Health Benefits Of Kairi Panha : कैरीचे पन्हे हे उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणाऱ्या पेयांपैकी सर्वांचे आवडते असे पेय आहे. चवीला उत्तम व आरोग्यासाठी फायदेशीर असलेले हे पन्हे उन्हाळ्यात आपण एकदा तरी बनवून, त्याचा स्वाद घेतो. फिटेलो येथील क्लिनिकल आहारतज्ज्ञ उमंग मल्होत्रा ​​यांनी सांगितले की, कैरीचे पन्हे कच्च्या आंब्याच्या लगदा, पुदिना, भाजलेले जिरे, काळे मीठ आणि कधी कधी थोडासा गूळ वापरून तयार केले जाते. त्यामुळे कैरीचे पन्हे हे केवळ त्याच्या चवीसाठीच नाही, तर त्याच्या थंड, हायड्रेटिंग व इलेक्ट्रोलाइट-रिस्टोरिंग (electrolyte-restoring) गुणधर्मांसाठी ओळखले जातात; जे शरीरातील उष्णता कमी करण्यास आणि पचनास मदत करतात.

कैरीच्या पन्ह्याची आम्लता कमी करण्यासाठी लोक त्यात चिमूटभर साखर घालतात. पण, आहारतज्ज्ञ उमंग मल्होत्रा ​​म्हणाले की, कैरीच्या पन्ह्यामध्ये रिफाइंड म्हणजेच सामान्य साखर मिसळल्याने आपल्याला आरोग्यदायी फायदे मिळत नाहीत. कारण- साखर गोड पदार्थाची चव वाढवू शकते आणि गोड पदार्थ आवडत असलेल्यांनासुद्धा आकर्षित करू शकते. पण, प्रत्यक्षात ती शरीराच्या हायड्रेशन यंत्रणेविरुद्ध काम करते. रिफाईंड साखर इन्सुलिनची पातळी वाढवते, ज्यामुळे मूत्रपिंड सोडियम आणि पाणी जास्त प्रमाणात बाहेर टाकते. त्यामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स आणि द्रव पदार्थांचे निव्वळ नुकसान होते. सांगायचे झाल्यास कैरीचे पन्हे याच गोष्टी पुन्हा भरून काढण्यासाठी मदत करतात.

साखर शरीरात एक ऑस्मोटिक प्रभाव निर्माण करते, पेशींमधून पाणी रक्तप्रवाहात ओढून अतिरिक्त ग्लुकोज पातळ करते, ज्यामुळे पेशी आणि ऊती खोलवर निर्जलित होतात. कैरीच्या पन्ह्यातील अतिरिक्त गोडवा आतडे शांत करण्याची क्षमता कमी करतो आणि पोटफुगी, अपचनासदेखील कारणीभूत ठरू शकतो, असे आहारतज्ज्ञ म्हणाले आहेत.

कैरीच्या पन्ह्याचे फायदे खरोखरच अनुभवायचे असतील, तर मल्होत्राने सांगितले की, कैरीच्या पन्ह्यात साखर घालणे पूर्णपणे टाळा आणि कैरीची नैसर्गिक चव तशीच राहू द्या. भाजलेले जिरे, पुदिना, काळे मीठ यांसारखे घटक घातल्याने कैरीच्या पन्ह्याची केवळ चवच वाढत नाही, तर पेयाचे पाचन आणि शरीर थंड करण्याचे गुणधर्मदेखील वाढवण्यासही मदत करतात.

कैरीच्या पन्ह्याची रेसिपी

साहित्य (Kairi Panha Ingredients)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
  • कैरी – ५०० ग्रॅम
  • साखर – ५०० ग्रॅम
  • पुदिन्याची पाने – १ कप
  • गोड तुळशीची पाने – १/२ कप (पर्यायी)
  • मीठ – २ चमचे
  • काळे मीठ – २ चमचे
  • भाजलेले जिरे – २ चमचे
  • काळी मिरी – १ किंवा २ चमचे
  • वेलची – ७ ते ८
  • आले – १ इंचाचा तुकडा

कृती (How To Make Kairi Panha)

  • कैरी धुऊन, लहान लहान तुकडे करा.
  • एक मोठे भांडे घ्या आणि त्यात कैरीचे तुकडे, आले, वेलची, काळी मिरी व १/२ कप पाणी टाका. झाकण ठेवून ते गरम करण्यासाठी गॅसवर ठेवा.
  • उकळल्यानंतर मध्यम आचेवर ४ ते ५ मिनिटे शिजवा. आंब्याचा गर आता मऊ झाला आहे का ते तपासा. आता गॅस बंद करा. शिजविलेला गर एका भांड्यात काढा.
  • साखर पाक बनविण्यासाठी एका भांड्यात साखर आणि एक कप पाणी घ्या. साखर वितळेपर्यंत ती मंद आचेवर शिजवा.
  • पुदिन्याची पाने, तुळशीची पाने, कैरीचा गर, जिरे, साधे मीठ, काळे मीठ मिक्सरच्या भांड्यात घाला आणि पेस्ट बनवून घ्या.
  • आता ही पेस्ट साखरेच्या पाकात घाला आणि शिजू द्या. आता साखरेचा पाक तपासा. जर तो पाक चिकट झाला असेल, तर पन्हे तयार झाले आहे. मग गॅस बंद करा.
  • कैरीचे पन्हे थंड होऊ द्या. थंड झाल्यावर पन्हे गाळून घ्या. चाळणीवर उरलेल्या मिश्रण ग्राईंडरमध्ये पुन्हा बारीक करा आणि ते पुन्हा पन्ह्यामध्ये घाला.
  • शेवटी एका ग्लासमध्ये दोन ते तीन चमचे कैरीचे पन्हे घ्या. त्यात पाणी आणि थोडा बर्फ घाला. अशा प्रकारे कैरीचे पन्हे तयार करता येईल.