फायब्रोमायल्जिया हा एक आजार नसून सिंड्रोम आहे, ज्यामधे वेदना आणि वेदनेशी संबंधित अनेक लक्षणं दिसून येतात. फायब्रोमायल्जिया सिंड्रोम (एफएमएस) ही जैवरासायनिक, न्यूरोएंडोक्राइन आणि फिजिओलॉजिकल समस्या आहे, ज्यामुळे वेदनेचं प्रोसेसिंग आणि आकलन म्हणजेच इंटरप्रिटेशन व्यवस्थित होत नाही. आता याची लक्षणं, निदान आणि उपचार काय असतात ते समजून घेऊया.

फायब्रोमायल्जिया सिंड्रोम (एफएमएस) ची लक्षणं
मसल पेन (शरीरातील मोठे आणि महत्वाचे स्नायू सतत दुखतात), विशेषतः मान, कंबरदुखी इत्यादी
प्रचंड शारीरिक आणि मानसिक थकवा (विशेषतः सकाळी उठल्यावर प्रचंड थकवा जाणवणं)
सकाळी उठल्यावर जाणवणारा मसल स्टीफनेस, स्नायू आखडून जाणे, जसा जसा दिवस पुढे जातो तसं वेदना आणि स्टीफनेस कमी होणं
चिंता, नैराश्य, उदास वाटणं
झोपेचं प्रमाण आणि गुणवत्ता दोन्ही कमी होणं
आवाज, गोंधळ, तापमान, यामुळे अंगदुखी वाढणं
डोकेदुखी
स्ट्रैस किंवा फिजिकल अॅक्टिविटी मुळे वेदना वाढणे, जास्त अंगदुखी होणं
सतत सांधे आणि स्नायू जड वाटणं
उठ बस किंवा हालचाली कष्टदायक वाटणं
याशिवाय काही सिसटेमिक लक्षणं दिसून येतात जसं की बीपी वाढणे किंवा कमी होणं
वारंवार शौचास किंवा लघवीस जावे लागणे
क्वचितप्रसंगी बद्धकोष्ठता, दृष्टिदोष

फायब्रोमायल्जिया सिंड्रोमचं (एफएमएस) निदान
जेव्हा खालील सर्व निकष पूर्ण केले जातात तेव्हा प्रौढांमध्ये फायब्रोमायल्जियाचे निदान केल जाऊ शकतं. व्यापक वेदना निर्देशांक (WPI) ≥7 आणि लक्षण तीव्रता स्केल (SSS) स्कोअर ≥5 किंवा सामान्यीकृत वेदना, ५ पैकी किमान ४ क्षेत्रांमध्ये वेदना म्हणून परिभाषित केले जाते. लक्षणं किमान ३ महिन्यांपासून समान पातळीवर उपस्थित आहेत. फायब्रोमायल्जियाचं निदान झालं तरीही इतर वैद्यकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण आजार नाकारता येत नाहीत.

फायब्रोमायल्जिया सिंड्रोमचे (एफएमएस) उपचार
फिजिओथेरपी- सगळ्यात महत्वाचा उपचार यात प्रामुख्याने पेन एड्युकेशन, एक्झरसाइज थेरपी आणि अॅक्टिविटी पेसिंग यांचा समावेश होतो.
-पेन एड्युकेशन ज्यात आपण फायब्रोमायल्जिया बद्दल पेशंट ला समजेल अशा पद्धतीने माहिती देतो, व्हेन यू नो व्हाय यू हर्ट, यू हर्ट लेस! फायब्रोमायल्जिया सारख्या क्लिष्ट आजाराची प्रोसेस आणि कारणं लक्षात आली की त्यावरचे उपाय पेशंटला अधिक चांगल्या प्रकारे अमलात आणता येतात,
एक्झरसाइज थेरपी- प्रत्येक फायब्रोमायल्जिया पेशंटच्या विशिष्ट तक्रारी आणि गरजा लक्षात घेऊन त्याच्या वयाला, तब्येतीला अनुसरून एरोबिक आणि स्ट्रेन्थ ट्रेनिंग तसच फ्लेक्सिबिलिटी व्यायाम योग्य त्या प्रमाणात, योग्य तीव्रतेने आणि योग्य वेळा करण्यास सांगितले जातात, व्यायामामुळे या रुग्णांना त्यांच्या वेदनेत लक्षणीय बदल दिसून येतो शिवाय व्यायामातून हॅप्पी हॉर्मोन्स रीलीज झाल्यामुळे मानसिक तणाव, चिंता, नैराश्य कमी होतं साहजिकच पॅरा सीमपथेटिक सिस्टम अॅक्टिवेट होते. काही वेळा पाण्यात करण्याचे व्यायाम प्रकार म्हणजेच अकवाटिक थेरपी मुळेसुद्धा रुग्णांना लाभ होतो. मोशन इज लोशन!
अॅक्टिविटी पेसिंग- रोजच्या कामांमध्ये किती वेळा ब्रेक घ्यावा, काम करताना पॉस्चर कसं असावं, किती तास सलग काम कराव या गोष्टी पद्धतशिरपणे शिकवल्या जातात

जीवनशैलीतील बदल

आहारात अॅंटी इन्फ्लमेटरी आणि झीज भरून काढणारे पदार्थ वाढवण, अति मसाले, तिखट, गोड, खारट हे इन्फ्लेमेशन वाढवणारे पदार्थ टाळणं, झोप आणि वेदनेचा संबंध समजून घेणं आणि त्यानुसार झोपेच प्रमाण आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रयत्न करणं.

माइंडफुलनेस आणि ध्यानधारणा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ज्याने मानसिक तणाव, नैराश्य, चिंता या गोष्टी नियंत्रणात येतात. याशिवाय कोग्निटिव बिहेविओरल थेरपी, ओकयूपेशनल थेरपी आणि इमोशनल अवरेनेस अँड एक्सप्रेसशन थेरपी यांचा सुद्धा उपयोग होतो. फायब्रोमायल्जिया हा आजार प्रामुख्याने व्यायाम आणि जीवनशैलीतील बदल याने पूर्णतः आटोक्यात आणता येतो, यात औषधांचा भाग मर्यादित असतो आणि त्यांचा उपयोग हा फक्त काही काळापुरती वेदना कमी करण्यासाठी होऊ शकतो.