आता उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. वाढत्या उष्म्यामुळे सर्व जण हैराण होत आहेत. त्यामुळे साहजिकच कूलर, एसी, पंखा, रेफ्रिजरेटरसारख्या वस्तूंचा वापर वाढला आहे. आजच्या काळात फ्रीज ही घरातील मूलभूत गाेष्ट बनली आहे. दरम्यान उन्हाळ्यात फ्रीजमध्ये पाणी ठेवणे सामान्य गोष्ट आहे. कुठुन थकून आलो, बाहेरून आलो की लगेच थंड पाणी पिण्यासाठी आपण फ्रिजमधलं पाणी पितो. मात्र तुम्ही जर फ्रिजमध्ये पाणी ठेवण्यासाठी प्लास्टिकची बाटली वापरत असाल तर ते आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकते. मात्र फ्रीजमध्ये आरोग्यास धोकादायक ठरणारे 18 लाखांहून अधिक बॅक्टेरिया लपलेले असू शकतात. विशेषतः यामुळे पोटाशी संबंधित समस्या निर्माण होतात.
कॅन्सरचा असू शकतो धोका
तज्ज्ञांच्या सांगण्यानुससार, प्लास्टिकच्या बाटलीत खूप वेळ पाणी ठेवले जाते. ते पाणी एखाद्या व्यक्तीने प्यायल्यास, त्या व्यक्तीला अनेक गंभीर आजार होऊ शकतात. यामुळे पुरुषांमध्ये हार्मोनल गडबड होऊ शकते. तसेच स्पर्म काऊंटही कमी होतो आणि लिव्हरचे गंभीर नुकसान होऊ शकते. एवढेच नव्हे तर प्लास्टिकच्या बाटलीतील पाणी प्यायल्याने महिलांना ब्रेस्ट कॅन्सरचा धोका असतो. त्यामुळे याबबात जागरुक राहणे अतिशय महत्वाचे आहे.
अनेक प्रकारच्या प्लास्टिक बिसफेनोल ए हे एक घातक रसायन आहे. हे पाण्यासोबत मिसळून शरीरात गेल्यास हानीकारक ठरू शकतं. त्यामुळे पाण्यासाठी बाटली विकत घेताना ती बिपीए विरहीत असेल, याकडे लक्ष द्या. बहुतेक प्लॅस्टिकच्या बाटल्यांमध्ये बिपीए असतं. त्यामुळे काचेची बाटली उपयोगी ठरू शकते. काचेच्या बाटलीत पाणी कितीही दिवस राहू शकतं, मात्र प्लॅस्टिकच्या बाटलीत जास्त दिवस पाणी ठेवल्यास त्याची चव बदलते.
हेही वाचा – उष्णतेच्या लाटेचा मानवी शरीरावर कसा होतो परिणाम? डॉक्टरांकडून जाणून घ्या, त्याची लक्षणे आणि प्रथमोपचार
भारतात प्लास्टिकचा आहे इतका वापर
सरकारी आकड्यांनुसार, भारतात दरवर्षी सुमारे 35 लाख टन प्लास्टिकची निर्मिती होत आहे. येत्या 5 वर्षांत प्रत्येक व्यक्तीच्या हिशोबाने हे दुप्पट होईल असा अंदाज व्यक्त होत आहे. एका अहवालानुसार, जागतिक स्तरावर 480 अब्ज प्लास्टिक बाटल्यांची विक्री झाली.