scorecardresearch

उन्हाळ्यात तुम्हीही तांब्याच्या बाटलीमधून पाणी पिताय? तर ‘या’ गोष्टींचा काळजी घ्या, अन्यथा…

Summer 2023, Copper bottle मधून पाणी पिणे शरीरासाठी फायदेशीर असते, पण उन्हाळ्यात ते किती प्यायले पाहिजेत याला काही मर्यादा असतात.

Copper bottle water benefits side effect in summer
उन्हाळ्यात तांब्याच्या बाटलीतील पाणी पिण्याचे फायदे, तोटे (फोटो संग्रहित)

Copper Bottle Water Benefits In Summer : तांब हा धातू आपल्या शरीरासाठी आवश्यक खनिजांपैकी एक आहे. लोहासोबत तांबे शरीरातील लाल रक्तपेशी तयार करण्यास मदत करतात. ज्यामुळे रक्तवाहिन्या, नसा, रोगप्रतिकारक शक्ती आणि हाडांचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी मदत होते. प्रौढांना निरोगी आरोग्यासाठी रोज ९०० मायक्रोग्रॅम तांब्याची गरज असते, जी पूर्ण करण्यासाठी बहुतेक लोक तांब्याच्या बाटलीत ठेवलेले पाणी पितात.

तांब्याच्या भांड्यात किमान आठ तास पाणी ठेवल्याने पाण्याची शुद्धता तर वाढतेच शिवाय पाण्यात तांबे मिसळले जाते, हे पाणी प्यायल्यास शरीरास आवश्यक तांब मिळू शकते. आहारातूनही शरीरास तांबे पोहचवते येते. पण तांब्याच्या भांड्यातील पाण्यातून मोठ्याप्रमाणात तांब शरीरात जाते. पण तांब्याच्या बाटलीतील पाणी मर्यादेत पिणेच फायदेशीर असते. त्याच्या अतिरेकामुळे अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात. अशावेळी काही गोष्टींची काळजी घेण्याची गरज आहे. विशेषत: उन्हाळ्यात तांब्याच्या बाटलीतून जास्त पाणी का पिऊ नये असे सांगितले जाते. यामागे काय आयुर्वेदिक कारण आहे जाणून घेऊ…

‘या’ समस्यांपासून राहता येते दूर

आयुर्वेद तज्ज्ञांच्या मते, तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्याने कफ, वात आणि पित्त हे तीनही दोष दूर होतात आणि शरीरातील नैसर्गिक ऊर्जा संतुलित राहते. हा धातू विविध अवयवांचे कार्य आणि चयापचय प्रक्रिया सुनिश्चित करण्यास देखील मदत करतो.

उन्हाळ्यात तांब्याच्या बाटलीतील पाणी पिणे हानिकारक (copper bottle water side effects)

याशिवाय थायरॉईड ग्रंथीचे कार्य सुधारते, अशक्तपणा कमी होतो , हाडे मजबूत होतात, वजन कमी करण्यास मदत होते आणि लाल रक्तपेशी वाढवण्यासाठी हा खूप महत्वाचा घटक आहे. परंतु तांब्याच्या भांड्यातील पाणी उन्हाळ्यात जास्त प्रमाणात सेवन करणे हानिकारक ठरु शकते.

उन्हाळ्यात गरम पाण्याने आंघोळ करावी का? ‘हे’ ५ मुद्दे देतील तुमच्या प्रश्नाचं नेमकं उत्तर

तांब्याच्या बाटलीतील पाणी दिवसातून किती वेळा प्यावे?

आयुर्वेद तज्ज्ञांच्या मते, आपले शरीर इतर पोषक तत्वांप्रमाणे तांबे संश्लेषित करू शकत नाही, ते आहारातील स्त्रोतांकडून मिळवणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत तांब्याच्या भांड्यात पाणी हा एक उत्तम पर्याय आहे. परंतु त्याचे सेवन दिवसातून 3 ग्लासपर्यंत मर्यादित करा. कारण तांब्याच्या भांड्यातून जास्त प्रमाणात पाणी प्यायल्याने विषबाधा होऊ शकते. यामुळे, चयापचय आणि पाचन विकारांशी संबंधित समस्या वाढण्याचा धोका असतो.

उन्हाळ्यात तांब्याच्या बाटलीतून पाणी प्यायल्यास होऊ शकतात ‘हे’ आजार

तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी पिणे अत्यंत आरोग्यदायी आहे, असे आयुर्वेद तज्ज्ञ सांगतात, परंतु उन्हाळ्यात त्याचे कमी प्रमाणात सेवन करावे, कारण तांब्याची प्रकृती उष्ण असते. अतिसेवनामुळे अॅसिडिटी, ब्लोटिंग, मायग्रेनची समस्या होऊ शकते. त्याचा सर्वाधिक दुष्परिणाम पचनाच्या आरोग्यावर होतो, त्यामुळे शरीरासाठी आवश्यक प्रमाणात तांब्याचे सेवन केले पाहिजे. रोज सकाळी तांब्याच्या भांड्यात ठेवलेले १ ते २ ग्लास पाणी पिणे पुरेसे आहे.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे, गरज असल्यास वैद्यकीय सल्ला घ्या)

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-03-2023 at 14:49 IST

संबंधित बातम्या