What Diet Plan Karan Johar Used For Weight Loss : दिग्दर्शक, निर्माता, अभिनेता अशा तिन्ही क्षेत्रांत करण जोहरने काम केलं आहे. करणने आतापर्यंत बॉलीवूडला अनेक सुपरहिट चित्रपट दिले, जे आजही अनेकांच्या मनात घर करून आहेत. पण, करण जोहरचे अचानक वजन कमी झाल्यामुळे इंटरनेटवर बरीच चर्चा रंगली, चाहत्यांना त्याची चिंताही वाटू लागली. तर काही जण फिल्म इंडस्ट्रीच्या अनरिॲलिस्टिक ब्यूटी स्टॅंडर्ड्समध्ये स्थान निर्माण करण्यासाठी त्याने डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे (Prescription Drugs ) आणि काहीतरी महागडे उपचार घेतले असतील असेही म्हणू लागले. पण, हे सगळं ऐकून करण जोहरने स्पष्टीकरण दिले आहे की, स्ट्रिक्ट डाएट आणि व्यायामाच्या दिनचर्येमुळे त्याच्यात हा बदल झाला आहे; तर इन्स्टाग्राम लाईव्हदरम्यान करण जोहरने असाही खुलासा केला की, त्याचे आरोग्य आता आधीपेक्षा खूप चांगले आहे.

करण जोहरने इन्स्टाग्राम लाईव्हदरम्यान सांगितले की, रक्त तपासणी केल्यावर रक्तातील साखरेची पातळी सुधारण्याची गरज आहे हे कळाल्यानंतर त्याने डाएटला सुरुवात केली आणि त्यासाठी तो औषधसुद्धा घेत आहे. वजन कमी करण्यासाठी ओझेम्पिक (Ozempic) औषध घेतल्याच्या चर्चांबद्दल त्याने सांगितले की, वजन कमी होणे आणि शारीरिक परिवर्तन हे त्याच्या स्ट्रिक्ट डाएटचे परिणाम आहेत, यासाठी तो दिवसातून फक्त एकदा जेवायचा. तसेच हालचाल अधिक व्हावी यासाठी पोहणे आणि पॅडलबॉल खेळायचा. तर वजन कमी करण्यासाठी हे उपाय कसे मदत करू शकतात हे समजून घेण्यासाठी द इंडियन एस्क्प्रेसने आरोग्य तज्ज्ञांशी चर्चा केली…

दिवसातून फक्त एकदा जेवल्यास वजन कमी करण्यास कशी मदत होऊ शकते (How Eating Only Once A Day Can Help You To Lose Weight)

अहमदाबाद येथील झायडस हॉस्पिटल्सच्या मुख्य आहारतज्ज्ञ श्रुती के भारद्वाज यांनी सांगितले की, OMAD म्हणजे वन मील अ डे डाएट (One Meal a Day diet) असते. हा एक प्रकारचा उपवास आहे, जिथे व्यक्ती २४ तासांच्या आत फक्त एकदा जेवते आणि उर्वरित २३ तास उपवास करते. त्यामध्ये सामान्यतः एकाच वेळी जेवणात दिवसभरातील सर्व कॅलरीज घेणे समाविष्ट असते, तेही एका तासाच्या आत, असे त्या म्हणाल्या आहेत.

आहारतज्ज्ञ श्रुती के भारद्वाज यांच्या मते, वजन कमी करणाऱ्या किंवा चयापचय आरोग्य सुधारण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींसाठी ‘वन मील अ डे डाएट’ आहार योग्य असू शकतो, कारण त्यामुळे कॅलरीज प्रतिबंधित होऊ शकतात आणि इन्सुलिन संवेदनशीलता सुधारण्यास मदत तर चरबी कमी होणे असे संभाव्य फायदेसुद्धा देऊ शकतात. पण, दिवसातून एकदाच सेवन केल्या जाणाऱ्या जेवणात संतुलित आणि सर्व आवश्यक पोषक तत्वे उपलब्ध आहेत याची खात्री करणेसुद्धा तितकेच आवश्यक आहे.

रक्त तपासणी करणे का आवश्यक आहे (Why Is It Necessary To Have A Blood Test)

गुरुग्राम येथील फोर्टिस मेमोरियल रिसर्च इन्स्टिट्यूटच्या मॉलिक्युलर हेमॅटोलॉजी आणि ऑन्कोलॉजीच्या सल्लागार डॉक्टर श्रीनिधी नाथनी म्हणाल्या की, वजन कमी करण्याचा प्रवास सुरू करण्यापूर्वी, डिटेल बेसलाइन ब्लडवर्क पॅनेल आवश्यक आहे. रक्त बायोमार्कर एखाद्या व्यक्तीच्या चयापचय आरोग्य, हार्मोनल स्थिती, पौष्टिक कमतरता आणि चरबी चयापचय, भूक नियमन आणि शरीर व्यायाम किती सहन करू शकतो आदी अनुवांशिक पूर्वस्थितींबद्दल महत्त्वपूर्ण अंतर्दृष्टी प्रदान करतात.

