Mixing Different Types of Alcohol: अनेक संस्कृतींमध्ये दारू पिणे हा सध्या एक सवयीचा भाग बनला आहे. दारू पिण्यासाठी अनेक प्रकार आणि मिश्रणे उपलब्ध असतात. पण वेगवेगळ्या प्रकारच्या दारू जर एकत्र प्यायलात, तर काय होतं? हे तुम्हाला माहीत आहे का? पण जर हे समजून घायचं असेल, तर त्याआधी आपलं शरीर दारू कशी पचवतं हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. किती प्रमाणात दारू घेतली, किती वेळा घेतली आणि व्यक्तीची तब्येत कशी आहे या सगळ्याचा परिणाम दारूच्या परिणामांवर होतो.

वेगवेगळ्या प्रकारच्या दारू मिसळून प्यायल्याने शरीरावर वाईट परिणाम होतो, ही कल्पना चुकीची आहे. खरं तर तुम्ही एकूण किती दारू प्यायली आणि किती वेगाने प्यायली हे महत्त्वाचं असतं, असं कनिका मल्होत्रा, डाएटीशियन म्हणतात.

शरीरात दारू पचविण्यासाठी काही एन्झाइम्स काम करतात, जसं की अल्कोहोल डिहायड्रोजेनेज व अल्डिहाइड डिहायड्रोजेनेज. हे एन्झाइम्स दारूमधील इथेनॉलचं रूपांतर ॲसिटाल्डिहाइड नावाच्या विषारी घटकात करतात. दारू मिसळल्याचे परिणाम त्याच्या मिश्रणावर कमी आणि एकूण किती दारू प्यायलात यावर जास्त अवलंबून असतात. वेगवेगळ्या प्रकारच्या दारू प्यायल्याने शरीराला दारू जास्त प्यायली गेलीय याची जाणीव कमी होते आणि त्यामुळे रक्तातील दारूचं प्रमाण (BAC) वाढतं. मग त्याचा शरीरावर मोठा विपरीत परिणाम होतो.

दारू मिसळल्याचे तत्काळ परिणाम

१. जास्त नशा होण्याचा धोका वाढतो

बीअर आणि स्पिरिट्ससारखी पेये मिसळल्याने जास्त पिण्याची शक्यता वाढते. त्यामुळे यकृत (लिव्हर) दारू पचविण्यात अपयशी ठरते. त्यामुळे रक्तातील दारूचं प्रमाण (BAC) वाढतं आणि निर्णय घेण्याची क्षमता, शरीराचं समतोल व प्रतिक्रियेचा वेळ खराब होतो, असं फिओना संपत (क्लिनिकल डाएटीशियन, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल) म्हणतात.

२. पाण्याची कमतरता (डिहायड्रेशन)

दारू ही डाययुरेटिक म्हणून काम करते म्हणजे ती लघवीचं प्रमाण वाढवते. जर शरीरात पुरेसं पाणी नसेल, तर त्यामुळे डिहायड्रेशन होऊ शकतं. त्याचा विपरीत परिणाम म्हणून डोकेदुखी, गरगरणं आणि थकवा, असा त्रास होऊ शकतो, असं मल्होत्रा म्हणतात.

३. पोटात त्रास होणे

संपत यांच्या मते, दारूचा पोटाच्या आतील आवरणावर (स्टमक लायनिंग) विपरीत परिणाम होतो. वेगवेगळ्या प्रकारच्या दारू मिसळल्याने हा त्रास वाढतो. त्यामुळे मळमळ, अ‍ॅसिडिटी व गॅस्ट्रायटिस (पोटात सूज), असे त्रास होऊ शकतात.

४. मेंदूचे काम आणि हालचाली कमजोर होणे

रक्तात दारूचं प्रमाण (BAC) वाढलं की, मेंदूचं काम मंदावतं. त्यामुळे मूड, वागणूक आणि शरीराची हालचाल यांवर विपरीत परिणाम होतो. मल्होत्रा सांगतात की, त्यामुळे अपघात होण्याचा आणि चुकीचे निर्णय घेण्याचा धोका वाढतो.

५. दारूची विषबाधा (अल्कोहोल पॉयझनिंग)

वेगवेगळ्या दारू मिसळून जास्त प्रमाणात घेतल्याने दारूची विषबाधा होण्याचा धोका वाढतो, असं संपत सांगतात. ही एक जीवघेणी अवस्था आहे, ज्यामध्ये गोंधळ, उलट्या व श्वास घेण्याचा वेग मंदावतो.

दारू मिसळून प्यायल्याचे दीर्घकालीन परिणाम

१. यकृताला (लिव्हरला) नुकसान

खूप दिवस जास्त दारू पिण्यामुळे (मिसळली तरी किंवा नाही केली तरी) लिव्हरवर ताण येतो. मल्होत्रा यांच्या मते, अशा सवयींमुळे सिरॉसिस, फॅटी लिव्हर व अल्कोहोलिक हेपेटायटिससारखे आजार होऊ शकतात.

२. पचनाच्या समस्या (गॅस्ट्रोइंटेस्टायनल त्रास)

वारंवार दारू प्यायल्याने पोटाच्या आतील आवरणाला इजा पोहोचते. त्यामुळे शरीराला पोषणद्रव्यं शोषून घेता येत नाहीत आणि पोटात कायमस्वरूपी त्रास, अ‍ॅसिडिटी व अल्सर या समस्या होऊ शकतात.

३. मेंदूचं कार्य कमी होणं (स्मरणशक्ती कमी होणे)

दारू दीर्घकाळ प्यायल्यामुळे मेंदू कमजोर होतो. त्यामुळे विसरभोळेपणा, विचारशक्ती कमी होणे व व्हिटॅमिन B1 यांच्या कमतरतेमुळे होणारा वर्निक-कोर्साकोफ सिंड्रोमसारखा (Wernicke-Korsakoff syndrome) आजार होऊ शकतो, असं संपत सांगतात.

४. हृदयविकाराचा धोका (कार्डिओव्हॅस्क्युलर समस्या)

खूप जास्त दारू प्यायल्यानं मग ती वेगवेगळी दारू मिसळलेली असो किंवा एकाच प्रकारची असो; त्यामुळे रक्तदाब वाढू शकतो, स्ट्रोक येऊ शकतो आणि हृदयविकार होण्याचा धोका वाढतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काही लोकांनी दारू मिसळणे तर सोडाच, पण दारू पूर्णपणे टाळायला हवी. गरोदर महिला, लिव्हर किंवा हृदयाचे आजार असलेले लोक, तसेच औषधे घेत असलेल्यांनी दारूपासून दूर राहिलं पाहिजे. संपत सांगतात की, दारू काही औषधांच्या परिणामांना वाढवते आणि त्यामुळे गंभीर साइड इफेक्ट्स किंवा विषबाधा होऊ शकते.