प्रत्येक जण आपल्या आरोग्याची काळजी घेत असतो. चांगल्या आरोग्यासाठी अनेक जण सोशल मीडियावर लाइफस्टाइलशी संबंधित टिप्स फॉलो करतात पण अनेकदा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लाइफस्टाइलशी संबंधित काही थेरेपी चुकीच्या पद्धतीने सांगितल्या जातात, ज्यामुळे आपले आरोग्य धोक्यात येऊ शकते.
इंटरनेट असे माध्यम आहे जिथे व्हिडीओ, सेशन, किंवा माहितीद्वारे आपण आपल्या आरोग्यासाठी अशा गोष्टी फॉलो करतो, ज्या आपल्याला अनेकदा अडचणीत आणू शकतात. यातलीच एक गोष्ट म्हणजे सकाळी उठल्यानंतर दुधी भोपळ्याचा ज्यूस घेतला तर आपले वजन कमी होण्यास मदत होते पण तुम्हाला माहिती आहे का दुधी भोपळा चांगला की कडू, हे तपासणेही गरजेचे आहे नाही तर आरोग्यावर त्याचा मोठा दुष्परिणाम होऊ शकतो. याविषयी मॅक्स सुपर स्पेशिॲलिटी हॉस्पिटल येथील इंटरनल मेडिसीनच्या संचालक डॉ. रॉमेल टिक्कू यांनी सविस्तर सांगितले.

डॉ. रॉमेल टिक्कू सांगतात, “जर दुधी भोपळा कडू असेल आणि तुम्ही जर कडू दुधी भोपळ्याचा ज्यूस प्यायला तर तुमच्या जिवास धोका निर्माण होऊ शकतो. सतत उलट्या, गॅस्ट्रोइंटेस्टाइनल रक्तस्राव होऊ शकतो. एवढंच काय तर योग्य उपचार न मिळाल्यास व्यक्तीचा मृत्यूसुद्धा होऊ शकतो.”

Can Your Husband Boyfriend Pass This Love Test
तुमचा नवरा ‘ही’ चाचणी पास होईल का? ‘Husband Test’ महिलांना का वाटते गरजेची, उत्तर मिळाल्यावर पुढे काय?
Womens Health Marina alternative to hysterectomy
स्त्री आरोग्य : गर्भाशय काढून टाकण्याला ‘मेरीना’चा पर्याय?
heart health in danger in summer
Heart Attack In Summer : हृदयाचे आरोग्य जपा! उन्हाळ्यात हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यावी?
Face Serum Benefits
Weightloss Exercise: वजन कमी करण्यासाठी व्यायाम करताय? सकाळी करावा की संध्याकाळी? घ्या जाणून…
Health Special, loksatta article, precautions to avoid acidity
Health Special: अ‍ॅसिडिटी होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्याल?
Blowing Nose Can Harm Ears And Throat How To Clear Congestion
नाक शिंकरल्याने ‘असा’ वाढू शकतो त्रास! बंद नाक मोकळे करण्यासाठी योग्य उपाय कोणते? तज्ज्ञांनी सांगितलं उत्तर
diy health benefits of onions what happens your body if yo do not eat onions for a month
आहारात महिनाभर कांद्याचे सेवन न केल्यास शरीरात काय बदल होतील? तज्ज्ञ म्हणाले…
switching your exercise routine have several benefits
काही ठराविक महिन्यानंतर व्यायामामध्ये बदल करणे आवश्यक आहे? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..

हेही वाचा : सोमवारी हार्ट अटॅक येण्याचा धोका अधिक असतो? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात 

दुधी भोपळ्याचे फायदे

दुधी भोपळ्याची भाजी वाफवून करावी करा किंवा शिजवून करा, दोन्ही चांगले आहे. दुधी भोपळ्यात पौष्टिक गुणधर्म असतात, जे वजन कमी करण्यासाठी आणि डायबिटीज पेशंटसाठी अधिक उपयोगाचे असतात. दुधी भोपळ्यात फायबरचे प्रमाण अधिक असते, जे भूक कमी करण्यास मदत करते. दुधी भोपळ्यामध्ये ९६ टक्के पाणी असते, त्यामुळे लघवीचे प्रमाण चांगले वाढते. दुधी भोपळ्यात कमी ग्लायसेमिक इंडेक्स असतो. सॅच्युरेटेड फॅट आणि कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी असते. व्हिटॅमिन सी, रिबोफ्लॅविन, झिंक, थायामिन, लोह, मॅग्नेशियम आणि मॅंगनीज हे सर्व घटक दुधी भोपळ्यात दिसून येतात. दुधी भोपळा हा शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी ओळखला जातो आणि मूत्रमार्गा (urinary tract ) वरील इन्फेक्शन कमी करण्यास मदत करतो.

