसिनमध्ये शक्तिशाली दाहकविरोधी आणि अँटिऑक्सिडंट्स गुणधर्म आहेत. हे गुणधर्म दाह आणि ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करण्यास मदत करू शकतात, जे दोन्ही हृदयरोगाशी जोडलेले आहेत.

सुधारित चयापचय : ​​कॅप्सेसिन चयापचय वाढवू शकते, जे वजन व्यवस्थापनात मदत करू शकते आणि हृदयरोगाचा धोका कमी करू शकते.

रक्तदाब कमी करण्याची शक्यता : काही अभ्यासांवरून असे दिसून आले आहे की, कॅप्सेसिन रक्तदाब कमी करण्यास मदत करू शकते, ज्यामुळे हृदयावरील ताण कमी होतो.

सावधगिरी आणि विचार :

तिखट अन्नाचे संभाव्य फायदे असले तरी ते मर्यादित प्रमाणात सेवन करणे महत्त्वाचे आहे. जास्त तिखट पदार्थांचे जास्त सेवन केल्याने पचन समस्या आणि अस्वस्थता निर्माण होऊ शकते, ज्याचा अप्रत्यक्षपणे हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

ज्या व्यक्तींना हृदयरोग किंवा संवेदनशील पचनसंस्था आहे त्यांनी तिखटाचे सेवन लक्षणीयरीत्या वाढविण्यापूर्वी आरोग्य सेवा व्यावसायिकांचा सल्ला घेणे उचित ठरेल.

तुमच्या आहारात तिखट पदार्थांचा समावेश करणे :

जर तुम्हाला तिखट अन्न आवडत असेल, तर ते तुमच्या आहारात सुरक्षितपणे समाविष्ट करण्यासाठी येथे काही टिप्स आहेत, असे डॉ. विनोद म्हणतात:

हळूहळू सुरुवात करा : तुमच्या शरीराला जुळवून घेण्यासाठी हळूहळू तुमच्या आहारात तिखट पदार्थांचा समावेश करा.

सौम्य ते मध्यम मसाले निवडा : बेल मिरी, पेपरिका व मिरचीसारखे मसाले निवडा, जे जास्त उष्णता न देता चव देतात.

दाहकविरोधी मसाल्यांचा वापर करा : दाह कमी करण्यासाठी तुमच्या स्वयंपाकात हळद, आले व लसूणसारखे मसाले समाविष्ट करा.

या पदार्थांनी संतुलन राखा : पचनसंस्थेला आराम देण्यासाठी दही, अॅव्होकॅडो किंवा काकडीसारख्या थंड पदार्थांसह मसालेदार पदार्थांचे सेवन करा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हायड्रेटेड राहा : भरपूर पाणी प्यायल्याने पचनातील कोणत्याही त्रासापासून मुक्तता मिळू शकते. या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून, तुम्ही तुमच्या हृदयाच्या आरोग्याला प्राधान्य देताना मसालेदार अन्नाच्या चवीचा आस्वाद घेऊ शकता.