मुलांचे योग्य वागणुकीबद्दल कौतुक करणे, त्यांना बक्षीस देणे, प्रोत्साहन देणे यातून मुले हळूहळू अपेक्षित अशी वर्तणूक करू लागतात. आपल्या आई वडिलांना, घरातल्या मोठ्या माणसांना, शाळेतल्या शिक्षकांना अपेक्षित असा व्यवहार केला की मुलांनाही आपल्या वागणुकीतून आनंद मिळतो, आत्मविश्वास निर्माण होतो, सकारात्मक स्वभावना(self esteem) निर्माण होते. अर्थात अशी मुले सर्वांना आवडतात.

लक्षात ठेवले पाहिजे ते असे की आपली मुले म्हणजे यंत्रे नाहीत. एकदा एक सेटिंग केले की मशीन मुकाट्याने काम करत राहते, तसे आपल्या मुलाचे नसते. आपल्या मुलांचे विश्व रुंदावते, अनेक व्यक्तींशी त्यांचा संपर्क येतो. विविध लोक त्यांच्याशी विविध प्रकारे वागतात. त्यांच्यासमोर अनेक ‘रोल मॉडेल्स’ किंवा उदाहरणे असतात आणि मुले वेगवेगळ्या गोष्टी शिकत राहतात. तसेच मुलांची मानसिक आणि भावनिक स्थिती बदलती असते. कधी मुलांना राग येतो, एखादी गोष्ट मनासारखी घडत नाही, मनामध्ये भीती, चिंता असते अशा वेळी मुले रागावतात, हट्ट करतात, रडून गोंधळ घालतात, आदळआपट करतात. काही मुले कोणत्याही परिस्थितीत अशा मार्गांचा वापर करतात. आपल्याला हवी असलेली वस्तू, खाऊ नाही मिळाला, दुसऱ्या मुलाने आपले खेळणे घेतले, आईने धाकट्या भावंडाला कडेवर घेतले आणि आपल्याकडे दुर्लक्ष केले अशा अनेक प्रसंगांमध्ये लहानपणापासून मुले हट्ट करतात. आता टीव्ही आणि मोबाइल फोन हे मोठी माणसे आणि लहान मुले यांच्यातले संघर्षाचे दोन मुख्य मुद्दे बनले आहेत. काही वेळेस मारामारी करणे, एखादी गोष्ट(परीक्षेतले मार्क) पालकांपासून लपवून ठेवणे, आईच्या पर्समधून पैसे घेणे अशा मोठ्या घटनाही घडतात.

This is what happens when you chew cloves everyday
रोज एक-दोन लवंग चघळल्या तर शरीरावर काय परिणाम होईल? तज्ज्ञांकडून जाणून घ्या उत्तर…
Can zero soda or soda water be good for you?
गरम होतंय म्हणून गारेगार सोडा पिताय? सावधान! आरोग्यावर होतील दुष्परिणाम
Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
gut health diet
आतड्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी ‘या’ बाबी आवश्यक; अन्यथा पोटाची दुर्दशा

हेही वाचा…Health Special : चपळता वाढवणारं ट्रेनिंग का आवश्यक?

अशा प्रत्येक वेळी आपल्या मुलाला शिस्त कशी लावायची, काय केले असता आपले मूल आपल्याला ‘नको असलेले’ वागणे कमी करून जास्तीत जास्त वेळा आपल्याला ‘हवे असलेले’ वागेल? आपल्या मुलाला आपण शिक्षा करायची की नाही? किती करायची? कधी करायची? सगळे पालक यासाठी आपल्या अनुभवांमधून, वेगवेगळे प्रयोग करून परिस्थितीतून मार्ग काढत असतात. शिक्षेसंबंधी काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवले पाहिजेत. शिक्षा हा काही शिस्त लावण्याचा आदर्श मार्ग नाही. एक तर वारंवार शिक्षा केल्याने त्याची परिणामकारकता राहात नाही; जसे पत्र्यावर पावसाचे मोठ्ठे थेंब पहिल्यांदा पडले की दचकायला होते, पण नेहमीच पडणाऱ्या पावसाच्या आवाजाची सवय होते आणि दचकायला होत नाही. काहीसे असेच नेहमी शिक्षा दिली तर होते. मुले शिक्षेला जुमानेशी होतात आणि मोठ्यांच्या विरोधातली उर्मटपणे भूमिका घेऊ लागतात (oppositional defiant behaviour), त्यांच्या वर्तणुकीच्या समस्या(behavioural problems) अधिकच तीव्र होतात. म्हणून शिक्षेव्यतिरिक्त इतर उपाय करून शिस्त लावायचा प्रयत्न करावा हे चांगले.

