जेव्हा आपण केळी खातो तेव्हा त्याचा रक्तातील साखरेच्या पातळीवर परिणाम होतो, कारण त्यात कार्बोहायड्रेटस असतात. विशेषत: फ्रुक्टोज, ग्लुकोज आणि सुक्रोज या शर्करा असतात, त्यामुळे जेव्हा तुम्ही दोन ऐवजी एक केळं खाल्ले तर काय होईल? जास्त पिकलेल्या किंवा जास्त कच्च्या नसलेल्या अशा सामान्य केळ्यामध्ये साधारण २७ ग्रॅम कार्बोहायड्रेट्स असतात; त्यापैकी १४-१५ ग्रॅम शर्करा असते. जेव्हा तुम्ही एक केळं खाता तेव्हा शरीर हे शर्करा पचवते आणि रक्तातील ग्लुकोजच्या पातळीत प्रमाण वाढ करते. इन्सुलिन सेन्सटिव्हीटी आणि मेटॅबॉलिक रेटनुसार प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळा परिणाम दिसू शकतो, असे डॉ. मनुषा अग्रवाल यांनी द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगितले. त्या मुंबईतील परळ येथील ग्लेनिगल्स हॉस्पिटलमध्ये इंटरनल मेडिसन विषयातील वरिष्ठ सल्लागार आहेत.
तसेच जर तुम्ही दोन केळी खाल्ली तर कार्बोहायड्रेटसेच प्रमाण दुप्पट होते, जे साधारण ५४ ग्रॅम इतके असते. एका केळ्याच्या तुलनेत दोन केळी खाल्ल्यानंतर रक्कातील साखरेचे पातळी जास्त प्रमाणात वाढू शकते. तुमचे शरीर शर्करा कसे पचवते यानुसार परिणाम बदलू शकतो, असेही अग्रवाल यांनी सांगितले.
केळ कितीकेळं किती पिकलेले आहे यावरदेखील साखरेची पातळी किती वाढेल हे अवलंबून आहे. पिकलेल्या केळ्यामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते, कारण त्यातील स्टार्चचे साखेरत रुपांतर होते, ज्यामुळे साखरेची पातळी झटपट आणि जास्त वाढते.
याबाबत दिल्लीतील सी के बिर्ला येथील इंटरनल मेडिसिन विषयातील वरिष्ठ सल्लागार असलेले डॉ. नरेंद्र सिंगला यांनी द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगितले की, “केळ्याचा जीआय म्हणजेच ग्लायसेमिक इंडेक्सदेखील महत्त्वाची भूमिका बजावतो. केळ्याचा ग्लायसेमिक इंडेक्स हा केळं किती पिकलेले आहे त्यानुसार बदलू शकतो. कच्च्या किंवा हिरव्या केळ्याचा जीआय साधारणपणे ४२ इतका असतो, म्हणजेच त्याने साखरेची पातळी हळू हळू वाढते. तर पिकलेल्या केळ्याचा जीआय ५१ आहे. जास्त पिकलेल्या केळ्याचा जीआय ६२ किंवा त्यापेक्षा जास्त असतो, म्हणजेच हे झटपट साखेरची पातळी वाढवू शकते. यामागील कारण म्हणजे कच्च्या केळ्यामध्ये स्टार्चचे प्रमाण जास्त असते, हा कार्बोहायड्रेटचा एक प्रकार आहे, जो हळू हळू पचतो. तर या विरुद्ध पिकलेल्या केळ्यामध्ये या स्टार्चचे साखरेत रुपांतर होते, जे शरीरात झटपट शोषले जाते.”
काय लक्षात ठेवावे? (So, what to note?)
जे लोक रक्तातील साखरेच्या पातळीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत, जसे की मधुमेही लोक; त्यांनी किती प्रमाणात केळी खाल्ल्यास रक्तातील साखरेच्या पातळीवर कसा परिणाम होऊ शकतो हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. साखरेचे प्रमाण जास्त असलेले फळ कमी प्रमाणात खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत होते, असे अग्रवाल यांनी स्पष्ट केले.
साखरेच्या पातळीवर होणारा परिणाम लक्षात घेता बहुतेक व्यक्तींसाठी एक केळे खाणे सामान्यतः योग्य ठरू शकते आणि परिणामी रक्तातील साखरेमध्ये मध्यम वाढ होते. डॉ. सिंगला यांनी भर दिला की, “विशेषतः ज्यांच्या इन्सुलिन संवेदनशीलतेत बिघाड आहे, त्यांनी एकाच वेळी दोन केळी खाल्ल्याने शरीराची ग्लुकोज कार्यक्षमतेने प्रक्रिया करण्याची क्षमता कमी होऊ शकते.”
रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी आपण ते किती प्रमाणात खात आहोत, याकडे लक्ष देणे हीच गुरूकिल्ली आहे. एकाचवेळी खाण्यापेक्षा दिवसभरात तुम्ही अर्धे किंवा पाऊण प्रमाणात केळं खाऊ शकता, ज्यावर काळसर डाग कमी आहेत असे नुकतेच पिकलेले केळे निवडल्यास त्याचा जीआय कमी असतो; त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवता येते. तसेच जर काजू-बदाम-पिस्तासारखा सुकामेवा, विविध बिया आणि दह्याबरोबर केळं खाल्ल्यास त्यातील ग्लुकोज शोषण्याची प्रक्रिया मंदावते आणि रक्ताची पातळी नियंत्रित ठेवता येते, असे डॉ. सिंगला यांनी सांगितले.
केळी निवडताना जर त्याची पिकण्याची क्षमता, किती प्रमाणात खात आहात आणि आहारात कोणत्या पदार्थांबरोबर खात आहात हे लक्षात ठेवले तर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करणाऱ्यांसाठी केळी हा आरोग्यदायी संतुलित आहाराचा भाग ठरू शकतो.