सध्याच्या काळात अनेक लोकांना ऑफिसमध्ये तासन्‌तास बसून काम करावी लागतात. ज्यामुळे त्यांचा लठ्ठपणा वाढत असल्याच्या तक्रारी कर्मचारी करत असतात. त्यामुळे अनेकजण आपणाला मिळेल त्या ब्रेकमध्ये चालण्याचा प्रयत्न करतात. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल मात्र, तुमची ही अधूनमधून चालण्याची सवय तुमचा अकाली मृत्यू टाळू शकते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हो कारण न्यूयॉर्कमधील कोलंबिया युनिव्हर्सिटी इरविंग मेडिकल सेंटरचे व्यायाम फिजिओलॉजिस्ट कीथ डियाज यांनी सांगितले की, दीर्घकाळ बसल्यामुळे ज्या आरोग्याच्या समस्या उद्भवतात त्या केवळ रोजच्या व्यायामाने दूर होणार नाहीत. मेडिसिन अँड सायन्स इन स्पोर्ट्स अँड एक्सरसाइज या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात कीथ यांनी सांगितले की, जे लोक जास्त वेळ बसून असतात त्यांना मधुमेह, हृदयरोग, स्मृतिभ्रंश आणि अनेक प्रकारच्या कर्करोगांसह जुने आजार होण्याची शक्यता असते. मात्र, जे लोक अधूनमधून चालत असतात त्यांचा अशा आजारांपासून बचाव होतो.

हेही वाचा- अपेंडिसाइटिस दुर्लक्ष करणं जीवावर बेतू शकतं; वेळीच जाणून घ्या याची लक्षणं आणि घरगुती उपचार

अभ्यासानुसार, दिवसभरात थोडे थोडे चालल्यामुळे आपले स्नायू सक्रिय होतात, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. सतत बसल्यामुळे पायांच्या रक्तवाहिन्यांमध्ये दाब निर्माण होतो ज्यामुळे ब्लड सर्कुलेशन मध्ये बदल होतो आणि रक्तदाब वाढण्याची शक्यता निर्माण होते. संशोधकांना असे आढळून आले की बसून काम करणारे लोकांनी प्रत्येक ३० मिनिटांनी पाच मिनिटे चालल्यामुळे त्यांच्या रक्तातील साखर आणि रक्तदाबाची पातळी कमी होते.

रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवते –

हेही वाचा- काकडी खाल्याने खरंच सर्दी होते ? हिवाळ्यात काकडी खाणे कितपत योग्य? जाणून घ्या

संशोधकांच्या मते, तासन्‌तास बसल्यामुळे आपले स्नायू स्थिर राहतात. त्यामुळे जेव्हा स्नायूंचा योग्य वापर केला जात नाही, तेव्हा ते रक्तातील साखरेची पातळी आणि कोलेस्टेरॉल असंतुलित करण्याचे काम करतात. नियमित चालण्यामुळे रक्तातील साखर आणि कोलेस्टेरॉल स्नायूंना सक्रिय करण्यास मदत करतात.

तर डियाझने मेडिकल न्यूज टुडेला सांगितले की, या नवीन संशोधनातील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे बसण्याचा आरोग्यावर होणाऱ्या हानिकारक प्रभावापासून स्वत:चा कसा बचाव करायचा यावर संशोधन करण्यात आले. ते म्हणाले की, आपणाला दररोज किती फळे, भाज्या खाव्यात आणि किती व्यायाम करावा हे माहीत असतं. मात्र, बरेच लोक असे आहेत ज्यांची काम करण्याची पद्धत किंवा जीवनशैलीमुळे त्यांना बराच वेळ बसावे लागते. त्यामुळे अशा लोकांना आपल्या आरोग्यासंबंधीच्या समस्या कमी करण्यासाठी चालण्याचा चांगलाच फायदा होईल.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Walking for 5 minutes every half an hour will be beneficial for health jap
First published on: 24-01-2023 at 15:24 IST