भारतासह जगभरात मधुमेह असणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. तणाव, बदललेली जीवनशैली, खाण्याच्या चुकीच्या सवयी यांमुळे अगदी तरुण मंडळी देखील या आजाराला बळी पडत आहेत. काहीजण मधुमेह टाळण्यासाठी तब्बेतीची विशेष काळजी घेतात, पण तरीही ते या आजाराला बळी पडतात. यामागे आनुवंशिकता हे एक कारण असू शकते, याशिवाय रोजच्या काही सवयींमुळे मधुमेह होण्याचा धोका वाढतो. कोणत्या आहेत त्या सवयी जाणून घ्या.

मधुमेह होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या सवयी

आणखी वाचा: सॅलेडमध्ये मीठ टाकण्याची सवय आहे का? यामुळे होऊ शकते आरोग्याचे नुकसान, लगेच जाणून घ्या

पुरेशी झोप न घेणे
निरोगी राहण्यासाठी पुरेशी झोप घेणे आवश्यक असते, हे तुम्ही सर्वांकडून ऐकले असेल. प्रत्येक व्यक्तीने किमान ७ ते ८ तास झोप घेणे आवश्यक असते. पुरेशी झोप न घेतल्यास अनेक आजार उद्भवू शकतात. मधुमेह हा त्यातीलच एक आहे. झोप पूर्ण न झाल्यास भूक नियंत्रित ठेवणाऱ्या आणि रक्तातील साखर नियंत्रण ठेवणाऱ्या हार्मोन्सचा परिणाम कमी होतो. त्यामुळे वजन वाढण्याची आणि परिणामी मधुमेह होण्याची शक्यता वाढते.

नाश्ता टाळणे
अनेकजणांना सकाळी कामाच्या गडबडीमध्ये नाश्ता करायला वेळ मिळत नाही. पण या नाश्ता टाळण्याच्या सवयीमुळे, दुपारच्या जेवणापर्यंत उपाशी राहिल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण, इन्सुलिनचे प्रमाण अनियंत्रित होऊन मधुमेह होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे दररोज नाश्ता करण्याचा सल्ला दिला जातो.

आणखी वाचा: सतत होणाऱ्या डोकेदुखीमुळे त्रस्त आहात? त्यामागे असू शकतात ‘ही’ कारणं लगेच जाणून घ्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रात्रीच्या जेवणातील चुकीच्या सवयी
रात्रीच्या जेवणात योग्य, पौष्टिक अन्नपदार्थांचा समावेश करणे आवश्यक आहे. कारण रात्रीच्या जेवणानंतर शरीराची हालचाल होत नसल्याने त्याचा आरोग्यावर सर्वात जास्त परिणाम होतो. तसेच काहीजणांना रात्रीच्या जेवणानंतरही काहीतरी खाण्याची इच्छा होत राहते. अशावेळी ते तेलकट चिप्स किंवा स्नॅक्स खातात. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढुन, इन्सुलिन सिक्रिशन थांबू शकते. यामुळे मधुमेह होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे रात्रीच्या जेवणाबाबतच्या या चुकीच्या सवयी टाळा.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)