टॉमेटो ही एक अशी गोष्ट आहे ज्याचा वापर व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही पदार्थांमध्ये केला जातो. अनेक भाज्या टोमॅटोशिवाय चवदार होऊ शकत नाहीत, पण बाजारात टोमॅटोचे गगनाला भिडलेले दर पाहता अनेकांच्या जेवणातून टोमॅटो आता गायब होत आहे. पण टोमॅटोला पर्याय म्हणून अनेक पदार्थ आहेत, ज्याच्या वापराने तुम्ही पदार्थांमध्ये आंबटपणा आणू शकता. यासाठी नवी दिल्लीतील मॅक्स सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटलमधील आहारतज्ज्ञ रितिका समद्दार यांनी टोमॅटोला काही पर्यायी गोष्टी सुचवल्या आहेत. त्या वापरून तुम्ही स्वादिष्ट, पौष्टिक जेवण तयार करू शकता.

भारतात कांद्याप्रमाणेच टोमॅटोही त्याच्या पौष्टिक घटकांऐवजी रंग आणि चवीसाठी अनेक पदार्थांमध्ये वापरला जातो. प्रत्येक राज्यातील खाद्यसंस्कृतीनुसार, टोमॅटोचा कमी-अधिक प्रमाणात वापर केला जातो. त्यातील पौष्टिक घटकांचा विचार करता, टोमॅटोचा वापर झाला पाहिजे हे म्हणणे फारसे चुकत नाही, पण हे पौष्टिक घटक आपल्याला इतर पदार्थांमधूनही मिळू शकतात, जे तुमच्या निरोगी शरीरासाठी फायदेशीर ठरू शकतात. त्यामुळे आहारतज्ज्ञांच्या दृष्टिकोनातून, तुम्ही टोमॅटोवर अवलंबून राहिलेच पाहिजे असे नाही.

टोमॅटोतील पौष्टिक घटकांबद्दल बोलायचे झाल्यास त्यात लाइकोपिनचे प्रमाण जास्त आहे, जे रक्तातील कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइड्सचे व्यवस्थापन करण्यासाठी फायदेशीर असल्याचे मानले जाते. लाइकोपिनमध्ये हे कर्करोगविरोधी, अँटीऑक्सिडंट आणि मधुमेहविरोधी गुणधर्म असल्याचे सिद्ध झाले आहे. याशिवाय टोमॅटोमध्ये पोटॅशियम, जीवनसत्त्वे बी, सी , ई आणि बीटा कॅरोटिन, ल्युटिन, फ्लेव्होनॉइड्स, फिनोलिक ॲसिड आणि टॅनिन यांसारखे अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असते.

हे सर्व पोषक घटक आपल्याला इतर अन्नपदार्थांमधूनही मिळू शकतात. यामुळे आंबट चवीसाठी तुम्ही टोमॅटोऐवजी दही, चिंच, व्हिनेगर, आवळा, लिंबाचा रस किंवा कोकम यांसारख्या पदार्थांचा वापर करू शकता. तसेच लाल रंगाच्या ग्रेव्हीसाठी काही लोक थोडेसे स्क्वॅश केलेले बीटरूट किंवा लाल भोपळी मिरचीचा वापर करतात.

पण टोमॅटोमधील लाइकोपिन हा घटक रक्तातील विषारी पदार्थ बाहेर काढतो तसेच एलडीएल किंवा खराब कोलेस्टेरॉलचे ऑक्सिडेशन प्रतिबंधित करतो यामुळे पेशींमधील ऑक्सिडेटिव्हचे होणारे नुकसान कमी होते. पण लाइकोपिनसाठी तुम्ही गाजर, आंबा, द्राक्ष, टरबूज, पेरू ही फळे खाऊ शकता. कारण शिजवलेल्या टोमॅटोमधील कमी झालेल्या लाइकोपिनचे सेवन करण्यापेक्षा या फळांमधून लाइकोपिन घेणे केव्हाही चांगले आहे.

टोमॅटोऐवजी तुम्ही पदार्थामध्ये आंबट चव आणण्यासाठी दही वापरू शकता. दही हे प्रोबायोटिक आहे. ज्यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स आणि ग्लायसेमिकचे प्रमाण कमी असते. तसेच एचडीएल किंवा चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यासाठी आणि उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी फायदेशीर असते, याशिवाय वजन कमी करण्यास मदत करते.

त्यात हायड्रॉक्सी सायट्रिक ॲसिड जास्त असते, जे कार्बोहायड्रेट्सचे फॅटमध्ये रूपांतर करण्यासाठी जबाबदार असणारे एन्जाइम, अमायलेस रोखते, यामुळे तुमची भूक कमी होते आणि रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहण्यास मदत होते.

चिंचेमध्ये असलेले फ्लेव्होनॉइड्स एलडीएल कमी करतात आणि एचडीएलचे प्रमाण वाढवतात. त्यातील पोटॅशियमचे प्रमाण तुमचा रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करू शकते.

व्हिनेगरच्या आरोग्य गुणधर्मांबाबत फारसे सांगणे आवश्यक नाही. पण स्वयंपाकाचा घटक म्हणून त्याचा वापर सिद्ध झाला आहे. व्हिनेगरमुळे पचनक्रिया सुधारते, यामुळे रक्तातील साखरेच्या वाढीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते, यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी व्हिनेगर चांगले मानले जाते. यकृताद्वारे ग्लुकोजचे उत्पादन कमी करणे किंवा इन्सुलिन-प्रतिरोधक लोकांमध्ये इन्सुलिनचा अधिक कार्यक्षम वापर सुनिश्चित करणे ही त्याची इतर कार्ये आहेत. व्हिनेगरमध्ये पॉलिफेनॉल असतात, जे पेशींना ऑक्सिडेटिव्ह तणावापासून वाचवतात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोकम हे लो कॅलरीसाठी ओळखले जाते. फायबरने समृद्ध असलेल्या कोकमात टोमॅटोमध्ये असलेले सर्व जीवनसत्त्वे आणि पोषक घटक आढळतात. जसे की, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी 3, व्हिटॅमिन सी, फॉलिक ॲसिड, कॅल्शियम, लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम, मॅंगनीज आणि जस्त.