वजन कमी करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी कोणत्या सात महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केले पाहिजे, याचे मूल्यांकन करण्यासाठी काही महत्त्वाचे घटक कोणते आहेत, हेसुद्धा समजून घेतले पाहिजे…

डॉक्टर नथानी यांनी वजन कमी करण्यापूर्वी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत याची यादी सांगितली आहे…

१. थायरॉईड प्रोफाइल (टीएसएच, फ्री टी३, फ्री टी४) –

जास्त वजन वाढणे किंवा कमी होणे. वजनात बदल हे थायरॉईड विकाराच्या सामान्य लक्षणांपैकी एक आहे. वजन वाढणे हे थायरॉईड संप्रेरक कमी झाल्याचे सूचित करते, ज्याला हायपोथायरॉईडीझम (Hypothyroidism) म्हणतात, त्यामुळे आहार किंवा व्यायामातून निकाल मिळण्याची अपेक्षा करण्यापूर्वी थायरॉईडमुळे बिघडलेले कार्य सुधारणे गरजेचे आहे.

२. इन्सुलिन आणि फास्टिंग ग्लुकोज / HOMA-IR

इन्सुलिन प्रतिरोध हा मेटाबॉलिक सिंड्रोमचा गाभा आहे. उच्च इन्सुलिन पातळी असलेल्या व्यक्तींना कॅलरीजची कमतरता असूनही चरबी कमी होण्यास त्रास होतो. उच्च इन्सुलिन पातळी आहे हे लवकर ओळखल्याने कमी ग्लायसेमिक किंवा केटोजेनिक इंटरव्हेंशन्स यांसारख्या आहारातील बदलांना अनुमती मिळते.

३. लिपिड प्रोफाइल (एचडीएल, एलडीएल, ट्रायग्लिसराइड्स)

असामान्य कोलेस्ट्रॉल पातळी आहारातील चरबीच्या नियंत्रणाची आवश्यकता दर्शवते आणि यकृताचे आरोग्य प्रतिबिंबित करू शकते, ज्यामुळे फॅट्स प्रक्रियेवर परिणाम होतो.

४. व्हिटॅमिन डी३, व्हिटॅमिन बी१२, लोह (फेरिटिन, टीआयबीसी)

या सगळ्या गोष्टी शरीरातील कमतरता, थकवा, स्नायूंची खराब पुनर्प्राप्ती आणि कमी-उत्तम ऊर्जा चयापचय यांच्याशी जोडल्या गेल्या आहेत, ज्यामध्ये व्यायामाची सुसंगतता कमी करणारे घटक आहेत.

५. यकृत आणि मूत्रपिंडाच्या कार्य चाचण्या (LFT, KFT)

वजन कमी करताना शरीराचे डिटॉक्सिफिकेशन आणि उत्सर्जन प्रणाली चयापचय बदलांसाठी तयार असल्याची खात्री या चाचण्या करतात.

६. कॉर्टिसॉल आणि डीएचईए (अ‍ॅड्रेनल फंक्शन)

दीर्घकालीन ताण कॉर्टिसॉल वाढवू शकतो, ज्यामुळे पोटातील चरबी जमा होण्यास मदत होते आणि वजन कमी करण्याच्या प्रयत्नांना अडथळा येतो, त्यामुळे या चाचण्या झोपेचे नियमन आणि अ‍ॅडाप्टोजेन सपोर्टसारख्या हस्तक्षेपांना मार्गदर्शन करू शकते.

७. सीआरपी आणि इंफ्लेमेटरी मार्कर्स

कमी दर्जाचा जुनाट दाह इन्सुलिन संवेदनशीलता आणि पेशीय चयापचयात व्यत्यय आणतो.. तसेच दाहक-विरोधी धोरणे (अँटी इंफ्लेमेटरी ) वजन कमी करण्याच्या कार्यक्रमांना प्रतिसाद सुधारू शकतात.

इंदूर येथील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयाच्या आहारतज्ज्ञ शुचिता शर्मा म्हणाल्या की, रक्त तपासणी आपल्याला आपल्या लैंगिक संप्रेरकांची (टेस्टोस्टेरॉन, इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन, एलएच/एफएसएच) माहिती देते, जी चरबी साठवणूक आणि भूकेवर परिणाम करणारे हार्मोनल असंतुलन समजून घेण्यासाठी महत्त्वाची आहे, त्यामुळे या प्रकारांना समजून घेऊन, आपण आहार (कमी कार्ब, उच्च प्रथिने, मेडिटेरेनियन ) अनुकूल करू शकतो, व्यायाम दिनचर्या (सहनशक्ती विरुद्ध प्रतिकार प्रशिक्षण) ठरवू शकतो आणि जास्तीत जास्त चांगले परिणाम योग्य धोरणे ठरवू शकतो; असे डॉक्टर नथानी पुढे म्हणाल्या आहेत.