How To Save Life In Heart Attack: अलीकडेच अनुपमा फेम अभिनेते नितेश पांडे यांचे कार्डियाक अरेस्टमुळे निधन झाले. पांडे यांच्या मृत्यूनंतर हृदयविकारासंबंधित तुमच्याही मनातील भीती आणखी बळावली असू शकते. हृदयविकाराच्या झटक्याविषयी सर्वात गंभीर बाब म्हणजे कोणतीही पूर्वसूचना न देता अवघ्या काही सेकंदात हृदयविकारामुळे जीवही गमवावा लागू शकतो. सहसा ४५ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे पुरुष आणि ५५ किंवा त्याहून अधिक वयाच्या स्त्रियांना मधुमेह, लठ्ठपणा आणि तणाव, हृदयविकाराचा कौटुंबिक इतिहास आणि सवयींमध्ये गतिहीन असल्यास त्यांना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो.दुर्दैवाने भविष्यात कधी अशी वेळ आलीच आणि ती व्यक्ती तेव्हा एकटीच असेल तर स्वतःचा जीव कसा वाचवता येईल याची माहिती आज आपण डॉ टीएस क्लेर, अध्यक्ष, फोर्टिस हार्ट अँड व्हॅस्क्युलर इन्स्टिट्यूट, फोर्टिस मेमोरियल रिसर्च इन्स्टिट्यूट, गुरुग्राम यांच्याकडून जाणून घेणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे कोणती? (Heart Attack Signs)

छातीत दुखण्याकडे लक्ष द्या, विशेषतः छातीच्या मध्यभागी. डाव्या हातापासून वेदना सुरु होऊन नंतर उजव्या हातातही पसरू शकतात. या वेदना काहीवेळा जबड्यापर्यंत जाऊ शकतात. कोणत्याही प्रकारची अस्वस्थता जर २० मिनिटांपेक्षा जास्त काळ टिकत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. तसेच, श्वासोच्छवासाच्या अडचणींकडे लक्ष द्या.

तुम्हाला हात- पाय जड होणे, अकडल्यासारखे वाटणे, दाब, वेदना, जळजळ किंवा सुन्न झाल्यासारखे वाटू शकते. या संवेदना एकतर अनेक मिनिटे टिकू शकतात किंवा काही मिनिटांच्या अंतराने वारंवार परत येऊ शकतात. मळमळ, थकवा, जलद किंवा अनियमित हृदयाचे ठोके याकडे लक्ष द्या.

शांत व्हा, घाबरू नका! शक्य असल्यास उठून बसा व पाठीचा कणा ताठ असुद्या जेणेकरून डायाफ्राम उघडण्यास मदत होते. यामुळे तुम्हाला श्वास घेणे आणि तुमच्या हृदयाला ऑक्सिजन पुरवठा करणे सोपे होईल. तुमच्या हृदयाला अधिक चांगल्या प्रकारे ऑक्सिजन देण्यासाठी ताज्या हवेत दीर्घ श्वास घ्या. सुरुवातीच्या लक्षणांच्या पहिल्या तासात तुम्हाला हृदयविकाराच्या झटक्यासाठी उपचार मिळायला हवे. विलंब केल्यास तुमच्या हृदयाच्या स्नायूंना अधिक नुकसान होते ज्यामुळे पेशींचा मृत्यू होऊ शकतो.

हृदयविकाराचा झटका आल्यास कोणती गोळी घ्यावी? (Doctors Prescribed Medicine For Heart Attack)

यावेळी तुम्ही एस्पिरिन टॅब्लेट (३०० मिग्रॅ), क्लोपीडोग्रेल (३०० मिग्रॅ) आणि एटोरवास्टॅटिन (८० मिग्रॅ), सॉर्बिट्रेट (5 ते 10 मिग्रॅ) या गोळ्या घेऊ शकता. लक्षात घ्या याने फक्त काहीच वेळ आराम मिळू शकतो यानंतर तुम्ही ईसीजीसाठी जवळच्या हॉस्पिटलमध्ये जाणे गरजेचे आहे. तुम्हाला हृदयविकाराचा त्रास होत नसला तरीही, या सर्व गोळ्या जवळ बाळगणे फायद्याचे ठरू शकते.

लक्षणे दिसू लागल्यानंतर ३० मिनिटांच्या आत ऍस्पिरिन चघळल्याने प्लेटलेट एकत्रित होण्यास प्रतिबंध होतो आणि रक्ताच्या गुठळ्या तयार होण्यास विलंब होतो. औषधे चघळल्याने, तुम्ही त्यांना तुमच्या रक्तप्रवाहात सहजपणे शोषून घेण्यास मदत करता.

काही रुग्णांना हृदयविकाराच्या घटनांमध्ये रक्तदाब अचानक कमी झाल्यामुळे भरपूर घाम येणे आणि चक्कर येऊ शकते अशा परिस्थितीत, जेव्हा रक्तदाब कमी होतो, तेव्हा रुग्णाने Sorbitrate घेऊ नये कारण त्यामुळे रक्तदाब आणखी कमी होऊ शकतो. रुग्णाने झोपावे आणि पायाखाली उशी ठेवावी.

तुमची लक्षणे सौम्य आणि सूक्ष्म असली तरीही याकडे दुर्लक्ष करू नका. मूलभूत ईसीजी करा. तातडीची औषधे घेतल्यानंतर तुम्हाला बरे वाटत असले तरीही, एकट्याने गाडी चालवण्याचा प्रयत्न करू नका. शेजारी, मित्र, कुटुंबीय, नातेवाईक कोणाची तरी मदत घ्या.

हे ही वाचा<< ‘अनुपमा’ फेम नितेश पांडे यांच्या मृत्यूनंतर हृदयविकाराने वाढवली चिंता; तज्ज्ञांकडून जाणून घ्या लक्षणे, टेस्ट व धोक्याची कारणे

एकदा तुम्ही तुमच्या हृदयविकाराच्या झटक्यातून बरे झाल्यावर, तुम्हाला काळजी घेणे आवश्यक आहे, आहार आणि जीवनशैलीत बदल करून भविष्यातील हृदयविकाराच्या घटना रोखणे आवश्यक आहे. अर्थात, तुम्हाला तुमच्या कार्डिओलॉजिस्टकडून नियमित तपासणी करून घ्यायला हवी.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to save life in heart attack when you are alone doctor tell three medicines to take for heart pain diseases health news svs
First published on: 26-05-2023 at 18:26 IST