Banana for constipation and digestion: बद्धकोष्ठता ही एक अशी समस्या आहे, जी प्रत्येकाला कधी ना कधी त्रास देते. काही लोकांना काही काळ बद्कोष्ठतेचा त्रास होतो, तर काहींना ही समस्या वारंवार जाणवते आणि ती दीर्घकालीन बद्धकोष्ठतेत रूपांतरित होते. वाईट आहार, बिघडलेली जीवनशैली, ताणतणाव, औषधांचा मारा आणि शारीरिक हालचालींचा अभाव हे देखील बद्धकोष्ठतेसाठी जबाबदार असू शकतात.
बद्धकोष्ठता म्हणजे पोट पूर्णपण साफ होत नाही आणि शौचास त्रास होतो. बद्धकोष्ठतेच्या समस्या म्हणजेच मल कोरडा आणि कठीण असतो, त्यामुळे पोट फुगणे, गॅस, आम्लता अशा समस्या उद्भवतात. बद्धकोष्ठतेच्या त्रासात पोट स्वच्छ होत नाही, पोटात पेटके येतात आणि पचनाशी संबंधित इतर अनेक समस्या उद्भवू शकतात.
बद्धकोष्ठतेवर उपचार करण्याचा नैसर्गिक मार्ग म्हणजे भरपूर पाणी पिणे आणि तुमच्या आहाराकडे लक्ष देणे. तुमच्या आहारात फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करणे आवश्यक आहे. फायबरची कमतरता भरून काढण्यासाठी आणि चांगले पचन राखण्यासाठी फळे खाणं अत्यंत फायदेशीर आहे. केळी खाल्ल्याने पचन सुधारते का, बद्धकोष्ठतेवर उपचार होतात का किंवा बद्धकोष्ठता होते का या प्रश्नांची उत्तर काय ते जाणून घ्या…
केळी पचनासाठी कशी योग्य?
बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी फळे खाणे अत्यंत फायदेशीर आहे. फळांमध्ये केळी हे पोषक तत्वांनी समृ्ध फळ आहे. केळ्यात व्हिटॅमिन बी ६, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि प्रथिने यांसारखे आवश्यक पोषक घटक असतात. ते केवळ ऊर्जा प्रदान करत नाहीत, तर आतड्यांचे आरोग्यदेखील मजबूत करतात. काही संशोधनानुसार, पिकलेले केळ बद्धकोष्ठता दूर करण्यास मदत करू शकतात, तर कच्चे केळे बद्धकोष्ठता वाढवू शकतात. त्यामुळे दीर्घकालीन बद्धकोष्ठता असलेल्या लोकांनी डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घेतल्यानंतरच पिकलेली केळं खावीत.
आयुर्वेदिक औषधांचे तज्ज्ञ डॉ. सलीम झैदी सांगतात की, केळी हे असे फळ आहे जे दररोज खाल्ल्यास पचनसंस्था सुधारते. केळीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. त्यामध्ये असलेले विरघळणारे तंतू आतड्यांची हालचाल सुधारतात आणि निरोगी पचनसंस्था राखण्यास मदत करतात. केळी शरीरात चांगल्या बॅक्टेरियाना देखील प्रोत्साहन देते, त्यामुळे आतड्यांचे आरोग्य सुधारते.
केळ्यामुळे लूज मोशन नियंत्रणात येते का?
केळ्याचा वापर जुलाब नियंत्रित करण्यासाठी केला जातो. मात्र, तुम्हाला माहीत आहे का की केळीचा वापर जुलाब नियंत्रित करण्यासाठी आणि बद्धकोष्ठतेवर उपचार करण्यासाठी केला जाऊ शकतो? पिकलेले केळे जुलाबावर फायदेशीर मानले जातात. केळ्यात असलेले पेक्टिन पाणी शोषून घेते आणि मल घट्ट करते. म्हणूनच डॉक्टर अनेकदा जुलाब झाल्यास केळी, तांदूळ, सफरचंद आणि टोस्ट खाण्याचा सल्ला देतात.
केळी दीर्घकालीन बद्धकोष्ठतेवर कसा उपचार करते?
आहारात फायबरचे प्रमाण कमी असणे, पाणी कमी असणे आणि शरीराची हालचाल कमी असणे यामुळे दीर्घकालीन बद्धकोष्ठा होते. काही वैद्यकीय परिस्थितीतही बद्धकोष्ठता होऊ शकते. दीर्घकालीन बद्धकोष्ठतेपासून मुक्त होण्यासाठी भरपूर फायबर असलेली केळी खा. बद्धकोष्ठतेपासून मुक्त होण्यासाठी दररोज पिकलेले केळे खा. पिकलेल्या केळ्यामध्ये विरघळणारे फायबर असते, जे आतड्यांची हालचाल वाढवते. केळीमध्ये असलेले पेक्टिन पचन नियंत्रित करते आणि आतड्यांमध्ये ओलावा राखते.
केळीमधील प्रीबायोटिक्स चांगल्या बॅक्टेरियांना पोषण देतात. ते निरोगी आतडे आण नियमित आतड्याची हालचाल राखतात. केळ्यात पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असते, ते आतड्यांच्या स्नायूंना आराम देतात, त्यामुळे आतड्याची हालचाल सुधारते. बद्धकोष्ठतेवर उपचार करण्यासाठी आणि पचन सुधारण्यासाठी केळीचे सेवन अत्यंत फायदेशीर आहे. बद्धकोष्ठतेवर उपचार करण्यासाठी कच्चे केळे खाणे टाळा. कच्च्या केळ्यांमध्ये स्टार्चचे प्रमाण जास्तअसते, जे बद्धकोष्ठता वाढवू शकते.