ऑस्ट्रेलियामध्ये एका नवजात बाळाचा मृत्यू झाला, जेव्हा त्याच्या आईने घरच्या घरी इन्स्टाग्रामवरील एका इन्फ्लुएन्सरकडून भाड्याने घेतलेल्या बर्थिंग पूलमध्ये बाळाला जन्म दिला. रिपोर्टनुसार, या महिलेचा वैद्यकीय व्यवस्थेवर विश्वास नव्हता आणि त्यामुळे तिने कोणाच्याही मदतीशिवाय स्वतःच बाळाला घरी जन्म देण्याचा निर्णय घेतला. बाळ निळसर झाल्यानंतर तिने आपत्कालीन सेवेची मदत मागितली; मात्र तेव्हा तिला बाळ वाचवणे शक्य झाले नाही.
वॉटरबर्थ म्हणजे काय?
वॉटरबर्थ म्हणजे पाण्याने भरलेल्या टब किंवा पूलमध्ये प्रसूतीदरम्यान बाळाला जन्म देणे. हा एक असा प्रसूतीचा पर्याय आहे, ज्यामध्ये आई पाण्यात बसलेली असते आणि बाळाला पाण्याच्या आतच जन्म दिला जातो. प्रसूती वेदना कमी करणे, आरामदायक वातावरण तयार करणे व नैसर्गिक जन्म प्रक्रिया सुलभ करणे, असा या प्रसूतीमागचा उद्देश असतो.
परंतु, वॉटरबर्थमध्ये योग्य स्वच्छता, प्रशिक्षित वैद्यकीय तज्ज्ञांची देखरेख व सुरक्षिततेच्या नियमांचे पालन केले जाणे फार महत्त्वाचे असते. अन्यथा, त्यामुळे बाळ आणि आईच्या आरोग्याला धोका उद्भवू शकतो. असेच काहीसे ऑस्ट्रेलियातील या महिलेबरोबर घडले.
वॉटरबर्थसंबंधीची माहिती देताना नवी दिल्ली येथील इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलच्य वरिष्ठ स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. नीलम सूरी सांगतात, “सोशल मीडियावर इन्स्टाग्रामवर दिलेल्या माहितीनुसार, अशा वॉटरबर्थ किंवा फ्रीबर्थसारख्या बाळाला जन्म देण्याच्या पद्धतींना शांत, सशक्त करणाऱ्या आणि वैद्यकीय हस्तक्षेपापासून मुक्त असल्याचे दाखवले जाते. मात्र, व्यावसायिक देखरेखीशिवाय केल्या जाणाऱ्या अशा प्रसूतीमध्ये निर्माण होणारे धोके क्वचितच दाखवले जातात.”
फ्रीबर्थ किंवा वॉटरबर्थ म्हणजे काय?(What is freebirth or waterbirth?)
फ्रीबर्थ, ज्याला कोणत्याही वैद्यकीय कर्मचारी किंवा नर्सच्या मदतीशिवाय बाळंतपण करणे म्हणजे एखादी महिला प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचाऱ्यांशिवाय बाळंतपण करते, जिथे अगदी सुईणदेखील नसते. काही जण गोपनीयता, नियंत्रण किंवा तात्त्विक कारणांसाठी हा पर्याय निवडतात. अशा काही प्रकरणांमध्ये, वॉटरबर्थचा पर्याय निवडला जातो, जिथे बाळंतपण पाण्याचा टब किंवा कोमट पाण्याच्या पूलमध्ये केले जाते.
महिलांना कोणत्या धोक्यांबद्दल माहिती असणे आवश्यक आहे?(What Risk do women need to be aware of?)
प्रसूती ही एक नैसर्गिक प्रक्रिया असली तरी त्या काही मिनिटांतच अनपेक्षित असे काहीही घडू शकते. प्रसूतीच्या सुरुवातीला सामान्य वाटणारी गोष्ट चालू प्रक्रियेदरम्यान कोणत्याही वेळी असामान्य होऊ शकते. निरोगी आई आणि बाळासाठी समस्या ओळखणे आणि त्वरित योग्य पावले उचलणे हे खूप महत्त्वाचे आहे.
प्रसूती ही एक नैसर्गिक प्रक्रिया असली तरी त्या काही मिनिटांतच अनपेक्षित असे काहीही घडू शकते. प्रसूतीच्या सुरुवातीला सामान्य वाटणारी गोष्ट चालू प्रक्रियेदरम्यान कोणत्याही वेळी असामान्य होऊ शकते. निरोगी आई आणि बाळासाठी समस्या ओळखणे आणि त्वरित योग्य पावले उचलणे हे खूप महत्त्वाचे आहे.
कोणत्याही वैद्यकीय देखरेखीशिवाय होणाऱ्या प्रसूतीमध्ये सामान्य धोके खालीलप्रमाणे असू शकतात:
- बाळाला ऑक्सिजनची कमतरता (फिटस डिस्ट्रेस) : ज्यामुळे बाळाचा जीव धोक्यात येऊ शकतो.
