scorecardresearch

‘या’ हिरव्या पालेभाजीच्या सेवनाने खराब कोलेस्ट्रॉल झपाट्याने कमी होईल? सेवनाची पद्धत जाणून घ्या

High Cholesterol: शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी आवश्यकतेपेक्षा वाढल्यानंतर अनेक समस्या उद्भवू शकतात. कोलेस्टेरॉलची वाढलेली पातळी अनेक प्रकारे नियंत्रित केली जाऊ शकते.

fenugreek leaves benefits
फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम

High Cholesterol: कोलेस्ट्रॉल हा शरीरात आढळणारा चरबीसारखा पदार्थ आहे, जो शरीरातील पेशी, जीवनसत्त्वे आणि इतर हार्मोन्स तयार करण्यास मदत करतो. कोलेस्ट्रॉलचे दोन प्रकार असतात. एलडीएल कोलेस्ट्रॉल आणि एचडीएल कोलेस्ट्रॉल. जर शरीरात एलडीएल कोलेस्टेरॉलची पातळी आवश्यकते पेक्षा वाढली तर अनेक समस्या उद्भवू शकतात. कोलेस्टेरॉलची वाढती पातळी अनेक प्रकारे नियंत्रित केली जाऊ शकते. यापैकी एक म्हणजे हिरव्या पालेभाज्यांमधील मेथीची भाजी. मेथीची भाजी बाजारात सहज उपलब्ध होते आणि याचे फायदे देखील अनेक आहेत.

इंडियन काऊंन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने केलेल्या अभ्यासात असे सिद्ध झाले आहे की मेथीच्या भाजीमध्ये भरपूर पोषक तत्वे असतात, ज्यात रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्याची क्षमता असते. यामध्ये फॉलिक अॅसिड, रिबोफ्लेविन, कॅल्शियम, लोह, तांबे, पोटॅशियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन ए, बी, बी६ सारखे घटक मुबलक प्रमाणात आढळतात. याच्या सेवनाने ब्लड शुगर नियंत्रित केली जाऊ शकते. तसंच यामुळे सांधेदुखीपासून देखील आराम मिळतो. तुम्ही मेथीची भाजी बनवून देखील खाऊ शकता किंवा सॅलड आणि सुपच्या स्वरूपात देखील सेवन करू शकता.

मधुमेह नियंत्रण करता येतो..

मेथीच्या नियमित सेवनाने प्री-डायबिटीज स्टेज असलेले लोक पूर्णपणे बरे होऊ शकतात. एका अभ्यासात हे सिद्ध झाले आहे की मेथीमुळे टाईप २ मधुमेहाचा धोका कमी होतो. याशिवाय जे लोक अजूनही प्री-डायबिटीज अवस्थेत आहेत, त्यांनी मेथीच्या पानांचे रोज सेवन केल्यास ते पुन्हा पूर्णपणे बरे होऊ शकतात. या अभ्यासात ३० ते ७० वर्षे वयोगटातील लोकांचा समावेश करण्यात आला होता.

( हे ही वाचा: कोलेस्ट्रॉल वाढल्यावर कोणतीही लक्षणे दिसत नाहीत; ‘हे’ संकेत दिसताच ओळखता येईल हा गंभीर आजार)

मेथीच्या सेवनाने वजनही नियंत्रित राहते

मेथीच्या सेवनाने वजन देखील नियंत्रित करता येते. यामध्ये पुरेशा प्रमाणात फायबर आढळते आणि ते कॅलरीजमध्येही कमी असतात. यामुळेच मेथीची पाने वजन कमी करण्यास मदत करतात. याव्यतिरिक्त, त्यांच्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म देखील आहेत, ज्यामुळे शरीरातील कोणतीही सूज कमी होण्यास मदत होते.

मराठीतील सर्व हेल्थ ( Health-tips ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-02-2023 at 17:13 IST
ताज्या बातम्या