तुम्ही हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका कमी करण्यासाठी दर आठवड्याला १५० मिनिटांचा मध्यम तीव्रतेचा व्यायाम पूर्ण करीत असाल; पण जर प्रत्येक सत्रानंतर तुम्ही साखरयुक्त किंवा एनर्जी ड्रिंक पीत असाल, तर तुम्ही सर्व मेहनत वाया घालवत आहात. हार्वर्ड टी. एच. चॅन स्कूल ऑफ पब्लिक हेल्थद्वारे केलेल्या एका नव्या अभ्यासामध्ये असे दिसून आले आहे की, शारीरिक हालचाली आरोग्यासाठी उपयुक्त असतात. परंतु, साखरयुक्त किंवा गोड पेय पिण्यामुळे निर्माण होणारा हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीच्या त्रासाचा धोका त्यामुळे कमी होत नाही. सोप्या शब्दांत सांगायचे झाले, तर तुमच्या वर्कआउट रूटीननंतर साखरयुक्त पेय घेऊ नका.

साखरयुक्त शीतपेये किंवा एनर्जी ड्रिंकमध्ये साखर असते. पण काही जाहिरातींमध्ये बऱ्याचदा असे दर्शवितात की, तंदुरुस्त आणि सक्रिय लोक ऊर्जेसाठी हाय एनर्जी ड्रिंक्सचा वापर करतात. याचा अर्थ असा होतो, “त्यांचे हानिकारक परिणाम होत नाहीत.” याच धारणेला (perception) हार्वर्ड संशोधन आव्हान देते. शरीरातील पाण्याची कमतरता जलद पूर्ण करण्याच्या आणि शोषण्याच्या (absorption) हेतूने स्पोर्ट्स ड्रिंक्समध्ये सहसा साखर आणि इलेक्ट्रोलाइट्स असते. काही क्रीडापटू त्यांचा वापर फक्त तेव्हाच करतात जेव्हा त्यांनी उच्च तीव्रतेचा व्यायाम केला असेल; जो एक तास किंवा त्याहून अधिक काळ टिकतो. इतरांसाठी कॅलरी ओव्हरलोड असलेले हे आणखी एक साखरयुक्त पेय आहे.

अभ्यास काय सांगतो?

शास्त्रज्ञांनी सुमारे १,००,००० प्रौढांच्या दोन गटांचा संशोधनामध्ये समावेश केला. साधारणत: सुमारे ३० वर्षे हा अभ्यास करण्यात आला. संशोधनातील माहितीनुसार- शारीरिक हालचालींची पर्वा न करता, ज्यांनी साखरयुक्त पेये आठवड्यातून दोनपेक्षा जास्त वेळा वापरली आहेत त्यांना हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीचा रोगाचा धोका जास्त होता. अभ्यासात विचारात घेतलेल्या सेवनाची वारंवारता ही आठवड्यातून दोनदा असून, ती तुलनेने कमी आहे. परंतु, तरीही हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी रोगाच्या धोक्याशी लक्षणीयपणे संबंधित आहे. दैनंदिन सेवनामुळे हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी रोगाचा धोका अधिक असतो.

हेही वाचा – Breast Cancer in Men :पुरुषांनाही होऊ शकतो स्तनाचा कर्करोग! प्रत्येक पुरुषाला माहीत हव्यात ‘या’ बाबी

साखरेचा हृदयावर कसा परिणाम होतो?

“आपण खराब आहार टाळू शकत नाही. व्यायाम आणि आहार हे दोन्ही हृदयाच्या काळजी घेण्यासाठी महत्त्वाचे आहे आणि त्यांना एकत्रितपणे काम करावे लागेल. साखर ही फॅट्सपेक्षा जास्त घातक आहे. हा एक सूज आणि दाह निर्माण करणारा घटक आहे. याचा अर्थ साखर एंडोथेलियम किंवा रक्तवाहिन्या आणि रक्तवाहिन्यांच्या भिंतींच्या आतील अस्तरांना नुकसान करते; ज्यामुळे ते कोलेस्ट्रॉलमध्ये प्रवेश करू शकतात. त्यामुळे तुमच्या रक्तात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी असले तरी ते सच्छिद्र धमन्यांमध्ये (porous arteries) प्रवेश करू शकतात आणि प्लेक्स (plaque) तयार करू शकतात; ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो,” असे नवी दिल्ली फोर्टिस एस्कॉर्ट्स हार्ट इन्स्टिट्यूट, इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजी, प्रिन्सिपल डायरेक्टर, डॉ. निशिथ चंद्रा यांनी द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगितले.

डॉ. निशिथ चंद्रा यांनी सांगितले, “माझ्या अनेक रुग्णांमध्ये कोलेस्ट्रॉलची पातळी कमी असूनही त्यांना हृदयविकाराचा झटका का आला, असा प्रश्न मला पडला आहे. म्हणूनच व्यायाम करूनही साखरयुक्त पेये तुम्हाला हृदयविकाराचा धोका निर्माण करू शकतात. अतिरिक्त कॅलरीज ट्रायग्लिसराइड्स म्हणूनही साठवली जाऊ शकते; ज्याची उच्च पातळी हृदयरोगासाठी एक प्रमुख जोखीम घटक आहे. ज्यांना मधुमेह आहे त्यांच्यासाठी ते आणखी वाईट असू शकते.

हेही वाचा – टॅटूसाठी वापरली जाणारी शाई आणि सुई सुरक्षित आहे की नाही, हे कसे ओळखावे? तज्ज्ञांकडून जाणून घ्या…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोणत्या साखरेच्या पेयांपासून दूर राहावे?

कोणत्या साखरेच्या पेयांपासून दूर राहावे?
“कोणतेही ‘सॉफ्ट ड्रिंक’ आणि ‘कार्बोनेटेड ड्रिंक’ (कॅफिनसह किंवा कॅफिनशिवाय), ‘एनर्जी ड्रिंक्स’, ‘फ्रूट कॉकटेल’, ‘पॅक केलेले फळांचे रस’ व ‘ओटीसी हेल्थ ड्रिंक्स’, विशेषत: जिमद्वारे जाहिरात केली जाणारे पेये घेणे टाळा. व्यायामानंतर शरीरातील पाण्याची पातळी वाढविण्याचा सर्वांत आदर्श मार्ग म्हणजे साधे किंवा इलेक्ट्रोलाइट-इन्फ्युज्ड पाणी हे आहे. याशिवाय तुम्ही लिंबू, नारळ पाणी किंवा ताक घ्या, ज्यामध्ये साखर असू शकते आणि जी पचवण्यासाठी शरीराला वेळ लागतो.” असे डॉ निशिथ चंद्रा यांनी स्पष्ट केले.