heartburn after eating Learn simple tips to reduce inflammation | Loksatta

जेवल्यानंतर छातीत जळजळ होते? जाणून घ्या जळजळ कमी करण्यासाठीच्या सोप्या टिप्स

जळजळ होण्याच्या त्रासापासून सुटका करुन घ्यायची असेल तर तुम्हाला झोपण्याची योग्य पद्धत कोणती हे माहिती असायला हवं

जेवल्यानंतर छातीत जळजळ होते? जाणून घ्या जळजळ कमी करण्यासाठीच्या सोप्या टिप्स
जेवल्यानंतर छातीत जळजळ होण्याची समस्या अनेक लोकांना असते. (Photo : Jansatta )

जेवल्यानंतर छातीत जळजळ होण्याची समस्या अनेक लोकांना असते. या लोकांची पचनसंस्था खूप कमकुवत असते, त्यामुळे त्यांना काही खायच्या आधी खूप वेळ विचार करावा लागतो. शिवाय या लोकांनी काही तेलकट, मसालेदार पदार्थ खाल्ले तर त्यांना घशात आणि छातीत जळजळ होते शिवाय ढेकर येण्यास सुरुवात होते. अनेक वेळा आपल्या अवेळी आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे छातीत जळजळ होणे तसंच गॅसचा त्रास जाणवतो.

या समस्येला ऍसिड रिफ्लक्स (Acid Reflux) असं म्हणतात, ज्यामध्ये खाल्ल्यानंतर पोटातील ऍसिड अन्ननलिकेमध्ये प्रवेश करते. त्यामुळे ही समस्या उद्भवते. ही एक समस्या सामान्य असली तरी यामुळे तुम्हाला अनेक प्रकारच्या अडचणींचा सामोरं जायला लागू शकतो. त्यामुळे पोटात जळजळ होण्याच्या समस्येपासून त्वरीत सुटका कशी करुन घ्यायची याबाबत आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत, चला जाणून घेऊया छातीतील जळजळ दुर करण्याचे उपाय.

हेही वाचा- Heart Attack: हार्ट अटॅकपासून करायचा आहे स्वतःचा बचाव? ‘ही’ औषधाची गोळी नेहमी जवळ ठेवा

साधारणता ऍसिड रिफ्लक्समध्ये खोकला आणि छातीत जळजळ होणे ही लक्षणे असतात. हा त्रास तुम्ही तुम्ही झोपता किंवा वाकता तेव्हा जास्त उद्भवतो. या त्रासापासून आराम मिळावा म्हणून बाजारात अनेक औषध उपलब्ध असून अनेकजण ती औषधं घेतात देखील. पण अनेक वेळेस तुमच्या चुकीच्या झोपण्याच्या पद्धतीमुळे हा त्रास जास्त जाणवतो.

झोपण्याची योग्य पद्धत –

हेही वाचा- ‘हे’ आयुर्वेदिक उपाय ट्राय करा; खराब कोलेस्ट्रॉल पासून कायमस्वरूपी सुटका मिळेल

तुम्हाला या त्रासापासून सुटका करुन घ्यायची असेल तर तुम्हाला झोपण्याची योग्य पद्धत कोणती हे माहिती असायला हवं. त्यामुळे तुम्हाला जेव्हा छातीत जळजळ होत आहे असं वाटेल त्यावेळी डाव्या कुशीवर झोपा. अशा स्थितीत चुकुनही पाठीवर झोपू नका. कारण पाठीवर झोपलात तर ऍसिड रिफ्लक्स वाढू शकते.

खाताना गडबड करु नका –

जळजळ होण्याचा त्रास जाणवायला लागल्यास तुम्ही ओट्स, ब्राऊन राईस, ब्रोकोली, रताळे, गाजर असे पदार्थ खा. ते खाल्ल्यास तुम्हाला बऱ्यापैकी या त्रासापासून आराम भेटेल. सर्वात महत्वाच म्हणजे तुम्ही जे काही खाणार आहात ते खाताना घाई गडबड अजिबात करु नका. प्रत्येक पदार्थ चांगला चावून खा. कोणताही पदार्थ खाता जास्त वेळ चावल्यास तो पचवण्यास मदत होते. त्यामुळे तुमच्या छातीत जळजळ होणार नाही.

हेही वाचा- ‘या’ रसांच्या सेवनाने किडनी स्टोन लघवीतून सहज बाहेर पडेल; ऑपरेशनची देखील गरज भासणार नाही

व्यायाम –

ऍसिड रिफ्लक्सपासून सुटका करण्यासाठी सर्वात महत्वाचा आणि उत्तम उपाय म्हणजे व्यायाम. नियमित व्यायाम केल्यास तुमची या त्रासापासून हमखास सुटका होईल.

मराठीतील सर्व हेल्थ ( Health-tips ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-12-2022 at 18:34 IST
Next Story
आता मधुमेहापासून होणार कायमची सुटका? बाबा रामदेव यांनी सांगितलेला असरदार उपाय जाणून घ्या