उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथील सिल्कियारा बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांना वाचवण्यासाठी विशेष ऑपरेशन सुरू आहे, पण त्यात अडथळे येत असल्याने गेल्या १५ दिवसांपासून हे कामगार तिथेच अडकून पडले आहेत. बोगद्यात बचाव मोहिमेच्या १४ व्या दिवशी ऑगर मशीनमध्ये बिघाड झाल्यामुळे कामगारांना बाहेर काढणे शक्य झाले नाही. अशातच या कामगारांना बाहेर काढण्यासाठी आणखी महिनाही लागू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे. ज्यामुळे कामगारांच्या आरोग्याबाबत आता भीती व्यक्त केली जात आहे. कारण त्या परिस्थितीत कामगारांच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. पण, हे परिणाम कशाप्रकारचे असू शकतात? गंभीर परिस्थितीत कामगार मन:स्वास्थ्य कसे सांभाळणार? याविषयी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमधील सल्लागार आणि मानसोपचारतज्ज्ञ डॉ. शौनक अजिंक्य यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सविस्तर माहिती दिली आहे.

मानसशास्त्रानुसार, मानवी मन हे खूप लवचिक आणि नाजूक असते. ते अनेक आव्हानांना सहन करण्यास सक्षम असते. परंतु, दीर्घकालीन प्रतिकूल परिस्थितीत गंभीर त्रासाला सामोरे जाताना मानवी मनावर गंभीर आघात होतात. यात अनेक तास अडकून पडलेल्या अवस्थेत राहण्याची परिस्थितीमुळे अशा मानसिक आघातांना सामोरे जावे लागते. सिल्कियारा बोगद्यात अडकून पडलेल्या ४१ कामगारांबरोबरही तेच घडत आहे. त्यांच्या मानसिक आरोग्यावर अतिशय खोल परिणाम होत आहेत. शारीरिक हालचाल करण्यात अडचण आणि जागेची मर्यादा यामुळे कामगारांमध्ये शक्तिहीनतेची भावना निर्माण होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे शरीराच्या तणावाच्या प्रतिसादाला चालना मिळत आहे. याव्यतिरिक्त अन्न आणि पाण्याच्या कमतरतेमुळे ताणव वाढतोय, कारण जगण्याच्या मूलभूत गरजांशीच त्यांची तडजोड सुरू आहे. या आव्हानांना तोंड देताना मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. त्यामुळे उत्तराखंडच्या सिल्कियारा बोगद्यात बचावाच्या प्रतीक्षेत असलेल्या ४१ कामगारांच्या मनावर नेमके काय परिणाम होत असतील, याचा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करणे फार महत्त्वाचे आहे.

Loksatta kutuhal Artificial intelligence Technology The Turing Test Mirror test
कुतूहल: स्वजाणिवेच्या पात्रता कसोट्या
Loksatta samorchya bakavarun Congress bjp Declaration Important to the people Purpose of the issues
समोरच्या बाकावरून: माझे मत त्याच उमेदवाराला, जो…
Ramzan 2024
रमजान: जगातील विविध धर्मीय उपवासाच्या परंपरा नक्की काय सांगतात?
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…

अडकून पडलेल्या कामगारांच्या मानसिक आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतात?

१) नियंत्रणाचा अभाव आणि अनिश्चिततेमुळे मन चलबिचल होते, अशाने व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत लढण्यास आणि पळून जाण्यास खूप प्रयत्न करत राहते. ज्यामुळे सतत चिंता, अस्वस्थता, भीती आणि भविष्यात काहीतरी विनाशकारी घडेल, अशी भावना निर्माण होते.

२) बंदिस्त वातावरणात ताण वाढतो जो रागाच्या रुपात बाहेर येतो, अशाने व्यक्ती सहजपणे निराश होते. तणाव, राग, चिडचिडेपणा अशा संमिश्र भावनांमुळे व्यक्तीला काय करावे सुचत नाही, अशाने व्यक्तीला भावना व्यवस्थापित करण्यात अडचण निर्माण होते.

३) व्यक्तीला झोपेचा त्रास होऊ लागतो. अशा परिस्थितीत झोप लागण्यात अडचण होते, विचारांमुळे रात्रभर जागरण आणि त्रासदायक अनुभवांचा सामना करावा लागतो. अशाने व्यक्तीला झोप लागली तरी भयानक स्वप्ने पडू लागतात.

