Pet Care: मुंबई, पुणे, दिल्लीसारख्या शहरांमध्ये वायू प्रदूषणाची पातळी दिवसेंदिवस वाढत असल्याने आपल्या पाळीव प्राण्यांना निरोगी आणि सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांच्याकडे विशेष लक्ष देण्याची वेळ आली आहे, म्हणून हिवाळ्यातील थंडी वाढत असताना त्यांच्या आहारात बदल करणे योग्य आहे का? हे समजून घेण्याचे नोएडा येथील पशुवैद्यकीय डॉक्टर डॉ. पुनित कुमार गुप्ता यांचे मत जाणून घेतले. या डॉक्टरांच्या मते आहारात बदल केल्याने मोठा फरक पडू शकतो.

काय लक्षात घ्यावे?

संतुलित पोषण

Wildlife scientists and animal researchers claim about the golden fox thane news
मानवी वस्तीत येणारे सोनेरी कोल्हे निवासीच! वन्यजीव शास्त्रज्ञ, प्राणी अभ्यासकांचा दावा
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Global Warming, Chandrapur , International Conference on Climate Change-2025,
‘ग्लोबल वॉर्मिंग’विरोधात शंखनाद, चंद्रपुरात पर्यावरण बदलावर…
Artificial Intelligence, Sugarcane Farming, Lokshiwar ,
लोकशिवार : ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता
climate change creating favorable environment for mosquito borne diseases
वातावरणातील बदलांमुळे साथींचे आजारही बारमाही? हिवताप, डेंग्यू, लेप्टो, इन्फ्लुएन्झाचा धोका सदासर्वकाळ?
Nashik will be connected to the proposed Vadhvan port
प्रस्तावित वाढवण बंदराबरोबर नाशिक जोडणार
Vegetarian diet for dogs
आता तुमचे पाळीव प्राणीही घेऊ शकतात शाकाहारी आणि वीगन आहार? तज्ज्ञ काय सांगतात…
Animal lovers demand stricter animal laws
प्राणीविषयक कायदे कडक करण्याची गरज, प्राणीप्रेमींची मागणी

आहारामध्ये प्रथिने, चरबी, कर्बोदके, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचा समतोल असल्याची खात्री करा. या गरजा पूर्ण करण्यासाठी बाजारात पाळीव प्राण्यांचे खाद्यपदार्थ मिळतात, परंतु जर तुम्ही घरी जेवण बनवत असाल, तर पशुवैद्य किंवा पाळीव प्राण्यांच्या पोषणतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे,” असे डॉ. गुप्ता म्हणाले.

विषारी पदार्थ टाळा

काही मानवी अन्न पाळीव प्राण्यांसाठी हानिकारक असू शकतात. “चॉकलेट, द्राक्षे, कांदे, लसूण आणि एवोकॅडो श्वान आणि मांजरींसाठी विषारी आहेत. हे त्यांना खायला देणे टाळा आणि त्यांच्यासमोर खाणे टाळा,” असे डॉ. गुप्ता म्हणाले.

नियंत्रित आहार

प्राण्यांना अति आहारामुळे लठ्ठपणा येऊ शकतो, ही हिवाळ्यात पाळीव प्राण्यांमध्ये एक सामान्य समस्या आहे.

“वयानुसार त्यांचे वजन व्यवस्थित असल्याची खात्री करण्यासाठी नियमितपणे आपल्या पशुवैद्याकडे तपासा. सहा महिन्यांपर्यंत, २४ तासांत चार वेळा जेवणाचा सल्ला दिला जातो; सहा महिने ते एक वर्षापर्यंत २४ तासांत तीन वेळा जेवण, तर एक वर्षावरील २४ तासांत दोन वेळा जेवणाचा सल्ला दिला जातो.

हायड्रेशन

आपल्याप्रमाणेच पाळीव प्राण्यांनाही भरपूर पाणी लागते. “त्यांना नेहमी ताजे पाणी प्यायला द्या. तुमचे पाळीव प्राणी पिण्यास नाखूष असल्यास, त्यांच्या आहारात ओले अन्न समाविष्ट करा किंवा पाळीव प्राण्यांच्या पाण्याचे फवारा वापरून हायड्रेशनला प्रोत्साहन द्या,” असे डॉ. गुप्ता म्हणाले.

विशेष आहार

आपल्या पाळीव प्राण्याला ॲलर्जी, मधुमेह किंवा किडनी समस्या यांसारख्या विशिष्ट आरोग्य समस्या असल्यास त्यांच्या आहारात विशेष बदल आवश्यक असू शकतात. उदाहरणार्थ, काही पाळीव प्राण्यांना धान्य-मुक्त आहार किंवा कमी प्रथिने पर्यायांचा फायदा होऊ शकतो. योग्य सल्ल्यासाठी नेहमी आपल्या पशुवैद्याचा सल्ला घ्या.

हळूहळू नवीन पदार्थ खाऊ घाला

जर तुम्ही तुमच्या पाळीव प्राण्यांचा आहार बदलत असाल किंवा नवीन पदार्थ आणत असाल तर पचनक्रिया बिघडू नये म्हणून ते हळूहळू करा, असे आवाहन डॉ. गुप्ता यांनी केले. “त्यांच्या सध्याच्या अन्नामध्ये थोड्या प्रमाणात नवीन अन्न मिसळा आणि दिवसेंदिवस त्याचे प्रमाण वाढवा. डिजिटन किंवा जाइमोपेटसारखी पाचक पूरक आहाराचा समावेश करा,” असे डॉ गुप्ता म्हणाले.

पूरक आहार

डॉ. गुप्ता यांनी स्पष्ट केले की, आपल्या पाळीव प्राण्याचे आरोग्य आणि आहार यावर अवलंबून त्यांना त्वचेसाठी ओमेगा -३ फॅटी ॲसिडस् किंवा पाचन समर्थनासाठी प्रोबायोटिक्ससारख्या पूरक आहारांचा फायदा होऊ शकतो. मात्र, त्याआधी तुमच्या पशुवैद्यकाशी याबद्दल चर्चा करणे चांगले आहे,” असे डॉ. गुप्ता यांनी सांगितले.

हेही वाचा: दररोज एक केळे खाल्ल्याने तुम्ही निरोगी राहू शकता? तज्ज्ञ काय सांगतात…

प्रतिक्रियांचे बारकाईने निरीक्षण करा

तुमचे पाळीव प्राणी त्यांच्या अन्नावर कशी प्रतिक्रिया देतात यावर लक्ष ठेवा. “तुम्हाला ॲलर्जीची किंवा पचनाशी संबंधित समस्यांची लक्षणे दिसल्यास, त्यांच्या आहाराचे पुनर्मूल्यांकन करा,” असे डॉ गुप्ता म्हणाले.

नियमित पशुवैद्यकीय तपासणी

पशुवैद्यकाला नियमित भेटी दिल्यास आहारासंबंधीच्या कोणत्याही समस्या लवकर लक्षात येण्यास मदत होऊ शकते आणि आपल्या पाळीव प्राण्याला आवश्यक ते पोषण मिळत असल्याची खात्री करून घेता येते.

Story img Loader