सुंदर दिसायला कोणाला नाही आवडत? आपल्या चेहऱ्यावर डाग, मुरमे, सुरकुत्या दिसू नयेत अशी प्रत्येकाची इच्छा असते. विशेषत: महिला सुंदर दिसण्यासाठी त्वचेची खूप काळजी घेताना दिसतात. त्यासाठी त्या वॉटर रेजिस्टंट मॉइश्चरायजरचा वापर करण्याबरोबरच इतरही अनेक उपाय करून पाहतात. त्याशिवाय सण-समारंभ,पार्टीनिमित्त मेकअप प्रॉडक्ट्सचा वापर करतात. या मेकअप प्रॉडक्ट्समध्ये काजळ, आयलायनर, लिपस्टिक, मस्कारा अशा अनेक गोष्टींचा समावेश असतो. असे मेकअप प्रॉडक्ट्स अनेकदा सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकणारे असतात, असा दावा केला जातो. परंतु, त्यामुळे कर्करोग, हाय कोलेस्ट्रॉल, थायरॉइड रोग, यकृत खराब होणे, दमा व अॅलर्जी यांसारख्या आजारांचा धोका वाढत असल्याचे समोर आले आहे. कारण- या मेकअप प्रॉडक्ट्समध्ये परफ्लुओरोआल्किल पदार्थ (PFAS) नावाच्या मानवनिर्मित रसायनाचा अधिक वापर केला जातो; जे आपल्या शरीरासाठी घातक ठरत आहे. याच विषयावर द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना कन्सल्टंट डर्मेटोलॉजिस्ट व एस्थॅटिक डर्मेटोलॉजिस्ट डी अग्रवाल, डॉ. कश्यप यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

मेकअप प्रॉडक्ट्समुळे वाढत्या आजारांचा धोका पाहता, न्यूझीलंड २०२६ च्या सुरुवातीला कॉस्मेटिक उत्पादनांवर बंदी घालणारा पहिला देश बनण्याच्या तयारीत आहे.

बटाट्याच्या फेस पॅकने चेहऱ्यावरील काळे डाग, मुरम, सुरकुत्या होतात का? त्वचारोगतज्ज्ञ काय सांगतात एकदा वाचा

मेकअप प्रॉडक्ट्समध्ये वापरलेली रसायने त्वचेवर अडथळा निर्माण करतात, त्वचेचे एन्व्हायर्मेंटल डॅमेजपासून रक्षण करतात व त्वचा वॉटरप्रूफ करतात. पण, त्यातील फ्लोरिन व कार्बन ही रसायने शरीरावर घातक परिणाम करीत असतात. १९५० च्या दशकापासून या रसायनांचा वापर केला जात आहेत. त्याशिवाय आज अनेक नॉन-स्टिक कूकवेअरसह ग्राहकोपयोगी वस्तूंमध्येही या रसायनांचा वापर केला जात आहे. त्यावरून ती त्वचेसाठी किती घातक ठरत असतील याचा विचार करू शकता. ही रसायने ओठ, त्वचा व डोळ्यांमधून जलद गतीने शरीरात प्रवेश करण्यास सक्षम आहेत, अशी माहिती मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलच्या कन्सल्टंट डर्मेटोलॉजिस्ट व एस्थॅटिक डर्मेटोलॉजिस्ट डॉ. तृप्ती डी. अग्रवाल यांनी दिली आहे.

मेकअप प्रॉडक्ट्स तुमच्यासाठी चिंताजनक का आहेत?

तोंड आणि अश्रूनलिकेजवळील पातळ श्लेष्म कोशिका मेकअप प्रॉडक्ट्समध्ये वापरला जाणारा Polyfluroalkyl(PFAS) हा पदार्थ शोषून घेतात. PFAS चा वापर मस्कारा आणि फाउंडेशन यांसारख्या मेकअप उत्पादनांचा टिकाऊपणा आणि सुलभता वाढवते; परंतु त्यांचे अनेक प्रतिकूल परिणाम आहेत.

