How long term relationships is good for mental health : नवरा-बायको, गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड यांच्यातील नाते हे इतर नात्यांपेक्षा वेगळे असते. या नात्यात काळजी, प्रेम, जिव्हाळा, समजूतदारपणा व आपुलकी दिसून येते. जेव्हा दोन व्यक्तींचे विचार जुळतात, तेव्हा त्या दोन व्यक्ती एकत्र येतात आणि नव्या नात्याची सुरुवात करतात. अनेकदा काही नाती दीर्घकाळ टिकत नाहीत; पण काही नाती मात्र दीर्घकाळ टिकतात. जोडीदाराबरोबर दीर्घकाळ टिकणाऱ्या नात्याचा अनेकदा आपल्या मानसिक आरोग्यावरही सकारात्मक परिणाम दिसून येतो.

जोडीदाराबरोबरचा सहवास हवाहवासा वाटतो. जोडीदाराबरोबर राहायला, त्याच्याबरोबर अनेक गोष्टी शेअर करायला आवडतात. या नात्यात एकमेकांवर विश्वास असतो, जो त्यांना आयुष्यात येणाऱ्या अनेक अडचणींना सामोरे जाण्यास मदत करतो. एकमेकांना ते संकटाच्या वेळी आधार देतात. या सर्व गोष्टींचा विचार केला तर दीर्घकालीन संबंध खूप महत्त्वाचे ठरते; त्यामुळे या दीर्घकालीन नातेसंबंधाचा व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर सकारात्मक प्रभाव दिसून येतो. याविषयी द इंडियन एक्स्प्रेसनी फोर्टिस हेल्थ केअरच्या मानसशास्त्रज्ञ डॉ. कामना छिब्बर यांच्या हवाल्याने सविस्तर माहिती दिली आहे.

homosexual Women
समलिंगी स्त्रियांना असतो अकाली मृत्यूचा धोका, पण नेमकं कारण काय? संशोधनातून धक्कादायक माहिती उघड!
Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
Can eggs help diabetic patient to control blood sugar
मधुमेही व्यक्तींनी अंडी खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते का? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…

जोडीदाराबरोबर दीर्घकाळ टिकणारे नाते तुमच्या मानसिक आरोग्यासाठी कसे फायदेशीर ठरते, याविषयी डॉ. कामना छिब्बर यांनी खालील गोष्टी सांगितल्या आहेत.

या नात्यात तुम्ही सहज विश्वास ठेवू शकता –

दीर्घकालीन नातेसंबंधात एकमेकांचा सहवास अधिक घट्ट दिसून येतो. या नात्यात समोरची व्यक्ती तुमच्यासाठी नेहमी हजर असते आणि तुम्ही सहज तिच्यावर विश्वास ठेवू शकता. आयुष्यात अनेकदा असे प्रसंग येतात जेव्हा आपण खचतो आणि आपला आत्मविश्वास कमी होतो, तेव्हा तुम्हाला जोडीदार आत्मविश्वास वाढवण्यास मदत करेल आणि त्याच्याबरोबर असताना तुम्हाला कोणतेही दडपण जाणवणार नाही.

या नात्यात तुम्ही योग्य दृष्टिकोन शोधू शकता –

अनेकदा आयुष्यात कटू प्रसंग येतात किंवा वाईट परिस्थिती येते, जी हाताळणे अनेकदा कठीण जाते. अशावेळी काय करावे हे कळत नाही. अशात हे दीर्घकालीन नाते तुम्हाला यातून बाहेर पडण्यास मदत करू शकतात. तुमच्या जोडीदाराबरोबर चर्चा करून तुम्ही योग्य तो निर्णय घेऊ शकता. तुम्हाला योग्य तो दृष्टिकोन शोधण्यास तुमचा जोडीदार महत्त्वाची भूमिका बजावतो.

हेही वाचा : वयाच्या तिशीत अपुरी झोप घेत असाल तर पन्नाशीत होऊ शकतो स्मरणशक्तीवर परिणाम, या वयात किती वेळ झोपायला पाहिजे? वाचा सविस्तर

तुम्ही आत्मपरीक्षण करू शकता –

दीर्घकालीन नात्यात जोडीदार तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने ओळखतो. तुमच्या चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही गोष्टी त्याला माहीत असतात. या नात्यात तुम्ही स्वत:ला समजून घेऊ शकता, आत्मपरीक्षण करू शकता.

समस्या सोडवण्यास जोडीदार मदत करू शकतो –

दीर्घकालीन नात्यात प्रामाणिकपणा असतो. जर तुम्ही एखाद्या संकटात असाल तर जोडीदार तुम्हाला अशा परिस्थितीत एकटेपणा जाणवू देणार नाही. जोडीदार तुम्हाला समस्या सोडवण्यास मदत करेल आणि तुम्हाला अडचणीतून बाहेर काढेल. तो वाईट काळात तुमच्याबरोबर राहील आणि त्यामुळे तुम्हाला एकटेपणा जाणवणार नाही

प्रेरणा आणि प्रोत्साहनाचा मुख्य स्रोत –

दीर्घकालीन संबंध तुमच्या जीवनावर खोलवर परिणाम करतात. तुम्हाला चांगल्या गोष्टी निवडण्यास प्रेरित करतात. जोडीदार तुम्हाला अनेक नवनवीन गोष्टींसाठी प्रोत्साहन देतो. प्रोत्साहन आणि प्रेरणेचा मुख्य स्रोत म्हणून जोडीदार तुमच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावतो.

दीर्घकालीन टिकणारे नातेसंबंध आपल्याला तणावातून बाहेर काढतात. तुमचा जोडीदार तुमची योग्य ती काळजी घेतो. लहान-मोठ्या आव्हानांना सामोरे जाण्यास मदत करतो. कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी बळ देतो. त्याच्या सहवासामुळे तुम्हाला एकटेपणा जाणवत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला आधार मिळतो आणि तुमचे मानसिक आरोग्य सुदृढ राहते.