‘Best’ time to check your blood sugar levels? फक्त आपल्या देशातच नव्हे, तर संपूर्ण जगभरात डायबेटीज (मधुमेह) रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. डायबेटीज हा एक असा आजार आहे जो संपूर्ण शरीरावर परिणाम करतो. यामुळे विविध अवयवांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. या रुग्णांना औषधांसोबतच अनेक आहार व जीवनशैलीविषयक बंधनं पाळावी लागतात.
अनेकजण नियमितपणे ब्लड शुगर लेव्हल तपासत असतात. मात्र, ही तपासणी योग्य वेळी केली गेली नाही, तर अचूक परिणाम मिळणे कठीण होते. तर मग ब्लड शुगर लेव्हल तपासण्याची योग्य वेळ नेमकी कोणती? तुम्हाला माहितीये का, रक्तातील साखरेची पातळी तपासताना वेळ बघणे महत्त्वाचे असते. कारण प्रत्येक वेळी याचे प्रमाण हे वेगवेगळे दाखवते. ठाणे येथील ज्युपिटर हॉस्पिटलच्या सल्लागार मधुमेहतज्ज्ञ डॉ. स्नेहल तन्ना यांनी दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना, या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे.
ब्लड शुगर लेव्हल तपासण्याची योग्य वेळ कोणती?
ब्लड शुगर लेव्हल तपासण्याची योग्य वेळ ही सकाळची आहे किंवा कमीत कमी ८ तास कोणतेही अन्न किंवा पेय न घेता मोजणे योग्य आहे. जेवणानंतर दोन तासांनी तपासलेली ब्लड शुगर लेव्हल आपले शरीर अन्नातील साखरेचे नियमन कितपत चांगल्या प्रकारे करते हे दाखवते. मधुमेहाच्या सुरुवातीच्या टप्प्यातील निदानासाठी आणि उपचारांची प्रभावीता तपासण्यासाठी ही माहिती उपयुक्त ठरते.
डॉ. तन्ना सांगतात, “जेवणानंतर दोन तासांनी ब्लड शुगरची पातळी 140 mg/dL पेक्षा कमी असावी, ही सामान्य मानली जाते. दिवसाच्या कोणत्याही वेळी ब्लड शुगर तपासता येते, परंतु योग्य वेळेला तपासल्यास अधिक अचूक व उपयुक्त माहिती मिळते. वारंवार लघवी होणे, जास्त तहान लागणे यासारखी लक्षणं दिसत असल्यास, ती मधुमेहाची संकेतं असू शकतात.”
हैदराबाद येथील सल्लागार डॉक्टर व क्रिटिकल केअर स्पेशालिस्ट डॉ. हिरन एस. रेड्डी यांच्या मते, प्रत्येक चाचणीचा विशिष्ट उद्देश असतो:
जेवणापूर्वीची तपासणी: दिवसभरातील ग्लुकोज नियंत्रण किती चांगले आहे हे समजते.
जेवणानंतर दोन तासांनी तपासणी: शरीर अन्नातील साखर किती योग्य रीतीने पचवते हे दर्शवते.
झोपण्यापूर्वीची तपासणी: रात्रभरातील ग्लुकोज स्थिरता तपासता येते, विशेषतः इन्सुलिनवर अवलंबून असलेल्या रुग्णांसाठी.
त्यांनी पुढे सांगितले की, “प्रत्येकासाठी एकच विशिष्ट वेळ सर्वोत्तम असते असे नाही.” याशिवाय, HbA1c चाचणी हे एक उपयुक्त साधन आहे, जे तीन महिन्यांच्या सरासरी ब्लड शुगर लेव्हलचे मूल्य देते. मात्र ही चाचणी प्रयोगशाळेत केली जाते.
वयानुसार ‘नॉर्मल’ ब्लड शुगर लेव्हल काय असावी?

शेवटी, डॉ. रेड्डी यांनी स्पष्ट केले की, ब्लड शुगर तपासणी करण्याआधी कोणतीही शंका असल्यास आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे. योग्य तपासणी आणि वेळेवर निदान केल्यास मधुमेहावर प्रभावी नियंत्रण ठेवता येते.