लिपस्टिकचा वापर करणाऱ्या स्त्रियांच्या तोंडावाटे हे रसायन अनेकदा शरीरात जाण्याची शक्यता आहे. काही वेळा अजाणतेपणे लिपस्टिक दातांना किंवा ओठांच्या आत लागते; जी नंतर पोटात जाते. त्यामुळे लिपस्टिक वापरताना खूप काळजी घेतली पाहिजे. तसेच नवीन लिपस्टिक खरेदी करण्यापूर्वी त्यावरील माहिती नीट तपासून मगच ती खरेदी केली पाहिजे.

एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की, मेकअप प्रॉडक्ट्समधील काही रसायने त्वचेद्वारे सहजपणे शोषली जाऊ शकतात; पण ती सहजपणे शरीरातून काढून टाकली जाऊ शकत नाहीत. कालांतराने शरीरात या रसायनांची पातळी वाढू शकते आणि त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो, अशी माहिती गुरुग्राममधील मरेंगो एशिया हॉस्पिटल्सचे कन्सल्टंट डर्मेटोलॉजिस्ट व लेझर एक्स्पर्ट डॉ. एस. के. कश्यप यांनी दिली.

रसायनांमुळे तुमच्या शरीरावर दीर्घकालीन घातक परिणाम होऊ शकतात?

२०२० च्या अभ्यासात असे आढळून आले आहे की, चार दिवस रसायनांच्या जास्त संपर्कात आल्याने इंजेक्ट केलेल्या उंदरांची रोगप्रतिकार शक्ती लक्षणीयरीत्या कमी झाल्याचे दिसून आले. संशोधकांना त्यांच्या प्लीहा आणि थायमसमध्ये बदल आढळून आले; जे असे दर्शवितात की, ही रसायने त्वचेतून शरीरात प्रवेश करतात आणि त्यांचा रोगप्रतिकार शक्तीवर प्रभाव पडत आहे. त्यानंतर मानवावरील अभ्यासातून असे दिसून आले आहे की, कायमस्वरूपी रसायनांच्या कमी पातळीच्या संपर्कात राहिल्याने मुलांच्या आणि प्रौढांच्या रोगप्रतिकारक शक्तीला हानी पोहोचते. त्यामुळे गंभीर आजारांचा धोकाही वाढू शकतो. त्यामध्ये जन्मतः वजन कमी असणे, हार्मोन्सचे असंतुलन, कर्करोग व रोगप्रतिकारक शक्ती कमजोर होणे अशा समस्यांचा समावेश आहे. रसायने आणि कोलेस्ट्रॉलची वाढलेली पातळी, यकृतातील एन्झाइममधील बदल, काही लसींना प्रतिजैविकाबाबत कमी प्रतिसाद, गर्भधारणेतील उच्च रक्तदाब व प्रीक्लेम्पसिया यांच्यात समान दुवे आढळले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मेकअप प्रॉडक्ट वापरताना काय काळजी घेतली पाहिजे?

नेहमी वॉटर बेस कॉस्मेटिक प्रॉडक्ट्सचा वापर करणे फायदेशीर ठरू शकते. तुम्ही वारंवार अशा प्रॉडक्ट्सचा वापर करू शकता. कारण- वॉटर बेस कॉस्मेटिक प्रॉडक्ट्समुळे (फॉर्म्युलेशन) तुमच्या त्वचेला अनेक फायदे मिळतात. प्रामुख्याने असे मेकअप प्रॉडक्ट्स सहज काढता येतात आणि ते त्वचेचे कमी प्रमाणात नुकसान करतात. पीएफएएसचा वापर करून बनविलेल्या मेकअप प्रॉडक्ट्सपेक्षा वॉटर बेस कॉस्मेटिक प्रॉडक्ट्स सहज पाण्याने धुतली जाऊ शकतात; ज्यामुळे त्वचेवर त्याचा दीर्घकाळपर्यंत वापर झाला तरी त्वचेचे काही नुकसान होत नाही, तसेच त्यामुळे शरीरात घातक रसायने जाण्याचा धोकाही कमी होतो. त्यामुळे नेहमी सुरक्षित पर्यायांची निवड कर, असा सल्ला डॉ. कश्यप देतात.