जेव्हा तुम्हाला वाटते की तुम्ही तणावग्रस्त आहात, तेव्हा तुमच्या आतड्यांमधील अनुकूल जीवाणूंमध्ये सौम्यपणे बदल होऊ शकतो. हे अनुकूल जीवाणू तुम्हाला दीर्घकालीन आजारांपासून दूर ठेवण्यास साह्यभूत ठरतात. सेल मेटाबॉलिझममध्ये प्रकाशित झालेल्या एका नवीन अभ्यासानुसार, संशोधकांना असे आढळून आले, “तणाव नसलेल्या उंदरांच्या तुलनेत दोन आठवड्यांपर्यंत तीव्र तणावाच्या संपर्कात असलेल्या उंदरांमध्ये आतड्यांचे रोगजनकांपासून ( pathogens) संरक्षण करणाऱ्या पेशींची पातळी कमी होते. या संशोधनामध्ये आतड्याच्या आरोग्याला मेंदू कसा प्रभावित करू शकतो हे सिद्ध झाले.

इरिटेबल बोवेल सिंड्रोमसारख्या आतड्याला प्रभावित करणाऱ्या (gastrointestinal) परिस्थितीच्या वाढीला मानसिक तणाव कारणीभूत आहे; ज्यामुळे ओटीपोटात दुखणे आणि अतिसार, असा त्रास होतो. अभ्यासातील संशोधकांनी निदर्शनास आणले आहे की, तणाव बायोकेमिकल कॅस्केड (biochemical cascade) कसा बंद करू शकतो; जो आतड्याच्या मायक्रोबायोमला (microbiome) पुन्हा आकार देतो. तुमच्या माहितीसाठी, बायोकेमिकल कॅस्केड ही रासायनिक अभिक्रियांची मालिका आहे; जी उत्तेजित झाल्यावर एखाद्या जैविक पेशीमध्ये उदभवते. तुमचे आतड्यांचे मायक्रोबायोम हे तुमच्या आतड्यांमध्ये राहणाऱ्या सूक्ष्म जंतूंची जैविक साखळी आहे.

lancet study on breast cancer how early diagnosis and understanding relapse can help women
भारतात दर चार मिनिटांनी एका महिलेला स्तनाच्या कर्करोगाचे निदान; महिलांकडे दुर्लक्ष होतंय का? वाचा तज्ज्ञांचं निरीक्षण
How to treat heat-related illnesses
उष्णतेच्या लाटेचा कसा करावा सामना? सरकारने मार्गदर्शक सुचना केल्या जारी
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
Loksatta kutuhal Limitations of learning
कुतूहल: सखोल शिक्षणाच्या मर्यादा

तणावाचा आतड्याच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो? (HOW STRESS AFFECTS GUT HEALTH)

चंदिगड येथील पीजीआयच्या गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभागाचे प्रमुख व माजी प्राध्यापक डॉ. राकेश कोचर यांनी द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगितले, “आपल्या आतड्यांमध्ये सूक्ष्म जीवांची सर्वांत जास्त संख्या असते आणि त्याच वेळी ते स्वायत्त मज्जासंस्थेशी (autonomic nervous system) जोडलेले असतात; ज्यामध्ये मेंदूच्या बाहेर सर्वांत मोठे नसांचे जाळे असते. आतड्याच्या अस्तरांभोवती असलेले सूक्ष्म जीव, आतड्यांतील सूक्ष्म जीव, लठ्ठपणा, मधुमेह, दाह किंवा सूज निर्माण करणारे आतड्याचे रोग, फॅटी लिव्हर (Fatty liver), स्वयंप्रतिकार रोग (Autoimmune diseases) आणि अगदी काही न्यूरोलॉजिकल रोगांसारख्या अनेक रोगांशी संबंधित आहे. मायक्रोबायोममधील बदलांसह आतड्यांतील अस्तर पेशींमध्ये होणारे बदल रोगाच्या स्थितीकडे नेणाऱ्या घटनांचे कॅस्केड तयार करतात.”

आतड्यांमधील जीवाणूबाबत द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना मोहाली येथील फोर्टीस हॉस्पिटलच्या क्लिनिकल पोषण आणिव आहारशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ .सोनिया गांधी यांनी सांगितले, ” तणाव हे आतड्याच्या पोषक घटकांच्या शोषण्याच्या क्षमतेवर आणि संपूर्ण प्रणालीवर परिणाम करू शकतात. पचनाच्या विकारांव्यतिरिक्त, झोपेचा त्रास, थकवा व संसर्गाची शक्यता जास्त असू शकते.

