Poha Health Benefits: पोहे हा महाराष्ट्राच्या घरोघरी बनणारा सर्वात सोपा आणि अनेकांच्या आवडीचा पदार्थ आहे. मस्त गोल्डन ब्राऊन रंगाच्या परतलेल्या कांद्यावर पसरवलेली पोहे त्यात बारीक बटाट्याचे काप, ओळ खोबरं, कुरकुरीत शेंगदाणे , कोथिंबीर आणि वर लिंबाचा ताजा रस व शेव भुरभुरली की पोटभर आणि मन तृप्त करणारा नाष्टा तयार होतो. पण तुम्हाला माहित आहे का हे पोहे फक्त तुमचा कूकिंगचा वेळ नाही तर वेगवेगळ्या आजरांवर होणारे खर्च सुद्धा वाचवू शकतात. फोर्टिस हॉस्पिटलच्या मुख्य आहारतज्ञ रुचिका जैन यांच्या मते, पोह्यातील पोष्ट सत्व तुमची तब्येत ठणठणीत ठेवण्यास खूप मदत करू शकतात.

पोहे हे मुख्यतः तांदळाने बनवलेले असल्याने ते ऊर्जा आणि ब जीवनसत्त्वाचा चांगला स्रोत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. “पोहे लॅक्टोज-मुक्त, ग्लूटेन-मुक्त आणि अगदी कमी फॅट्स असल्याने पोटाला हलके ठरतात आणि पचन सुद्धा वेगाने होण्यास मदत होते. टायफॉइड, हिपॅटायटीस, इरिटेबल बोवेल सिंड्रोम (IBS) इत्यादी विविध विकारांसाठी शिफारस केलेल्या मऊ आहाराचा भाग म्हणून पोह्यांचे सेवन केले जाऊ शकते.

पोह्यात सुमारे ४.६ टक्के लोह असते. याचा शरीराला फायदा होऊ शकतो, तुमच्या शरीरात लोह चांगल्या प्रकारे शोषून घेण्यासाठी तुम्ही पोह्यात लिंबाचा रस पिळून घेऊ शकता. शेफ संजीव कपूर यांनीही पोह्याचे फायदे त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. “पोहे हे निरोगी कार्ब्सचा (७० टक्के) समृद्ध स्त्रोत आहे आणि अन्य पदार्थांच्या तुलनेत त्यात ३० टक्के कमी फॅट्स असतात पोहे एक चांगले प्रोबायोटिक आहे आणि ते आतडे निरोगी ठेवण्यास मदत करू शकतात, असे संजीव कपूर यांनी नमूद केले आहे.

संजीव कपूर इंस्टाग्राम पोस्ट:

हे ही वाचा<< सकाळपेक्षा संध्याकाळी चालायला जाणे, व्यायाम करणे याचा झोपेला कसा फायदा होतो? डॉक्टरांनी सांगितलं सिक्रेट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रुचिका जैन सांगतात की, पारंपारिक पद्धतीने शेंगदाणे, कढीपत्ता, कांदे, बटाटे आणि भाज्यांसह पोहे तयार केले जाऊ शकतात किंवा पोह्यांचा चिवडा संध्याकाळचा नाष्टा म्हणून बेस्ट रहातो. यामध्ये अधिक प्रथिने मिळावीत म्हणून डाळी तर पोट भरण्यासाठी शेंगदाणे, सुका मेवा घालू शकता. तुम्हाला पोह्यांचे पोष्ट मूल्य व चव वाढवायची असेल तर मटार, गाजर, टोमॅटो अशा भाज्या सुद्धा टाकू शकता.