Walking Yoga Benefits: योगा आणि चालण्याचे असंख्य आरोग्य फायदे आपल्याला माहीत आहेत. पण तुम्ही कधी या दोघांच्या संयोजनाबद्दल ऐकले आहे का? ते म्हणजे वॉकिंग योगा, “तुमच्या शरीराचे संगोपन करण्याचा, मन शांत करण्याचा आणि तुमच्या अंतर्मनाशी जोडण्याचा हा एक सौम्य; पण शक्तिशाली मार्ग आहे.” असे योगा थेरपिस्ट रुची खोसला म्हणाल्या.

पारंपरिक योगापेक्षा यात काय वेगळे?

वॉकिंग योगा मॅटवर केल्या जाणाऱ्या पारंपरिक योगापेक्षा वेगळा आहे. “तुम्ही टाकत असलेले प्रत्येक पाऊल, तुमच्या श्वासाची लय, तुमचे शरीर आणि तुम्ही ज्या जमिनीवरून चालता, ती जमीन (पृथ्वी तत्त्व) यांच्यामधील संबंधाची जाणीव ठेवणे या सर्वांशी वॉकिंग योगा संबंधित आहे. तुम्ही उद्यानात, समुद्रकिनाऱ्यावर किंवा अगदी तुमच्या स्वतःच्या घरात चालत असलात तरी वॉकिंग योगा तुम्हाला प्रत्येक पावलागणिक वर्तमान क्षण स्वीकारण्यास मदत करतो,” असे खोसला म्हणाल्या.

वॉकिंग योगाचे फायदे

वॉकिंग योगा मन, शरीर व आत्मा यांच्यासाठी असंख्य फायदे देतो. त्यामुळे तो एक समग्र सराव बनतो, जो कोणीही आपल्या दिनचर्येत समाविष्ट करू शकतो. “शारीरिकदृष्ट्या पाहिले तर, त्यामुळे रक्ताभिसरण सुधारते, स्नायूंना बळकटी देते आणि सौम्य, कमी-प्रभावी हालचालींद्वारे सांध्यांची गतिशीलता वाढवते . मानसिकदृष्ट्या पाहिल्यास, त्यामुळे सजगता आणि श्वासोच्छ्वासाची जाणीव वाढवून, ताण आणि चिंता कमी करण्यास मदत मिळते, ज्यामुळे तुम्हाला मन शांत होऊन, एकाग्रता साधणे सोपे झाल्यासारखे वाटते,” असे खोसला यांनी स्पष्ट केले.

वॉकिंग योगामुळे भावनिकदृष्ट्या एकरूपता आणि भावना निर्माण होते, ज्यामुळे तुम्हाला अधिक उपस्थित राहण्याची आणि त्या क्षणाबद्दल कृतज्ञता वाटण्यास मदत होते. आध्यात्मिकदृष्ट्या, वॉकिंग योगामुळे निसर्गाशी आणि तुमच्या अंतर्मनाशी असलेले तुमचे नाते अधिक घट्ट होते, शांती आणि सुसंवाद निर्माण होतो. वॉकिंग योगाचा स्वीकार करून, तुम्ही तुमच्या जीवनात संतुलन, सजगता व आनंदाला आमंत्रित करता, असे मत खोसला यांनी व्यक्त केले.

कसे सुरू करावे?

एक हेतू निश्चित करा : वॉकिंग योगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडा वेळ थांबा आणि तुम्हाला कशावर लक्ष केंद्रित करायचे आहे याचा विचार करा.

सौम्य हालचाली करा : तुम्ही तुमचे हात ताणू शकता, खांदे फिरवू शकता, चालताना हळुवारपणे हालचालही करू शकता किंवा डोंगराच्या पोजेसारखी योगासनेदेखील करू शकता.

पूर्ण लक्ष स्वतःवर केंद्रित करा : तुमचे पाय जमिनीला स्पर्श करतानाची संवेदना, तुमच्या त्वचेला स्पर्श करीत असलेली वाऱ्याची झुळूक आणि तुमच्या हालचालींची लय लक्षात घ्या.

कृतज्ञता व्यक्त करा : या सजग सरावाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि विचार करण्यासाठी क्षणभर थांबा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“वॉकिंग योगा ही केवळ एक क्रिया नाही, तर तो स्वतःशी आणि तुमच्या सभोवतालच्या जगाशी जोडण्याचा एक मार्ग आहे. ही सोपे, आरामदायी आणि कोणीही करू शकते, अशी यौगिक क्रिया आहे. तेव्हा करून पाहा आणि त्यामुळे तुमचा दिवस कसा बदलतो ते ध्यानात घ्या,” असे खोसला म्हणाल्या.