४) व्यक्तीत एक्यूट स्ट्रेस डिसऑर्डर किंवा पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर (PTSD) सारखी लक्षणे दिसू लागतात. ते खूप अतिसतर्क होतात आणि संभाव्य धोक्यांसाठी त्यांच्या सभोवतालच्या गोष्टी सतत स्कॅन करत राहतात. अतिसतर्कतेमुळे त्यांना अनेक धोकादायक अनुभवांचा सामना करावा लागतो. अशा बंदिस्त वातावरणामुळे व्यक्तीला जुन्या गोष्टी आठवतात, ज्या खूप विचार करायला लावतात. यातील त्रासदायक आठवणी अनपेक्षितपणे आणि वारंवार आठवत राहतात. अशाने व्यक्ती सर्वांना टाळण्याचा आणि परिस्थितींपासून दूर राहण्याचा प्रयत्न करते. व्यक्ती बंदिस्त वातावरणातून बाहेर आल्यानंतरही त्याला दुःखदायक आठवणी येत राहतात, ज्यामुळे तो समाजापासून सतत दूर राहण्याचा प्रयत्न करतो. व्यक्ती त्याच्या भावनांवर पूर्णपणे नियंत्रण ठेवू शकत नाही. अशाने त्याला इतरांशी बोलताना, नातेसंबंध ठेवताना अडचणी येतात. काही व्यक्तींना भावनिक सुन्नपणा येऊ शकतो, ज्यामुळे त्या भावनांपासून अलिप्त होतात; ज्यामुळे त्यांची आनंददायक घटनांचा अनुभव घेण्याची क्षमता कमी होते.

५) बाहेरील अनेक उत्तेजनात्मक गोष्टींपासून अधिक काळ वंचित राहिल्याने व्यक्तीला मानसिक तसेच शारीरिक कमजोरी येते, याशिवाय परिस्थितीनुसार कसे वागायचे याचे भान राहत नाही. यामुळे लक्ष केंद्रित करण्यात अडचण, स्मरणशक्ती कमी होणे, दृष्टिदोष, निर्णय घेण्याची क्षमता कमी होणे किंवा वास्तविकतेची भावना बदलणे अशी लक्षणे दिसतात. व्यक्तीला साध्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे किंवा छोटे-छोटे निर्णय घेणेही अवघड होते.

६) दीर्घकाळापर्यंत एकटेपणाचा अनुभव घेतल्याने सतत दुःखाची भावना, असहाय्यता, निराशा आणि रोजच्या कामांमधील रस कमी होणे यासारखी नैराश्यात्मक लक्षणे अनुभवावी लागू शकतात. डोकेदुखी, स्नायूंचा ताण, गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्या आणि भूक न लागणे यांसारखी शारीरिक लक्षणे दिसू शकतात.

अडकून पडलेल्या अवस्थेतून बाहेर आल्यानंतर जाणवणाऱ्या मानसिक समस्यांना कशाप्रकारे सामोरे जावे लागेल?

अडकून पडलेल्या अवस्थेतून सुखरुप बाहेर पडल्यानंतर संबंधित व्यक्तीला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि मानसिक समस्यांचा सामना करण्यासाठी खालील गोष्टी करणे आवश्यक आहे.

१) अशा व्यक्तीने विश्वासू मित्र, कुटुंबातील सदस्य किंवा ऑनलाइन हेल्पिंग ग्रुपबरोबर अनुभव शेअर करणे फार महत्वाचे आहे. इतरांशी बोलून, अनेक गोष्टी शेअर करून ते एकाकीपणाच्या भावनांचा सामना करू शकतात. व्यक्तीने त्याला त्रास देणाऱ्या गोष्टी ओळखून त्या विसरण्यासाठी इतरांची मदत घ्यावी. तणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि त्रासदायक आठवणींपासून दूर राहण्यासाठी सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करावा.

२) स्वत:ची खूप काळजी घ्यावी. रोज पुरेशी झोप, निरोगी आहार आणि नियमित व्यायाम अशा गोष्टींमुळे व्यक्तीला कठीण परिस्थितीतून बाहेर येण्यास मदत होईल. त्रासदायक अनुभवांचा सामना करताना सिगारेट, दारू किंवा अमली पदार्थांचे सेवन टाळले पाहिजे. कारण यामुळे मानसिक आरोग्य समस्या वाढतात आणि तुम्हाला त्रासदायक अनुभवातून बाहेर पडण्यात अडचण येते.

३) त्रासदायक अनुभवातून बाहेर येण्यासाठी व्यक्तीने निसर्गात वेळ घालवणे, बाह्य क्रियाकलापांमध्ये स्वत:ला गुंतवणे तसेच कला जोपासणे, म्हणजे चित्रकला, लेखन किंवा संगीत अशा आवडीच्या गोष्टी करणे गरजेचे आहे. यात व्यक्तीने सतत चांगले प्रयत्न करत राहिले पाहिजे, स्वत:ला समजून घेत स्वत:साठी वेळ दिला पाहिजे. तसेच तुम्हाला यातून बाहेर पडण्यासाठी काही वेळ लागू शकतो, पण त्यानंतर सर्व काही ठीक होईल असे मनाला सतत समजावून सांगितले पाहिजे.

४) अशाप्रकारच्या व्यक्तींनी गरज पडल्यास मानसोपचारतज्ज्ञ किंवा तुमच्या ओळखीतील डॉक्टरांची मदत घ्या. यावेळी Cognitive Behavioral Therapy (CBT), Eye movement desensitization and reprocessing (EMDR) , एक्सपोजर थेरपी आणि हिप्नोथेरेपी अशा काही थेरपी PTSD वर उपचार करण्यासाठी वापरल्या जातात. काही प्रकरणांमध्ये औषधांचीही गरज लागू शकते.