भारतात प्रत्येत घरात वापरल्या जाणाऱ्या मेथीच्या बियांना पारंपरिक औषध म्हणून ओळख मिळाली आहे. पण, या छोट्याशा बियांचं खरं रहस्य काय आहे? त्या वजन कमी करण्यात मदत करतात का, हार्मोन्स संतुलित ठेवतात का की उलट पचनावर परिणाम करतात? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी हार्वर्ड प्रशिक्षित गॅस्ट्रोएन्टरॉलॉजिस्ट डॉ. सौरभ सेठी यांनी अलीकडेच यूट्यूब शॉर्टसवर काही महत्त्वाची माहिती दिली आहे.

मेथीच्या बिया खायच्या की टाळायच्या? डॉक्टरांचं स्पष्ट उत्तर (Should You Eat Fenugreek Seeds or Avoid Them?)

डॉ. सेठी यांच्या मते, मेथीच्या बिया शरीरासाठी अत्यंत उपयुक्त असल्या तरी त्यांचं योग्य प्रमाणात आणि पद्धतीनं सेवन करणं गरजेचं आहे. त्यांनी सांगितलं, “या बिया टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढवतात, वजन कमी करण्यास मदत करतात, स्त्रियांमध्ये दूधनिर्मिती वाढवतात, रक्तातील साखरेचं नियमन करतात आणि PCOS असलेल्या महिलांसाठी फायदेशीर ठरतात. तसेच त्या रजोनिवृत्तीतील उदासीनता आणि गरम झटके कमी करण्यातही मदत करतात. मात्र, त्यांचा वास कधी कधी मेपल सिरपसारखा गोड जाणवतो आणि सेवन करण्यापूर्वी त्या रात्रभर भिजवणे अधिक चांगलं ठरतं.”

वजन कमी करायचंय? मेथीच्या बिया देतील नैसर्गिक साथ (Fenugreek Seeds for Natural Weight Loss)

याबाबत सविस्तरपणे जाणून घेताना ठाणे येथील किम्स हॉस्पिटल्सच्या मुख्य आहारतज्ज्ञ डॉ. अमरीन शेख यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगितले, “मेथीच्या बिया वजन कमी करण्यात मदत करू शकतात; परंतु मेथी हा काही झटपट आराम मिळवण्याचा उपाय नाही. मेथीमध्ये विद्राव्य (विरघळणारे) फायबर मुबलक प्रमाणात असते. हे फायबर पोटात जेलसारखा थर तयार करते, ज्यामुळे पचनाची प्रक्रिया मंदावते, भूक उशिरा लागते आणि अन्नाचे सेवन कमी होते. त्यामुळे वजन नियंत्रणात राहते.” पण, त्या यावर भर देतात, “ मेथीच्या बिया ही जादूची गोळी नाही; मेथीचं सेवन संतुलित आहार आणि सक्रिय जीवनशैलीसह केल्यास प्रभावी ठरते.”

पुरुषांसाठी मेथी – टेस्टोस्टेरॉन वाढवण्याचा नैसर्गिक मार्ग (Fenugreek for Men’s Hormonal Health)

पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन वाढवण्याच्या दृष्टीनं मेथी उपयोगी ठरू शकते, असेही डॉ. शेख यांनी सांगितले. त्या सांगतात, “काही संशोधनांनुसार मेथीतील नैसर्गिक संयुगं हार्मोन्सच्या संतुलनात मदत करतात आणि शरीरात ऊर्जा टिकवतात. मात्र हा परिणाम सौम्य असतो. अचानक त्यामध्ये वाढ होत नाही.”

स्त्रियांमध्ये PCOS आणि रजोनिवृत्तीच्या काळात मेथीचे फायदे (Fenugreek Benefits for Women – PCOS & Menopause Relief)

स्त्रियांना मेथीच्या बियांमुळे होणाऱ्या फायद्यांबाबत बोलताना त्या पुढे सांगतात,”मेथीच्या बिया हार्मोन्स संतुलित ठेवण्यास मदत करतात, विशेषतः PCOS असलेल्या महिलांसाठी मेथी उपयोगी ठरते. “मेथी इन्सुलिन संवेदनशीलता वाढवते, ज्यामुळे शरीरातील हार्मोनल असंतुलन नियंत्रित राहते. त्याचबरोबर मेथी रजोनिवृत्तीच्या काळातील मूड स्विंग, थकवा आणि hot flashes कमी करण्यात मदत करते.” त्याशिवाय मेथी स्तनपान करणाऱ्या मातांमध्ये दूधनिर्मिती नैसर्गिकरीत्या वाढवते, हेही त्या अधोरेखित करतात.

मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी मेथी कशी मदत करते? (How Fenugreek Helps Control Blood Sugar)

मेथीचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे ती रक्तातील साखर नियंत्रणात ठेवते. डॉ. शेख सांगतात, “मेथी HbA1C पातळी कमी करते आणि इन्सुलिन प्रतिसाद सुधारते. ती शरीरातील GLP-1 नावाचं हार्मोन वाढवते, जे रक्तातील साखरेचं नियमन करतं. हेच हार्मोन काही आधुनिक मधुमेहावरील औषधांमध्येही वापरलं जातं.” त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी मेथी नियमित आणि नियंत्रित प्रमाणात घेणं फायदेशीर ठरू शकतं.

मेपल सिरपसारखा गोड वास का येतो?(Why Does Fenugreek Make You Smell Sweet?)

काही लोकांना मेथी सेवन केल्यानंतर शरीरातून मेपल सिरपसारखा गोड वास येतो. त्याबाबत डॉ. शेख सांगतात, “हा वास मेथीमध्ये असलेल्या ‘सोटोलोन’ नावाच्या नैसर्गिक संयुगामुळे येतो. तो पूर्णपणे निरुपद्रवी आहे आणि सेवन थांबवल्यानंतर तो आपोआप निघून जातो.”

मेथीचं योग्य प्रमाण आणि सेवन पद्धत (Right Way to Consume Fenugreek Seeds)

सेवनाबाबतच्या काळजीबाबत डॉ. शेख सल्ला देतात, “दररोज एक ते दोन चमचे मेथी पुरेशी आहे. ती रात्रभर भिजवून सकाळी सेवन केल्यास पचन सुधारते आणि पोषक घटकांचे शोषण अधिक चांगले होते.” त्या पुढे सांगतात, “मेथी यकृताला हानी पोहोचवत नाही; उलट वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. मात्र, कोणतीही नैसर्गिक वनस्पती असली तरी मेथीचं अतिसेवन टाळावं,”

आरोग्याचं गुपित : घरच्या घरी सुपरफूड मेथीचे बहुपयोग (The Everyday Superfood for Balanced Health)

एकंदरीत पाहता, मेथीच्या बिया हा घरगुती सुपरफूड म्हणावा असा घटक आहे. वजन नियंत्रण, हार्मोन संतुलन, रक्तातील साखर नियंत्रण आणि पचन सुधारणा — या सर्व बाबींमध्ये मेथी मदत कर