किडनी हा आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे, जो शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकतो आणि आपलं शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतो. किडनीसंदर्भातील समस्या केवळ तरुण आणि वयस्कर लोकांनाच होते असं नाही, तर लहान मुलांनाही या समस्येचा सामना करावा लागतो. नवजात बालकांना किडनीशी संबंधित आजार होऊ शकतात. किडनीच्या आजाराचा मुलांवर अनेक प्रकारे परिणाम होतो. अनेकदा मुल जन्माला येतानाच त्यांच्या किडनीशी संबंधित आजार असतात, ज्यामध्ये किडनीला सुज येणाच्या समस्येचाही समावेश आहे.

किडनीला सूज येणे हा नेफ्रोटिक सिंड्रोम नावाचा सामान्य मूत्रपिंडाचा आजार आहे. हायड्रोनेफ्रोसिसमुळे (Hydro nephrosis) मूत्रपिंडात सूज येते. शिवाय लहान मुलामध्ये या आजाराची लक्षणे दिसल्यावर त्या मुलाची शस्त्रक्रिया करावी लागणार का? त्यांचे डायलिसिस करावे लागेल का ? मूल सामान्य जीवन जगू शकेल का?असे अनेक प्रश्न पालकांना सतावत असतात. नेफ्रोलॉजिस्ट डॉक्टर कुणाल पाई यांच्या मते, ‘हायड्रोनेफ्रोसिस हा लहान मुलांमध्ये आढळणारा आजार आहे जो प्रेग्नेंसीमध्ये १ ते २ टक्के मुलांमध्ये दिसून येतो.’

हेही वाचा- सतत मोबाईलचा वापर केल्याने डोळे होतात कमजोर; काळजी घेण्याचे उपाय तज्ञांकडून जाणून घ्या

मुलामध्ये ही सूज येण्याचे कारण म्हणजे मूत्रमार्गाचा मार्ग अरुंद होणे असू शकते. अनेकदा ही सूज मूत्रपिंडाच्या एका बाजूला दिसते. परंतु ती दोन्ही मूत्रपिंडांमध्येही येण्याची शकते असते. जेव्हा आपली किडनी मूत्रवाहिनीला मिळते तेव्हा मूत्रमार्गात अडथळे निर्माण होण्याची समस्या उद्भवते. त्यामुळे तुम्हाला जर तुमच्या मुलांना नेहमी निरोगी आणि तंदुरुस्त ठेवायचे असेल, तर या आजाराबद्दलची माहिती जाणून घेणे महत्त्वाचे आहे. या आजाराची लक्षणे आणि त्यावर काय उपचार करता येऊ शकतात तेआज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

हेही वाचा- तुम्हालाही वारंवार लघवी होते का? तर हाय सोडियम बनवतंय तुमच्या रक्तामध्ये पाणी, लगेच करा ‘या’ पदार्थांचे सेवन

हायड्रोनेफ्रोसिसची लक्षणे –

  • पाठ, ओटीपोट आणि मांडीचा सांध्यात अचानक वेदना सुरू होतात. लघवी करताना ही वेदना होऊ शकतात.
  • सतत लघवी करावीशी वाटते
  • लघवीमध्ये रक्त येणे
  • मळमळ आणि उलटी होणे
  • मुलांना लघवी करताना तीव्र त्रास होतो.
  • ताप आणि अशक्तपणा ही देखील या आजाराची लक्षणे आहेत.

उपचार –

हेही वाचा- रोज सकाळी ‘या’ वनस्पतींची पाने खाल्ल्याने रक्तातील साखर राहील नियंत्रणात? सेवनाची पद्धत जाणून घ्या

हायड्रोनेफ्रोसिसची त्रास सुरु झाल्यावर डॉक्टर सर्वाच आधी मुलाची तपासणी करतात. लहान मुलाच्या जन्मापूर्वीच या समस्येसाठी अल्ट्रासाऊंड चाचणी केली जाती. याशिवाय, प्रसूतीनंतर बाळाची चाचणी रीनल अल्ट्रासाऊंड, रेनल स्कॅन आणि व्हॉईडिंग सिस्टोरेथ्रोग्राम अशा विविध टेस्ट केल्या जातात.

हा आजार झाल्याची खात्री झाल्यावरच डॉक्टर मुलावर उपचार सुरू करतात. हायड्रोनेफ्रोसिसचा उपचार पेशंटनुसार बदलतो. या आजारावर वेळीच उपचार न केल्यास मुलांची किडनीही खराब होण्याचा धोका असतो. त्यामुळे पालकांनी मुलाच्या किडनीतील या समस्येची लक्षणे वेळेवर ओळखायला हेवीत जेणेकरुन त्यांच्यावर लगेच उपचार करणं शक्य होईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे, किडनीसंदर्भातील अधिकच्या माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या)