समजा शिक्षा करायचीच असली तर ती चूक झाल्यावर लगेच करणे आवश्यक; तसेच ज्या प्रमाणात चूक त्या प्रमाणात शिक्षा असावी. उदा. आईच्या पर्समधून दोनशे रुपये न सांगता घेतले, तर मुलाचा फोन काढून घेणे ही शिक्षा प्रमाणाबाहेर. कोणत्याही प्रकारचे प्रोत्साहन, शाबासकी ही अधिक परिणामकारक असते. शिस्त लावताना दिलेले बक्षीस काढून घेणे, दिलेली सवलत काढून घेणे याचा चांगला उपयोग होतो (withdrawal of positive reinforcement). उदा. गृहपाठ न केल्याबद्दल तीन वेळा तोच गृहपाठ लिहायला लावणे ही झाली शिक्षा; पण गृहपाठ पूर्ण होईपर्यंत टीव्ही बघायला न मिळणे ही झाली सवलत किंवा बक्षीस काढून घेणे.

हेही वाचा…Health Special : मायग्रेनचं दुखणं टाळण्यासाठी हे कराच… 

मुलांना शिस्त लावताना काही पथ्ये पालकांनी अवश्य पाळावीत. आई आणि वडील, जर घरात आजी आजोबा असतील तर त्या सगळ्यांनीच सारखेच नियम मुलांना लावावेत. म्हणजे आई एक तास टीव्ही बघू देते, पण वडील मात्र स्वतःचे काम नीट व्हावे म्हणून दोन-तीन तास टीव्ही बघू देतात; असे असता कामा नये. नियम आणि वागण्याच्या घालून दिलेल्या मर्यादा यांच्यात सातत्य असले पाहिजे, तर तो नियम मुलाच्या मनावर ठसतो. मोठी माणसे आपल्या वागणुकीतून आदर्श घालून देतात, त्यामुळे त्यांनीही स्वतःला घालून दिलेले नियम पाळावेत.

‘उद्या लवकर उठ, शाळेतून येताना आईस्क्रीम घेऊन देईन’ असे आपण कबूल करतो. मुलगा खरंच लवकर उठतो, पण आईस्क्रीम द्यायच्या वेळेस आपण म्हणतो, ‘अरे, आत्ताच सर्दी झाली होती तुला, आज नको, पुढच्या आठवड्यात देईन हा!’ आपणच दिलेले वचन पाळले नाही, तर मुलाने आपल्यावर विश्वास का ठेवावा आणि आपले पुढच्या वेळेस ऐकावे तरी का? या उलट, जर आपण एकदा नाही म्हटले असले, तर थोड्या वेळाने हट्टाला कंटाळून हो म्हटले, तर मूल लवकरच शिकते की मी अकांडतांडव केले की सगळे माझ्यापुढे नमते घेतात!

हेही वाचा…Health Special : कडू रसाचं काय काम असतं?

आपल्या मुलाचे वागणे योग्य असावे यासाठी प्रयत्न करताना सतत छोट्या छोट्या व्यवहारामध्येसुद्धा ‘चांगले’ म्हणजे योग्य वागणे शोधावे आणि त्याची आवश्यक तेवढी प्रशंसा करावी. बहुतेकदा आपल्याला आपल्या मुलाच्या वागण्यातले दोष, कमतरता माहीत असतात. आपला मुलगा थोडा उतावळा आहे, पटकन कुठेही काहीही बोलतो, विचार न करता धडाम करून उडी मारतो हे आपल्याला माहीत असते. एखादे वेळेस आजोबांचा हात धरून रस्ता क्रॉस करताना तो शांतपणे थांबतो आणि आजोबांच्या गतीने रस्ता क्रॉस करतो. त्याचे विचारपूर्वक आणि धीराने वागल्याबद्दल नक्की कौतुक करावे. नेहमी बहिणीशी रिमोट साठी भांडणारा भाऊ ती आजारी असताना तिला आवडता कार्यक्रम लावू देतो, तेव्हा त्याची केलेली प्रशंसा त्याला नक्की आवडते. मित्रांशी सतत माऱ्यामाऱ्या करणारा मुलगा शेजारच्या ताईच्या लहान मुलाशी खेळताना मात्र त्याने मारलेले सहन करतो, त्याच्यावर हात उगारत नाही हेही कौतुकास्पदच! अशा अनेक छोट्या छोट्या हव्याहव्याशा गोष्टी आपला मुलगा किंवा मुलगी करते, तेव्हा तिच्या वागणुकीतले ढळढळीत दिसणारे दोष डोळ्यापुढे न आणता या गोष्टींचे, वागणुकीचे कौतुक, प्रशंसा केली तर त्याचा नक्की उपयोग होतो.

हेही वाचा…Health Special : फसवं चीज आपली फसवणूक करतं? 

आई आणि बाबा अतिशय प्रेमाने आणि मन लावून आपल्या मुलांना वाढवतात. त्यांनीही आपल्या पाठीवर कौतुकाची थाप नक्की मारावी!