Peeing At Public Toilet: अलीकडे मॉल, ऑफिस, कॉलेज- शाळांमध्ये सार्वजनिक शौचालयात कमोड वापरले जातात. आता या फॅन्सी कमोडची अवस्था अनेकदा इतकी भीषण असते की त्यावर बसून अत्यंत आवश्यक काम करणं भीतीदायक वाटू शकतं. म्हणूनच अनेक महिला सार्वजनिक शौचालयात कमोडवर बसण्याच्या ऐवजी स्क्वॉट पोजिशनमध्ये बसतात. पण तुम्हाला माहित आहे का तुम्ही कमोडवर बसून ज्या विषाणूंपासून पळू इच्छित आहात त्याहीपेक्षा गंभीर परिणाम या स्क्वॉट पोजिशनमध्ये लघवी करण्याचा होऊ शकतो. अलीकडेच, डॉ तानिया क्युटेरस यांनी सोशल मीडियावर सार्वजनिक शौचालयात लघवी करण्याचा योग्य मार्ग सांगितला आहे.

आपण स्क्वॅट पोजीशनमध्ये लघवी का करू नये? (Why Not To pee In Squat on Comode)

डॉ तानिया सांगतात की, “जेव्हा लघवी करताना तुम्ही नीट बसलेले नसाल आणि फक्त टॉयलेट सीटवर स्क्वॉटमध्ये बसलेले असता तेव्हा पेल्विकवर ताण येऊ शकतो. असे केल्यास कालांतराने पेल्वीस कमकुवत होऊ शकते.”

port at vadhvan, vadhvan,
वाढवण येथील पर्यावरणस्नेही बंदराचा मार्ग मोकळा
MGIMS Wardha Bharti 2024
Wardha Jobs : महात्मा गांधी वैद्यकीय विज्ञान संस्था अंतर्गत चार पदांसाठी नोकरीची संधी, जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख
Rosary School Director s Arrest Court Extends Vinay Arhana s Custody in Loan Misappropriation Case
रोझरी स्कूलचा संचालक विनय अऱ्हानाच्या पोलीस कोठडीत चार दिवसांनी वाढ
Sales of e-vehicles pune
गडकरींनी वारंवार सांगूनही लोकांनी फिरवली पाठ! ई-वाहनांच्या विक्रीला गती मिळेना

सार्वजनिक शौचालयात लघवी करण्याचा योग्य मार्ग काय? (Right Way To Pee At Public Toilet)

तुमच्या ओटीपोटात तीन अवयव असतात, तुमचे मूत्राशय जेथे शरीरातील लघवी जमा होते, तुमचे गर्भाशय आणि गुदाशय. तुमचे ओटीपोट म्हणजेच पेल्वीस महत्त्वाचे असणे आवश्यक आहे, अन्यथा, हे अवयव बाहेर पडू शकतात. या स्थितीला पेल्विक ऑर्गन प्रोलॅप्स म्हणतात. अशाप्रकारे टॉयलेट सीटवर स्क्वॉट पोजीशनमध्ये बसल्याने पेल्विक कमकुवत होऊ शकते. जर तुम्हाला विषाणूची भीती असेल तर त्यासाठी आपण अँटी बॅक्टरीयल स्प्रे वापरू शकता. पण तरीही डॉ. तानिया सांगतात की, लक्षात ठेवा टॉयलेट सीटवरून तुम्हाला मूत्रमार्गाचा संसर्ग किंवा सेक्श्युअली ट्रान्समिटेड आजार होऊ शकत नाही.

सार्वजनिक शौचालये वापरताना काय काळजी घ्याल?

१) सार्वजनिक शौचालयात विविध ठिकाणांहून जंतू घेऊन येणाऱ्या अनेक हातांनी दरवाजाच्या नॉबला स्पर्श केलेला असतो. तुम्ही दरवाजा उघडण्यासाठी टिश्यू वापरू शकता.

२) एकदा टॉयलेट वापरल्यानंतर, हात स्वच्छ करा व तुमच्या वैयक्तिक सामानावर सुद्धा सॅनिटायजर स्प्रे करू शकता.

हे ही वाचा<< लघवी करताना जळजळ होत असल्यास ‘ही’ चूक आजच सुधारा; UTI ची लक्षणे व उपचार वेळीच ओळखा

३) ब्लो ड्रायरच्या गरम हवेमुळे हवेत जंतू पसरू शकतात. आपले हात धुतल्यानंतर कोणताही संसर्ग टाळण्यासाठी, आपले हात पेपर टॉवेल किंवा रुमालाने पुसा.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)