Tips to get rid of constipation : अयोग्य आहार आणि जीवनशैलीमुळे बद्धकोष्ठतेची समम्या निर्माण होते. ही समस्या दीर्घकाळ राहिल्यास मुळव्याध होण्याचा धोका बळावतो. या समस्या टाळण्यासाठी आहार आणि जीवनशैलीमध्ये सुधार आवश्यक आहे. रोज पौष्टिक आहार घेतला पाहिजे आणि नियमित व्यायाम केले पाहिजे. काही चुकीच्या सवयी जसे, अधिक मद्यपान करणे, चहाचे अधिक सेवन करणे, उपाशीपोटी राहणे आणि धुम्रपान करणे यामुळे देखील बद्धकोष्ठता होऊ शकते. म्हणून या सवयी टाळल्या पाहिजे. बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठी पुढील पदार्थांचे सेवन फायदेशीर ठरू शकते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१) पपई खा

बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी पपई फायदेशीर ठरू शकते. पपईच्या खाल्ल्याने पोटा संबंधी विकार दूर होण्यास मदत मिळते. पपईमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. तज्ज्ञांनुसार, फायबरचे अधिक प्रमाण असलेले पदार्थ खाल्ल्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होऊ शकते, तसेच पचन तंत्र मजबूत होते.

पपईतील प्रथिने, पोटॅशियम, फायबर, जीवनसत्वांसह अनेक पोषक तत्व इतर आजारांवर उपयुक्त ठरू शकतात. तुम्हाला बद्धकोष्ठतेची समस्या असल्यास रोज सकाळी पपई खा. याने बद्धकोष्ठतेपासून सुटका मिळू शकते.

(घरात घोंगावणाऱ्या माश्यांमुळे त्रासलात? करा ‘हे’ उपाय, घरापासून दूर ठेवण्यासाठी करू शकतात मदत)

२) ओटमीलचे सेवन

बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळण्यासाठी तुम्ही ओटमीलचे सेवन करू शकता. तुम्ही दिवसा ओटमीलचे सेवन करा. ओटमीलपासून लोह, फोलेट, कॉपर, मॅगनीज, प्रथिने, कार्बोदके, फायबर आणि बिटा ग्लुकोज हे पोषक तत्व मिळतात.

फायबर हे यकृतासाठी फायदेशीर असून ते पचन तंत्र चांगले करण्यास मदत करते. याने बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळते. ओटमीलच्या सेवनाने लठ्ठपणा आणि मधुमेहापासून देखील आराम मिळू शकते. रोज डाळ खाल्ल्याने देखील बद्धकोष्ठतेची समस्या दूर होऊ शकते.

३) तुपाचे सेवन

तुपाने शरीराला बळकटी मिळते. वजन वाढवण्यासाठी तूप खाण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. तुपाच्या सेवनाने बद्धकोष्ठतेची समस्या देखील दूर होऊ शकते. तुपात जीवनसत्व अ, ड आणि ई आढळते. हे पोषक तत्व बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम देण्यात मदत करू शकतात.

(वाढलेले युरिक अ‍ॅसिड ठरू शकते संधिवाताचे कारण, कमी करण्यासाठी करा ‘हा’ आयुर्वेदिक उपाय)

३) आवळा खा

बद्धकोष्ठतेपासून आराम मिळण्यासाठी तुम्ही आवळा खा. आवळ्यातील जीवनसत्व क, फायबरसह अनेक पोषक तत्व असतात जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. आवळा खाल्ल्याने बद्धकोष्ठतेपासून आराम मिळू शकते.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This foods can help get rid of constipation ssb
First published on: 27-11-2022 at 12:29 IST