द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना मोहालीच्या मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी व हेपॅटोलॉजी विभागाच्या मुख्य सल्लागार, डॉ. जी. एस. सिद्धू यांनी सांगितले, “दीर्घकालीन ताण, आंतरिक मज्जासंस्थेतील (nervous system) न्यूरोट्रान्समीटरला अडथळा आणतो; ज्यामुळे पचनसंस्थेचे स्नायू खराब होतात आणि पचनक्रियेचा वेग बदलतो. तसेच पाचक अवयवांमध्ये सामर्थ्य किंवा समन्वय यांमध्ये बदल होतो.”

हेही वाचा – दर आठवड्याला व्यायाम करता? पण साखरयुक्त पेय घेऊन सर्व मेहनत वाया घालवता; संशोधनाबाबत काय सांगतात डॉक्टर….

कोणते पदार्थ आतड्याचे आरोग्य वाढवू शकतात? (WHAT FOODS CAN BOOST GUT HEALTH?)

डॉ. सोनिया गांधी काही पदार्थांची यादी दिली आहे; जे आतड्यांचे आरोग्य वाढवू शकतात.

(१) शेंगा, कडधान्ये, भाज्या व फळे यांसारखे उच्च फायबर असलेले पदार्थ खाऊ शकता.

(२) ओट्स, केळी, लसूण व कांदे यांसारखे प्री-बायोटिक पदार्थ हे प्री-बायोटिक्सची उत्तम उदाहरणे आहेत; जे आतड्यांतील जीवाणूचे अन्न आहे.

(३) आंबवलेले पदार्थ आतड्यातील चांगले जीवाणू किंवा प्रो-बायोटिक्सची संख्यादेखील वाढवू शकतात.

(४) प्रो-बायोटिक्स हे जिवंत जीवाणू आहेत; जे आतड्यांचे आरोग्य सुधारतात. प्रो-बायोटिक समृद्ध अन्नामध्ये दही, चीज, किमची, कोम्बुचा (kombucha) इत्यादींचा समावेश होतो.

(५) कोलेजेन हे शरीरातील सर्वांत मुबलक प्रमाणात आवश्यक असलेले प्रथिने आहे म्हणून बेरी, ब्रोकोली, कोरफड, नट व बिया इत्यादी कोलेजनयुक्त पदार्थ आहेत.

(६) शोषून न घेतलेले फिनॉलिक्स (phenolics) हे चांगले जीवाणू वाढवण्यास आणि आतड्यांतील चयापचय राखण्यास मदत करू शकतात. त्यासाठी पॉलीफेनॉल समृद्ध आहार ज्यामध्ये ब्ल्यू बेरी, प्लम्स, चेरी, सफरचंद, स्ट्रॉबेरी, ब्लॅक करंट्स, ब्लॅक ऑलिव्ह, डार्क चॉकलेट इत्यादींचा समावेश आहे.

(७) लीन प्रोटीन असलेला आहार म्हणजे अंडी, मासे आणि वनस्पती-आधारित प्रथिने खाऊ शकता.

(८) पाणी : अन्नाचे सहज पचन होण्यास मदत करते, आतड्यांची हालचाल सुलभ करण्यास मदत करते, बद्धकोष्ठता प्रतिबंधित करते आणि अन्नशोषण वाढवते.

हेही वाचा – विषाणुजन्य तापाच्या संसर्गातून बरे होऊनही तुमचा खोकला जात नाही का? जाणून घ्या काय सांगतात डॉक्टर

ताणतणावचा त्रास दीर्घकाळपर्यंत होऊ नये यासाठी त्याचे वेळीच व्यवस्थापन करणे, तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणे महत्त्वाचे आहे आणि हे व्यायाम करणे, दीर्घ श्वास घेणे, निसर्गाच्या सान्निध्यात राहणे, कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवणे, सर्जनशील गोष्टींमध्ये सहभागी झाल्यास साध्य करता येईल. तसेच तणाव निर्माण करणारे घटक ओळखून तज्ज्ञांची मदत घेणे आवश्यक आहे.