डॉ. सांगतात, “जर दुधी भोपळा कडू असेल तर त्यात Tetracyclic Triterpenoid Cucurbitacins नावाचे विषारी कंपाउंड असते, ज्यामुळे माणसाचा मृत्यू होऊ शकतो. जितके जास्त विषारी दुधी भोपळ्याचे सेवन कराल तितका जास्त दुष्परिणाम शरीरावर दिसून येईल. त्यामुळे दुधी भोपळ्याचे सेवन करताना दूधी भोपळा कडू आहे का, हे बघणे तितकेच गरजेचे आहे.”

हेही वाचा : Heart Attack : हार्ट अटॅक म्हणजे फक्त छातीत दुखणे नव्हे! ही लक्षणेही जाणून घ्या; वाचा, तज्ज्ञ काय सांगतात… 

डॉ. सांगतात, “माझ्याकडेही अशीच एक भयानक दुधी भोपळापासून विषबाधा झालेली केस आली होती. सकाळी रिकाम्यापोटी दुधी भोपळ्याचा रस घेतल्यानंतर विषबाधा झालेल्या आई आणि मुलाची ही केस होती. आम्ही आईला वाचवू शकलो नाही पण मुलाला वाचविले. आईची खूप नाजूक अवस्था होती. ती एकामागून एक उलट्या करत होती. गॅस्ट्रोइंटेस्टाइनमध्ये रक्तस्राव होत होता. रक्तदाब कमी झाला होता, ज्यामुळे तिचे शरीराचे अवयव निकामी पडत होते आणि आम्ही तिला वाचवू शकलो नाही पण मुलाला वाचविले. मुलाला बराच काळ आयसीयूमध्ये ठेवावे लागले. आम्ही त्याला इंट्राव्हेनस फ्लूड्स, अँटीबायोटिक्स, अँटीमेटिक्स आणि अँटासिड्स दिले.( intravenous fluids, antibiotics, antiemetics antacids) याशिवाय शरीराच्या आतमधील दुखापत शोधण्यासाठी एन्डोस्कॉपीसुद्धा केली होती.

हेही वाचा : जर एक महिना साखर खाल्ली नाही तर तुमच्या आरोग्यावर काय परिणाम होतो? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात…

गुरुग्राममधील एमर्जन्सी मेडिसीनच्या दोन डॉक्टरांनी केलेल्या एका रिसर्चनुसार प्राण्यांमध्ये माणसांपेक्षा जास्त दुधी भोपळ्याचे फायदे दिसून आले आहेत. नुकत्याच एका रिसर्चमध्ये असेही दिसून आले की कडू दुधी भोपळ्याचा रस पिणे शरीरासाठी विषारी आहे. यामुळे ओटीपोटात दुखणे, उलटी करणे, डायरिया, हेमेटेमेसिस, हेमॅटोचेझिया आणि मृत्यूही होऊ शकतो. त्यामुळे डॉक्टरांनी याविषयी जागरूक राहणे गरजेचे आहे. विशेषत: भारतात दुधी भोपळ्याचे अतिसेवन केले जाते.

डॉक्टर सांगतात, “तुम्हाला आहारात जशी दुधी भोपळा खाण्याची सवय असेल तसा खा पण दुधी भोपळ्याचे तुकडे करणे किंवा खरेदी करताना दुधी भोपळा कडू आहे का तपासणे, अशक्य आहे. म्हणून दुधी भोपळ्याचा रस घेणे टाळा आणि पॅकबंद दुधी भोपळ्याचा ज्यूस चुकूनही खरेदी करू नका.”