- लांबणारी (दीर्घकाळ चालणारी) प्रसूती : ज्यामुळे आई आणि बाळाच्या आरोग्यासंबधी अनेक गुंतागुंतीच्या बाबी निर्माण होऊ शकतात.
- आईला जास्त रक्तस्राव (पोस्टपार्टम हॅमरेज) : प्रसूतीनंतर रक्तस्रावाचा धोका वाढतो.
- नाळेसंबधीची समस्या : जसे की नाळ बाहेर पडणे (प्रोलॅप्स) किंवा नाळ बाळाच्या मानेभोवती गुंडाळणे.
- जंतुसंसर्गाचा धोका : जर प्रसूतीचा परिसर किंवा साधने स्वच्छ नसतील, तर संसर्ग होऊ शकतो.
- वॉटरबर्थमध्ये बाळाला पाण्यात श्वास घ्यावा लागल्यामुळे डुंबण्याचा किंवा अॅस्पिरेशन होण्याचा धोका : जर बाळाने पहिला श्वास घेण्याअगोदर श्वासनलिकेत पाणी गेले, तर ते जीवघेणे ठरू शकते.
- रुग्णालयात किंवा प्रशिक्षित सुईण / नर्सच्या देखरेखीखाली असे धोके त्वरित ओळखून, योग्य उपचार केले जातात. परंतु, वैद्यकीय देखरेखीशिवाय वेळेवर मदत न मिळाल्यामुळे गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.
कोणत्याही वैद्यकीय देखरेखीशिवाय होणाऱ्या प्रसूती आई आणि बाळाच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करतात. अशा प्रसूतींमध्ये माता आणि गर्भातील बाळाला अधिक गुंतागुंत, आजारपण व मृत्यू यांचा धोका संभवतो.
वॉटरबर्थ सुरक्षितपणे करता येऊ शकते का?(Can waterbirths be done safely?)
योग्य स्वच्छता आणि प्रशिक्षित वैद्यकीय तज्ज्ञांच्या देखरेख असेल, तर वॉटरबर्थ कमी जोखमीच्या गर्भधारणांसाठी सुरक्षित ठरू शकते. मात्र, सोशल मीडियावर बऱ्याचदा दिसणाऱ्या ‘DIY’ पद्धतीत संसर्ग नियंत्रण, पाण्याचे योग्य तापमान आणि नवजात बाळाचे त्वरित परीक्षण यांना महत्त्व दिले जात नाही.
सोशल मीडियामुळे का गैरसमज निर्माण होऊ शकतो?(Why can social media be misleading?)
‘इन्स्टाग्राम-मान्य’ अशा प्रसूतीच्या सुंदर क्षणांचे एडिट केलेले व्हिडीओ बऱ्याचदा अपघात किंवा तातडीच्या परिस्थिती दाखवत नाहीत. ऑनलाइन ट्रेंडमुळे व्यावसायिक देखरेखीची गरज कमी असल्याचे दर्शवले जाऊ शकते. आपण ऑनलाइन ट्युटोरियल पाहून शस्त्रक्रिया करू शकत नाही हे लक्षात घेतले, तर प्रसूतीसाठीही तज्ज्ञांची देखरेख आवश्यक असते, हे समजणे सोपे जाईल.
सोशल मीडिया का गैरसमज निर्माण करू शकते?(Why can social media be misleading?)
“इंस्टाग्राम-मान्य” अशा प्रसूतीच्या सुंदर क्षणांचे एडिट केलेले व्हिडिओ बऱ्याचदा अपघात किंवा तातडीच्या परिस्थिती दाखवत नाहीत. ऑनलाइन ट्रेंडमुळे व्यावसायिक देखरेखीची गरज कमी असल्याचे दर्शवले जाऊ शकते. जसे आपण ऑनलाइन ट्युटोरियल पाहून शस्त्रक्रिया करू शकत नाही, तसेच प्रसूतीसाठीही तज्ज्ञांची देखरेख आवश्यक असते.
डॉक्टर काय सल्ला देतात?( What do doctors recommend?)
नैसर्गिक प्रसूती हवी असल्यास, हॉस्पिटल किंवा प्रमाणित बर्थिंग सेंटरची निवड करा, जे तुमच्या पसंतीनुसार सेवा देतात.
वॉटरबर्थ करताना प्रशिक्षित दाई किंवा स्त्रीरोग तज्ज्ञाची उपस्थिती आणि तातडीच्या मदतीसाठी आवश्यक ती उपकरणे असणे आवश्यक आहे.
विशेषतः पहिल्या गर्भधारणेसाठी उच्च रक्तदाब, गर्भावस्थेतील मधुमेह किंवा पूर्वीच्या प्रसूतीत गुंतागुंत असलेल्या महिलांनी वैद्यकीय मदतीशिवायची फ्रीबर्थ पद्धत टाळावी.
जन्म देणे हा आयुष्यातील सर्वांत शक्तिशाली क्षण आहे; पण त्यात सुरक्षेबाबत कधीही ट्रेंडसाठी तडजोड करू नये. Instagram वरचा एक परफेक्ट फोटो नव्हे, तर आई आणि बाळाचे निरोगी राहणे — हीच खरी प्राथमिकता असावी.