दारुसोबत व्हायग्राच्या गोळ्या खाल्याने एका ४१ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संशोधकांच्या म्हणण्यानुसार, मृत व्यक्तीने अल्कोहोलसह इरेक्टाइल डिसफंक्शनवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या गोळ्या खाल्या, ज्यामुळे दुसऱ्याच दिवशी त्याच्या मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. नवी दिल्लीच्या ऑल इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या ६ संशोधकांच्या गटाने पीअर-रिव्ह्यू केलेल्या जर्नल ऑफ फॉरेन्सिक अँड लीगल मेडिसिनला सादर केलेल्या रिपोर्टमध्ये या घटनेबाबतचा तपशील उघड केला आहे. संशोधकांनी मागील वर्षीच्या सप्टेंबरमध्ये त्यांचे निष्कर्ष सादर केले होते. त्या प्रकरणाचा रिपोर्ट या आठवड्याच्या सुरुवातीला ऑनलाइन उपलब्ध करण्यात आला आहे.

हेही वाचा- लघवीतून युरिक ऍसिड झपाट्याने बाहेर काढेल कोथिंबीर; जाणून घ्या कसा करायचा चविष्ट काढा

या केसच्या अहवालात, संशोधकांनी नमूद केले आहे की, ४१ वर्षीय व्यक्तीची याआधी कसलीही शस्त्रक्रिया झालेली नव्हती. तो त्याच्या मैत्रीणीसोबत एका हॉटेलमध्ये थांबला होता. यावेळी त्याने ५० mg च्या दोन सिल्डेनाफिल गोळ्या खाल्ल्या, ज्या व्हायग्रा या ब्रँडच्या नावाखाली विकल्या जातात. या व्यक्तीने गोळ्यांसोबत दारू पिली होती. त्याने या गोळ्या खाल्यानंतर त्याची तब्येत खालावली तर दुसऱ्याच दिवशी तब्येत जास्तच बिघडल्यामुळे त्याला रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र तिथे त्याला मृत घोषित करण्यात आलं.

हेही वाचा- शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करू शकतात ‘ही’ फळं; हृदयाचे आरोग्य सुधारण्यास देखील उपयुक्त

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वैद्यकीय तपासणीत त्याच्या मेंदूमध्ये जास्त रक्तस्त्राव झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याच समोर आलं. तर त्याच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये मेंदूमध्ये सुमारे ३०० ग्रॅम रक्त गोठल्याचं उघड झालं. पोस्टमार्टममध्ये त्या व्यक्तीच्या हृदयाच्या वॉल जाड झाल्याचं आणि किडनीसह आणि मूत्रपिंडालाही काही प्रमाणात नुकसान झाल्याचं समोर आले. या प्रकरणानंतर संशोधकांचं असंही म्हणणे आहे की, “डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय व्हायग्रा खाल्यास त्याचे दुष्परिणाम भोगावे लागू शकतात त्यामुळे याबाबतची नागरिकांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे.”