Foods Control Blood Sugar: तज्ज्ञांच्या मते, योग्य अन्नपदार्थांनी सकाळची सुरुवात केल्याने इन्सुलिन प्रतिरोध कमी करण्यात आणि शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नैसर्गिकरीत्या नियंत्रित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली जाऊ शकते. म्हणून आम्ही त्यांना पुढील आयुष्यात शरीरप्रकृती चांगली ठेवण्यासाठी आहारात समाविष्ट कराव्यात अशा नऊ गोष्टी खालीलप्रमाणे:
‘या’ पदार्थांपासून करा सकाळची सुरुवात
कोमट पाणी
मुंबईतील ग्लेनिगल्स हॉस्पिटल – परळ येथील अंतर्गत औषधांच्या वरिष्ठ सल्लागार डॉ. मंजुषा अग्रवाल यांनी दिवसाची सुरुवात एका ग्लास कोमट पाण्याने करण्याची शिफारस केली आहे. “तुम्ही कोमट पाण्यात काही थेंब लिंबाचा रसदेखील घालू शकता. लिंबाचा रस घालताना काळजी घ्या. कारण- ते आम्ल आिहे आणि त्यामुळे मायग्रेन किंवा सायनुसायटिसचा त्रास होऊ शकते. ते तुमचे पचन सुरू करण्यास मदत करू शकते आणि रक्तातील साखर न वाढवता तुमचे शरीर हळुवारपणे जागृत करू शकते”, असे डॉ. अग्रवाल म्हणाल्या.
ग्रीन स्मूदी
जर तुम्हाला काही समाधानकारक हवे असेल, तर भाज्यांच्या स्मूदी पालक, काकडी वा पुदिना यांनी सुरूवात करा. डॉ. अग्रवाल यांनी नमूद केले की, ताज्या हिरव्या भाज्या रक्तातील साखरेचे व्यवस्थापन करण्यास मदत करू शकतात.
बेरी
ब्ल्यूबेरी, स्ट्रॉबेरी व रास्पबेरीमध्ये फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात, जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास आणि जळजळ कमी करण्यास मदत करतात, असे डॉ. राजीव कोविल म्हणाले.
अंडी
प्रथिने आणि निरोगी चरबीयुक्त पदार्थांनी समृद्ध असलेले अंडे रक्तातील साखर स्थिर ठेवण्यास आणि जास्त काळ पोट भरलेले असल्याची भावना ठेवण्यास मदत करते. त्यामुळे रक्तातील चढ-उतार कमी करता येतो.
ग्रीक दही
ग्रीक दही आतड्यांच्या आरोग्यासाठी प्रो-बायोटिक्स आणि इन्सुलिन संवेदनशीलता सुधारण्यासाठी प्रथिने प्रदान करते. “साध्या ग्रीक दह्याची एक छोटी वाटी तुमच्या आतड्यांच्या आरोग्यासाठी पुरेसे प्रथिने आणि चांगले जीवाणू प्रदान करू शकते, जे इन्सुलिन प्रतिरोध व्यवस्थापित करण्यासाठी आवश्यक आहे”, असे डॉ. अग्रवाल म्हणाले. परंतु, यासाठी “साखरेशिवाय पूर्ण चरबीयुक्त किंवा कमी चरबीयुक्त दही निवडावे, असे डॉ. कोविल पुढे म्हणाले.
मेथीचे पाणी
एक ग्लास मेथीचे पाणी प्या. “मेथीच्या एक चमचा बिया रात्रभर भिजवून, सकाळी ते पाणी पिता येते. त्यामुळे इन्सुलिन संवेदनशीलता सुधारण्यास मदत होऊ शकते,” असे डॉ. अग्रवाल म्हणाले.
ओट्स
स्टील-कट किंवा रोल केलेले ओट्स विरघळणारे फायबरने समृद्ध असतात, जे पचन मंदावते आणि रक्तातील साखरेच्या वाढीस प्रतिबंध करण्यास मदत करते. बहुतेकदा जास्त प्रक्रिया केलेले ओट्स टाळा.
अॅव्होकॅडो
डॉ. कोविल म्हणाले की, तुमच्या नाश्त्यात उदाहरणार्थ- संपूर्ण धान्याच्या टोस्टवर, अॅव्होकॅडो घातल्याने निरोगी मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स मिळतात, जे इन्सुलिनची क्रिया वाढवतात. डॉ. अग्रवाल यांनी सहमती दर्शविली आणि सांगितले की, अॅव्होकॅडोचे काही तुकडे खाल्ल्याने किंवा ते स्मूदीमध्ये टाकून खाल्ल्याने निरोगी फॅट्स मिळू शकतात, जे रक्तातील साखरेची पातळी स्थिर करण्यास मदत करतात.
ड्रायफ्रुट्स
मूठभर बदाम आणि २-३ अक्रोड फायबर, मॅग्नेशियम व निरोगी चरबी देतात, जे रक्तातील साखर नियंत्रणासाठी फायदेशीर आहेत. डॉ. अग्रवाल यांनी सांगितले की, सकाळी मूठभर भिजवलेले ४-५ बदाम खावेत. “भिजविलेले बदाम निरोगी चरबी आणि फायबर प्रदान करतात, जे रक्तातील साखरेच्या वाढीवर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात,” असे त्यांनी इंडियन एक्स्प्रेस डॉटकॉमला सांगितले.
तुमच्या सकाळच्या नाश्त्यात वरील काही पदार्थ मिसळणे सोपे आणि स्वादिष्ट असू शकते. “बेरी आणि ग्रीक दही, अंडी आणि अॅव्होकॅडो टोस्ट, ओट्स हे दररोज इन्सुलिन संवेदनशीलता वाढविण्याचे सोपे मार्ग आहेत,” असे डॉ. कोविल म्हणाले.