Neck pain : आजकाल डोकेदुखी हा एक सामान्य आजार झाला आहे. तणाव, थकवा, सतत मोबाईल किंवा लॅपटॉपच्या स्क्रीनवर पाहून काम केल्याने डोकेदुखीची समस्या बळावते. त्यामागे आणखीही बरीच कारणं असू शकतात. डोकेदुखीपासून सुटका मिळवण्यासाठी अनेकदा वेदनाशामक औषधांची मदत घेतली जाते. मात्र ही औषधं वारंवार घेत असा तर त्याचे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. या गोष्टी टाळण्यासाठी तुम्ही 3 औषधी तेलांची मदत घेऊन डोकेदुखीपासून आराम मिळवू शकता. औषधी झाडांची पानं, देठ, फुलं, साल, खोड, मुळांपासून तयार होणारे हे तीन तेलांचे प्रकार तणाव कमी करण्यासह दुष्परिणामांशिवाय डोकेदुखी आणि मायग्रेनचा त्रास कमी करण्यास मदत करतात.

या तेलांच्या वापराने डोकेदुखीपासून होईल सुटका

१) पेपरमिंट तेल

डोकेदुखी आणि मायग्रेनमुळे होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी पेपरमिंट तेल सर्वाधिक प्रभावी मानलं जातं. डोकुदुखी होत असल्यास पेपरमिंट तेलाचे दोन ते तीन थेंब कपाळावर लावून हकल्या हाताने मसाज करा, याने तुम्हाला काही वेळातचं आराम पडेल. कारण पेपरमिंट तेलातील मेन्थॉल हा घटक स्नायूंना आराम देऊन वेदना कमी करण्यास मदत करतो. NCBI च्या रिपोर्टनुसार, पेपरमिंट तेलाचा वापर डोकेदुखी, स्नायूदुखी, खाज सुटणे आणि अपचन यांसारख्या समस्यांवरही एक रामबाण उपाय आहे.

२) लॅव्हेंडर तेल

लॅव्हेंडर तेलाच्या वापरामुळे नैराश्य, तणाव आणि चिंता यांसारख्या समस्यांवर नियंत्रण मिळवता येते. लॅव्हेंडर तेलामध्ये अनेक गुणधर्म आहेत जे स्नायूंचा ताण कमी करतात. त्यामुळे लॅव्हेंडर तेलाच्या वापराने तुम्हाला मायग्रेन आण डोकेदुखीच्या समस्यांपासून सुटका मिळवता येते. नारळ किंवा मोहरीच्या तेलात लॅव्हेंडर तेलाचे काही थेंब घाला आणि कपाळावर मालिश करा, दिवसातून दोनदा तरी असे केल्यास काही तासातचं फरक जाणवू लागेल.

३) कॅमोमाइल तेल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कॅमोमाइल तेल शरीरास आराम देत स्नायूंना शांत करण्यास मदत करते. अधिक तणावामुळे होणारी डोकेदुखी, चिंता आणि निद्रानाश यावरही हे तेल फायदेशीर आहे. गर्भवती महिलांनी कॅमोमाइन तेलाचा वापर करु नये, यामुळे गर्भपाताचा धोका उद्भवतो.