प्रत्येक व्यक्तीला तंदुरुस्त शरीर हवे असते. पण, आजकाल खराब जीवनशैली आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे बहुतेक लोकं लठ्ठपणाच्या समस्येने त्रस्त असतात. आरोग्य निरोगी राहण्यासाठी नेहमी व्यायाम करणं आवश्यक आहे. यामुळे शरीराची हालचाल योग्य पद्धतीने होण्यास मदत मिळते. दिवसभर विविध प्रकारची कामे करायची असतील तर आपल्या हातापायाचे स्नायू बळकट असणे आवश्यक असते.

संपूर्ण शरीराला सांभाळणारे स्नायू मजबूत आणि बळकट असणं अतिशय महत्त्वाचं असतं. स्नायूंची झपाट्याने झीज झाल्यामुळे, रुग्ण त्याच्या वयाच्या आधी म्हातारा दिसू लागतो. आपल्याला घरी राहूनही आपल्या स्नायूंना बळकट आणि तंदुरुस्त ठेवणं सहज शक्य आहे. घरी काही सोपे आसन करून तुम्ही तुमच्या स्नायूंना मजबूत ठेवू शकता. त्याचप्रमाणे वजनही कमी होण्यास मदत होऊ शकते. योगतज्ज्ञ कामिनी बोबडे यांनी इंडियन एक्स्प्रेसला बोलताना याविषयी माहिती दिली आहे.

how to balance professional and personal life
तुम्ही ऑफिस आणि घर वेगळं ठेवता का?
Grah Gochar 2024 June
५ दिवसांनी सूर्यासारखे चमकेल ‘या’ राशींचे भाग्य? ३ तीन मोठे ग्रह बदलणार चाल; नव्या नोकरीसह तुम्हाला कधी मिळणार प्रचंड धनलाभ?
Loksatta explained Should licenses be enforced for weather forecasters
विश्लेषण: हवामान अंदाज वर्तवणाऱ्यांसाठी परवाने लागू करावेत का?
Diet for conscious living
जिंकावे नि जागावेही: ‘सजग’ जगण्यासाठी आहार!
how much water should one drink in marathi
Health Special: रोज कुणी, किती पाणी प्यावे?
never do these Mistakes that can ruin your career
‘या’ चुका तुमचे चांगले करिअर खराब करू शकतात, वेळीच सावध व्हा
In presence of Army Chief General Manoj Pandey Convocation of 146th batch was held at Khetrapal Maidan in NDA
लष्करप्रमुख मनोज पांडे म्हणाले, “तांत्रिक क्षमता वाढवणे आवश्यक…”
road contractors effort to fill natural pond at kopar in dombivli
डोंबिवलीत कोपर येथे नैसर्गिक तलाव रस्त्यासाठी बुजविण्याच्या हालचाली, पर्यावरणप्रेमींमध्ये तीव्र नाराजी

योगतज्ज्ञ म्हणतात, आपले शरीर हे हाडांनी, स्नायूंनी, रक्तपेशी आणि मज्जातंतूंनी बनलेले आहे. स्नायूंची आणि हाडांची निगा योग्य पद्धतीने राखली पाहिजे. कोणत्याही हालचालींसाठी स्नायूंची आणि हाडांची ताकद महत्त्वाची असते. वाढत्या वयात जगण्याचा आनंद घेण्यासाठी आणि आयुष्य संपूर्णतेने जगण्यासाठी त्यांचे निरोगी असणे आवश्यक आहे. सकस आहारपद्धती स्वीकारणार्‍या आणि नियमितपणे व्यायाम करणार्‍या व्यक्ती दीर्घकाळ निरोगी राहतात व त्यांचे स्नायू अधिक बळकट असतात. यासाठी खाली दिलेले आसन तुम्ही करू शकता.

(हे ही वाचा : खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी नवीन सुपर डाएट? ‘या’ डाएटमुळे हृदयविकाराचा धोका कसा कमी होतो? जाणून घ्या…)

उत्कटासन या आसनामुळे रोगप्रतिकारकशक्ती सुधारण्यासोबतच पाठ आणि सांधेदुखीपासूनही आराम मिळतो. उत्कटासन पाठीचा कणा, नितंब आणि छातीचे स्नायू ताणण्यास मदत करते. पायाच्या स्नायूंच्या मजबुतीसाठी हे आसन उपयुक्त आहे. या आसनाला कुर्सी आसन असेही म्हणतात. शरीरही समतोल बनण्यास या आसनाने मदत होते.

उत्कटासन करताना दोन्ही पायांमध्ये एक फुटाएवढे अंतर ठेवा. पाठ ताठ आणि सरळ असावी. त्याचबरोबर दोन्ही हात खाद्यांच्या सरळ रेषेत आणावे आणि जसे खुर्चीवर बसतो अगदी तसे खाली यावे, गुडघ्यातून पाय वाकवावा. काही सेकंद स्थिर राहावे. पाय वाकवून उभे राहावे, पण दोन्ही पाय हे टोकांवर असावे. हे आसन सुरुवातीला काही सेकंदांसाठी करा आणि यानंतर हळूहळू ते ६० ते ९० सेकंदांपर्यंत वाढवा. स्नायूंच्या मजबुतीसाठी हे आसन उपयुक्त आहे, असेही त्या सांगतात.

खरंतर योगासनांचे आपल्या शरीराला होणारे फायदे खूप आहेत. फिट राहायचं असेल तर योग करण्याला पसंती दिली जाते. तुम्ही जर कोणतेही आसन करत असाल तर तुम्ही प्रत्येक आसनानंतर ३० ते ४० सेकंद विश्रांतीचा सरावही केला पाहिजे, असे त्या सांगतात.