निवांत बसण्यापेक्षा कोणतीही शारीरिक हालचाल हृदयासाठी चांगली असते, असे ब्रिटिश हृदयरोगतज्ज्ञांनी सांगितले. शारीरिक हालचालींबरोबर पुरेशी झोपही हृदयाच्या आरोग्यासाठी आवश्यक असल्याचे या तज्ज्ञांनी सांगितले. ब्रिटिश हार्ट फाऊंडेशन आणि लंडन कॉलेज विद्यापीठातील तज्ज्ञांनी हृदयविकाराबाबत संशोधन केले आहे. ‘युरोपियन हार्ट जर्नल’मध्ये हे संशोधन प्रकाशित झाले आहे.

हेही वाचा >>> तुमच्या मुलांना चारचौघात बोलताना, वावरताना बुजल्यासारखं वाटतं का? सोशल एन्ग्जायटी म्हणजे नेमकं काय?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दवसभरातील वेगवेगळय़ा हालचालींचे नमुने हृदयाच्या आरोग्याशी कसे जोडलेले आहेत यांचे मूल्यांकन करणारा हा पहिला अभ्यास आहे. हृदयरोग व रक्तवाहिन्यांसबंधीचे आजार होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. जागतिक स्तरावरील अनेकांचे मृत्यू या आजारांमुळे होत आहेत. त्यामुळे या संशोधकांनी हृदयरोगाविषयी अभ्यास केला. या अभ्यासात संशोधकांनी सहा अभ्यासांमधील माहितींचे विश्लेषण केले, ज्यामध्ये पाच देशांतील १५,२४६ लोकांचा समावेश आहे, दिवसभरातील हालचालींचे वर्तन हृदयाच्या आरोग्याशी कसे संबंधित आहे हे पाहण्यासाठी, सहा सामान्य निर्देशक मोजले गेले. प्रत्येक सहभागीने दिवसभरातील  क्रियाकलाप मोजण्यासाठी विशिष्ट उपकरणांचा वापर करण्यात आला. त्यानंतर या सहभागींचे हृदयाचे आरोग्य मोजण्यात आले.